हर दिल को धडकने दो!

हर दिल को धडकने दो!

मस्त खुसखुशीत कुरकुरीत हलकाफुलका आहे दिल धडकने दो.

तो अनिल कपूर! झकासच... अनुष्का चमचमीत, रणवीर अनेक्सपेक्टेडली सही काम! मला वाटलेलं फरहानचा मोठा रोल असेल, पण जेवढा काय रोल आहे, एस्पेक्टेडली छान छान, प्रियांकाचं पण छान छान. एकूणच सर्वांना समान वाव मिळालाय काम करायला.

उच्च रहाणीमान असलेल्या फॅमिलीज मध्ये कसे  'कम्युनिकेशन' कमी असते, आणि त्यामुळे कसे ते कसे वेगळे राहतात एकत्र असून वगैरे मस्त मांडलय, त्यात कुत्र्याची कमेंट्री... शारुखला कुत्रा नाव... चुकलो आपल्या कुत्र्याला शाहरुख नाव देणाऱ्या आमिरची 'कुत्रा' उर्फ़ 'प्लूटो मेहरा'च्या कॉमेंट्रीचं गणित मस्त जमलय!

पहिल्या तासात हसण्याची पद्धत स्मित हस्याची मग पुढचा तास फीदीेफिदी मग ब्लैक कॉमेडी सुरु होते! नक्की हासायचं ना वगैरे प्रसंग आहेत, ही रेसीपी छानच जमल्ये झोया ला. आणि सर्वांनी अप्रतिम साथ दिली आहे एकमेकांना... कुठेच ग्रिप सोडत नाही किंवा बोर/रटाळ वगैरे होत जात नाही चित्रपट.

शेवटी जागेवारून उठताना टीशर्ट वर उरले सुरलेले पॉपकॉर्न खातानापण हसु येतं सीन्स आठवून!

३ एंड हाफ स्टार्स फ्रॉम धिस फ्लिक यो!

#सशुश्रीके | ६ जून २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!