रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण...
सादर करीत आहे,
रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण...
उच्च-दहा प्रसंग!
रक्तदाब वाढवणारे काही नकारात्मक क्षण...
उच्च-दहा प्रसंग!
१ ) गावाला जाताना एसटीच्या / मुंबईतल्या मुंबईत बेस्टच्या / माजी पुणे-पीएमटीच्या खिडकीच्या स्वैर नकारात्मक धोरणामुळे बोटांवर होणारा आघात!
२ ) दुचाकीवर नीम-जलद गतीने जाताना मध्येच रस्त्यावरचा खड्डा दृष्टिक्षेपात उशीरा शिरल्यानी होणारा 'खड्यात जा!' चा आत्म-आविष्कार.
३ ) शिंकं + लघु / दीर्घ शंका ह्याचा मिलाप.
४ ) फटाका हातात घेऊन हवेत भिराकवुन देण्याचा असफल प्रयत्न.
५ ) वीज गेलेली असताना / काळोखात शेवटची पायरी आहे / नाही ह्याचा बेताल अंदाज.
६ ) गलेभेट किंवा परदेशी गाल-चुम्बन देताना, प्राधान्य नेमक्या कुठल्या बाजूस द्यावे ह्याचे आजतागायत न कळलेले गणित.
७ ) चारचौघात व्हस्ताप वरून आलेल्या भलत्या सलत्या ध्वनी/चित्रफीतींचा उच्च आवाजात होणाऱ्या क्षणिकस्फोटने होणारा मनःस्ताप.
८ ) थेट प्रक्षेपण असलेल्या सामन्याच्या शेवटच्या टप्य्यातले काही रोमहर्षक क्षण बाकी असताना (पूर्वी हमखास) वीज जाणे / (पूर्वी) व्यत्यय किंवा बातम्या लागणे / (नेहमी) घरी पाहुणे येणे.
९ ) धावपळ करूनही डोळ्यासमोरून एसटी/बेस्ट/पीएमटी/ट्रेन/लोकल सुटणे.
१० ) काम/कष्ट करताना घाईगडबाडीत पाहिजे ती दक्षता न घेतल्यानी वाया जाणारे काम/कष्ट!
इन इंग्लिश दे कॉल इट 'थ्रिल', हिंदीमें 'रोमांचक' आणि मराठीत 'उत्तेजक' ते हेच!
#सशुश्रीके । ०७ ऑक्टोबर २०१५
Comments
Post a Comment