ती सोलापुरी चादर...
'ती सोलापुरी चादर'
एक बारा-तेरा वर्षांपूर्वींचा किस्सा..
आम्ही १०-१२ जण इंदौरला ट्रेननी गेलेलो, आणि येतानाही ट्रैननीच आलो, तेव्हा अमृताशी लग्न झालेले नव्हते, मी आणि आई गोगटे कुटुंबियांबरोबर गेलेलो, असो... तर झालं असं, की येताना मस्त खिड़कीत बसलेलो, बाहेरची मस्त हवा त्यात मध्य रात्र! मला आली झोप, मस्त लागली ना डूलकी! तेव्हढ्यात समोरून एक ट्रेन आली... भरधाव, हवा आणि आवाज दोघांचा इतका झटका बसला की मी डोक्याखाली ठेवलेली सोलापुरी चादर 'स्वाहः' झाली!
पुणे जवळ आले, आवरावरी सुरु झाली, बैग्स वगैरे... सर्व सामान आणि चादरी गोळा करायला सुरुवात झाली, पण एक चादर मिळे ना!
सासरेबुवा शोधतायत चादर, 'एक चादर कमी कशी!' मी ही मला काही माहीत नसल्याप्रमाणे चादर शोधु लागलो. शेवटी असा निष्कर्ष निघाला की सूरतला सगळे झोपलेले असताना स्टेशन वर चादर चोरीला गेलेली असावी!
काही वर्षांपुर्वी मी बोलता बोलता कबूलीजवाब दिला की... मीच हरवली ती चादर, झालेला किस्सा आत्ता जसा मांडलाय तसाच मांडला. फरक इतकाच की तोंडी मांडला.
ससरेबुआ राग आणि हास्य ह्यांचे मिश्र गणित मांडून मोकळे झाले, आणि माझा हा गुन्हा व्यक्त करून मी कमालीचा हलका झालो.
#सशुश्रीके | २५ ऑक्टोबर २०१५
Comments
Post a Comment