जॉब हवाय... जॉब
जॉब हवाय... जॉब
माझा पहिला प्रश्न देवाला, मला जॉब मिळेल का!?
अतिशय बेसिक प्रश्न, बेसिक वाटत असला तरी खुप मोठा असतो हां प्रश्न जेव्हा तुम्हाला 'एक्स्पीरीयंस' नावाचा शिक्का नसतो!
माझा मित्र नीलम आणि मी 'जॉब मिळेल का रे आपल्याला!?' असा प्रश्न विचारत असायचो एकमेकांना,
पुण्याच्या गल्ली बोळातल्या एड-एजेंसीजना इंटरव्यू द्या वगैरे चालू होतं, अगदी कॉलेजच्या ३ऱ्या वर्षा पासूनच, कारण जॉब सांभाळुन कॉलेज करायचे काही थोर मित्र, त्यांचा आदर्श होता डोळ्या समोर!
पुण्यात मुद्रा प्रिंटिंग प्रेस मध्ये २वर्ष पार्ट टाइम, त्यानंतर कॉलेज संपल्या संपल्या सकाळ प्रेस मध्ये काम केलेले, पण एडवरटाइजिंग इंडस्ट्री चा अनुभव झीरो! त्यात पुण्यात एडवरटाइजिंग म्हणजे दुधात पाणी, मुंबईच आपली भूक भागवु शकते, त्यामुळे मुंबईत काम करण्याची स्वप्न पहात होतो, त्यात मी लहानपण मुंबईतल्या बोरिवलीतच अनुभवलं. पुण्यात ६वी ते डिप्लोमा पर्यन्त होतो, परत मुंबईत आलो, नोकरीसाठी, आता कसं ते सांगतो.
कॉलिग्राफीचे 'अमिताभ' श्री.अच्युत पालव. ह्यांना माझं काम आवडायचं, त्यांच्यासाठी काम पण केलेलं मी एक दोनदा, मला म्हणाले तू पुण्यात सड़तोयस, मुंबईत ये एकदा, वेळ काढून, तुझ्यासाठी इंटरव्यू सेट करु, तुला नक्की जॉब मिळेल.
मी सकाळ पेपर्स मध्ये होतो तेव्हा, आठवडा भराची रजा घेतली, मुंबईतल्या प्रावसा बद्दल सखोल ज्ञान नव्हतं, प्रवासाला सेंट्रल / वेस्टर्न / हार्बर लोकल असते आणि खिशात (जास्त) पैसे असले की टैक्सी / रिक्शा असते ह्या पलीकडे जास्त पाहिलं नाही मी मुंबई कड़े. बोरीवली, दहिसर, जोगेश्वरी,दादर, किंग सिर्कल ह्यपालिकडे कधी फीरलोही नाही मुंबईत, एकदातर गर्दी नव्हती म्हणून चुकून लेडीज बोगीत शिरलेलो आठवतय, आतला भिकारी मुलगा म्हणाला.. कहा चढ़े, ये तो लेडीज डिब्बा है, किंग सर्किलच्या त्या हार्बर लाइन प्लेटफॉर्म वर जमीनीवरचा सुपरमैन रंगवला मी.. असो.... मैन मुद्दा. पालव सरांनी ५-६पत्ते दीले इंटरव्यू, प्रभादेवी, कमला मिल्स अश्या अजुन ३-४ठिकाणी, मी आणि माझ्या बरोबर आई, हो हो, त्यात काय लाजायचं! मला मुंबईची माहिती जास्त नाही त्यात दिलेल्या जागी न चुकता आणि वेळेत जायचं इंटरव्यूला, आई थांबायची रीसेप्शनला, आता आठवतं, मी असतो त्या एजेंसी मध्ये आणि मझ्यासमोर कोणी आइला घेऊन इंटरव्यू साठी आलं असतं तर मी किती हसलो असतो, कशी खिल्ली उडवली असती वगैरे, पण आत्ता तेव्हा नाही, तेव्हा परिस्थिती वेगळी होती, मला जॉब हवा होता, 'तुला काय करायचय जॉब करून, बाबांनी कमवून ठेवले आहे ना' हां जो नातेवेकांचा टोमणा असायचा तो लाहांपणापसुन झोंबायचा. अभ्यासात जरी 'ढ' असलो तरी मी मला आवडणाऱ्या विषयात बऱ्यापैकी चांगला होतो, आणि त्याची मला कल्पनाही होती.
असो, किंगसेर्कल हून रोज गानू काका काकू आणि अजोबांचा आशीर्वाद घेत आई बरोबर इंटरव्यू ला जा, असे ४दीवस संपले, वीकेंड आला, आता कसले इंटरव्यू, आत्ता पर्यन्त दीलेल्या इंटरव्यूजचा 'नो रिप्लाय' लक्षात घेत, पुण्यात परत जायचा निर्णय घेतला, शुक्रवार असेल, ट्रेन मध्ये बसलेलो, मोबाइल वाजला, मी उचलणार पण कट झाला, पालव सर कॉल करत होते, मी आई कड़े पाहिलं, आई म्हणाली कर त्यांना कॉल, मी ज़रा घाबरतच कॉल केला, उचलल्या उचलल्या म्हणाले उद्या अमुक अमुक वाजता अमुक अमुक ठिकाणी जा तिथे, मी त्यांना मधेच तोडत म्हणालो, सर मी परत चल्लोय पुण्याला आत्ता, ट्रेन मधुनच बोलतोय. ते जाम भडकले, म्हणाले तुझाकरीता मी इंटरव्यूज सेट करतोय आणि तू मला न विचारता परत काय चाललायस!? मी काय उत्तर देणार ह्यावर, गप ऐकून घेतलं आणि म्हणालो "सर थोड़ा वेळ द्या मी आत्ताचा जॉब सोडतो आणि परत येतो मुम्बईला, प्लीज रागउ नका." त्यांनी रागानी फोन ठेऊन दीला.
