#सशुश्रीके (वैतागलेला कल्पनाशक्ती कर्मचारी)

क्रिएटिविटी म्हणे!

कसली क्रीएटीवीटी चामारी!?

आम्ही रोज तेच करत असतो... आमचं कामच ते!
जाहिरात क्षेत्रात ना आम्ही, मनापासून करतो काम आणि आमचा ग्राहक (client) अगदी मनापासून त्याची पुरेपूर वाट लावत असतो, प्रत्येक नाही पण बहुतेक तरी असलेच, त्यांना वाटतं की त्यानी फेर-बदल दीले की 'अपन लै भारी!'

कधी कधी तर मुख्य कल्पानाच (Main idea) बदलायला लावतात.. म्हणजे कलाकृती (Design) छान आहे पण...पण कल्पना बदला!

त्यात पर्याय (Options) पण हवे असतात, आणि ते ही ३-३
आणि अजुन एक कहर म्हणजे, पर्याय १ची कल्पना आणि पर्याय २ची कलाकृती आणि पर्याय ३चा मजकूर! म्हणजेच थोडक्यात भेळ करून द्या! तुम्ही जसं दिलय ते जर तसं च्या तसं हेतलं तर.. ते नियमात बसत नसेल त्यांच्या!

काल्पलाशक्तीताचा बलात्कार (creative rape) करतात आमचे ग्राहक! आणि मग तेच ग्राहक, प्रत्यक्ष ग्रहकाच्या खिश्याचा करतात...

एकूण काय तर 'हम उन्हें क्ष बनाते है, बाद मै वो हमें क्ष बनाते है, अंत में सब क्ष बन जाते है.'

कटू सत्य!

#सशुश्रीके (वैतागलेला कल्पनाशक्ती कर्मचारी)

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...