'सव्वा सहा' (लघू कथा)

सव्वा सहा






     















          डोळे चोळत चोळत उठलो, आज गजरच झाला नाही, की ऐकु आला नाही!? कदाचित टीवी बघता बघता हॉल मध्येच सॉफ्यावर आडवा झालो असेन, स्वतःशीच बडबड करत तब्बल अर्धा मिनिट सॉफ्यावर लोळत होतो, तेवढ्यात डोक्यात वीज चमकली >आज ओफ्फिसचा पहिला दिवस< त्यात पावसाळा, ह्या पावसाळ्याच्या आईचा घो! नको तेव्हा नको तिथे धो-धो पडत असतो, मला त्याचीच काळजी जास्त, ताडकनी उठलो... टीवी बंद केला, बेसिन पाशी जाता जाता किचन मधले घड्याळ पाहिले, सव्वा सहाच वाजलेले, ते बघुन जरा शांत झालो, आरामात सकाळचे विधी करता करता ऑफिस मध्ये बॉस कसा असेल, सहकर्मचारी कसे असतील, काम कसे असेल ह्याचा विचार करत करत नंतर अंघोळ वगैरे आटोपली, देवाला दीवा लावला... अथर्वशीर्ष म्हंटले, उदबत्ती लावताच खिडकी कडे सूर्य पाहायला गेलो तर... हे आभाळ भरून आलेले, सूर्याचा लवलेशही नव्हता! सकाळी सकाळी हे असले उदास वातावरण पाहुन पहिल्याच दिवस असणाऱ्या नोकारीच्या उत्साहाला हे पावसाळी विर्जण लागलेले! असो...
           तसा जवळपास रोजच फोन व्हायचा घरी, पण आज सकाळीच फोन करुयात आशीर्वादा साठी म्हणुन फोन हातात घेतला तर.. घराच्या आणि आई-बाबांच्या मोबाइल वरून ६-७मिस्ड कॉल! मी आधी घरी लावला फोन, कोणीच उचलला नाही, म्हणून बाबांच्या नंबरवर फोन केला, बाबांनी उचलला फोन, उचलता उचलताच म्हणाले...
बाबा - "अरे कुठे होतास, किती फोन केले आम्ही!?"
मी - "अह्हो, सॉरी-सॉरी... खुप गाढ झोपेत होतो, उठलो तेव्हा सव्वा सहा वाजलेले, आत्ताच सर्व आवारुन झाले, आता साडे सात पर्यंत नीघेन ऑफिसला, ९च्या आधीच पोहोचायचं आहे, जरा लवकरच नीघेन, आज पहिला दिवस ना! जाम टेंशन येतय, त्यात आज वेड्यासारखा कोसळतोय पाऊस!"
बाबा - "काय बोलतोयस तू, बरा आहेस ना? उद्या आहे १ तारेख, उद्या जोइनिंग डेट आहे ना? की आजपासूनच बोलावलय तुला, आणि ते ही इतक्या उशीरा!?"
           मी काही उत्तर देणार... तेवढ्यात जोरात गडगडले, डोळे उघडले ते थेट घड्याळा कडे जाऊन स्थिरावले, सव्वा सहा वाजलेले, गजर वाजत होता आणि फोनही! 

#सशुश्रीके । ०८ ऑक्टोबर २०१५ । २.३४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...