१५-२०दिवसानी मी परत आलो मुंबईत, ह्यावेळी एकटा, ४दिवसांचा मुंबई अनुभव होता पाठीशी, पहिलाच इंटरव्यू 'बेट्स' मध्ये, बऱ्यापैकी मोठी एजेंसी, आम्बेरकर म्हणून एक कॉन्टेक्ट दिलेला सरांनी, ६ला भेटायला बोलावले आहे असे संगीतलेले, स्टेशन हून आझाद मैदान क्रॉस करात इसएनडीटी कॉलेज शोधून एजेंसी गाठे पर्यन्त ६.४०झाले, मी लगबगींनं लिफ्ट मधून वर आलो, लिफ्ट मधून बाहेर पडताच आंबेरकर मला बघुन 'तू समीर का!? मला ज़रा एका ठिकाणी जायचे आहे.. तू आत जा आणि मनशा छटवाल नावाच्या मुलीला भेट, ती तुझा इंटरव्यू घेईल..." असं सांगत लिफ्ट मध्ये घुसले, मनात म्हणालो इतकी मस्त एजेंसी आणि नेमका उशीर, आता भेट कोणातरी मनशाला न जा घरी हात हलवत. मी आत गेलो, ६नंतरची वेळ आणि दुसऱ्या दीवाशी वीकेंड त्यामुळे जास्त कोणी नव्हते, मी हाय हेल्लो केले मनशाला, बोप्पकट, टीशर्ट जीन्स, टिपिकल एडवरटाइजिंग मेटेरियल होती ती, माझं नाव गाव विचारात पोर्टफोलियो बघायला सुरुवात, माझ्या कामाची सीडी पाहायला लागली, काम खुप आवड़लं, २-३दा विचारलं ही! 'ये तुमने किया है!?... wow this is good stuff... ' अश्या स्तुतीसुमनांची उधळण करीत म्हणाली की 'फिल्हाल तो कोई ओपनिंग नहीं है, but we can hire you as a freelance visualiser...' मी तीला माझा नंबर आणि सीडी दिली आणि थैंक्स वगैरे म्हणत आभार प्रदर्शन केले. पुढे महीनाभर जॉब केला तिथे, टाटा लाइट सॉल्ट, कोका कोला, स्प्राईट सारख्या मोठ्या ब्रांड्स वर काम केले, लवकरच रामलो तिथे, पुढे मनशानी जॉब सोडला असे कळले, तीचा फोन आला, म्हणाली मी एवेरेस्ट नावाची एड एजेंसी ज्वाइन करत्ये, तुला तिथे जॉब हवा असेल तर कळव, 'बेट्स एजेंसी' मधून मी 'एवेरेस्ट एजेंसी' ला जम्प मारली, इंटरव्यू झाला, राजुल आणि मिलिंद धैमाडे तेव्हा एवेरेस्ट एजेंसीचे इसीडी (एक्झिक्यूटिव क्रिएटिव डिरेक्टर) होते, त्याना काम आवड़लं, सांगितलेल्या पगारावर नोकरी मिळाली... आणि माझी खऱ्याख़ुऱ्या अर्थानी सुरुवात झाली, इंटरव्यू मधून बाहेर पडल्या पडल्या पालव सरांना कॉल केला, झालेली बातमी कळवली, मग कुठे बरं वाटलं.
पालव सरांच्या माझ्यावरच्या विश्वासनी आणि त्यामुळे पुण्यातला होता तो जॉब सोडायचं धाडस कल्यानी मी मुंबईत शेवटी जॉब मिळवला, अहोरात्र काम, लेट नाइट्स, मजा, मित्र, पार्ट्या, ग्लैमर, सगळं अनुभवलं, वीकेंड पुणे, वीकडेज मुंबई करून वैतागलो, म्हणून आई आणि अमृतालाच मुंबईत बोलावलें, मामाच्या जोगेश्वरीच्या फ्लैट मध्ये ६महीने काढले माझा पहिला जॉब 'बेट्स' नंतर आत्ता पर्यन्त मी कधीच कोणाच्या शिफारसीने जॉब मिळवला नाही.
एवेरेस्ट ब्रांड सोलूशन्स मध्ये ३वर्ष जॉब करून दबईतून कॉल आला, तो ही माझं काम इंटरनेटवरील एका साइट वर बघुन, त्यानंतर दबईत आत्ताची माझी ३री एजेंसी, एकूण १०वर्षात ४मेजर जॉब अजेंसित काम केले, काही जूनियर्स सीनियर्स झाले, पण त्याबदल अभिमान आहे, दे डिज़र्व टू बी देर!
एकूणच मुंबई आणि पालवांच्या माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मी जो कोण आज आहे तो आहे,
अर्थात आई बायको आणि मित्रांचाही वाटा आहेच! दशका पूर्वी जॉब हवाय जॉब...मिळेल का कधी!? असा विचार करणारा मी,दशका नंतर मागे वळून पाहताना, त्या प्रत्येक व्यक्तीचे, अगदी कैंटीन वाल्यापासून, त्या केबिन वाल्या साहेबाचे, मनापसून आभार त्या सर्वांचे!
#सशुश्रीके | २/२/२०१५ पहाटे ३.३३

Comments
Post a Comment