Posts

Showing posts from November, 2014

एक दिन अचानक...

एक दिन अचानक... एक शहर चमकीली काली रातें खून बलात्कार पार्टीया रौनक फूटपाथ ऐश  अफेयर दोस्त नाजायज अपने पराये खून के बाद खून न समझ पाया कोई कौन है जो सताए उन औरतो को कर जाए कतल हर दो हफ्ते  पुलिस हैरान...  न आगे बढे तेहक़ीक़ात हर एक पुलिस जो करे हो जाए अलग...  केस के आगे केस...  कौन है ये जो जीते हर रेस ना कोई ट्रेस...  जासूस आए.. आए लेके कई हल, बढती गई दलदल बढती गई खुनोकी श्रृंखला अभी भी कुछ नहीं बदला बस था किसी का वो अब कोई नहीं था उसका... अब ले रहा है इन्तकाम उसके साथ जो हुआ जिसने किया उसे..ना पता जिसके साथ किया उसे भी ना भनक To be continued...

कर्मभूमी

Image
कर्मभूमी  किदर से आती ~ मुम्बई, इंडिया ओह्हो शारुख अमिताभ ~ हाहा यस यस हा संवाद घडलेला जेव्हा मी पहिल्यांदा दुबैच्या इमीग्रेशन काउंटर वर पासपोर्ट दाखवत होतो...  इथे सर्वांना येतं हिंदी... (मल्यालींना सोडून) उर्दू आणि हिंदी बहीण भावासारखे... त्यामुळे  + बॉलीवुड आहेच जगप्रसिद्ध!  टैक्सीवाल्या पासून ते अगदी लोकल अरब्याला हिंदी समजतं!  आणि बोलतात ही "क्या करती.. कहा जाती" टाइप्स आणि तुमचं नशीब ज़रा अतीच गांX असेल तर मराठी समजणारे लोकलही आहेत दुबैत...  माझे दोन मित्र गेलेले एका मीटिंगला... प्रेजेंटेशन झालं वगैरे...  मीटिंग नंतर त्यातला एक मराठीत बोलायला लागला 'हे अकाउंट मिळायला हवं' वगैरे...  समोर बसलेला शेख म्हणाला हो हो मिळेल मिळेल!!!  नशीब काही भलतं सलतं बोलला नाही...  नाही तर अपुन लै शहाने... अन... लेने के देने! बाकी दुबईमध्ये मुम्बई पासून दिल्ली आणि कोलकत्या पासून चेन्नईच्या सर्व खाद्याविष्कार मिळतात...  आणि अगदीच जर नाही मिळाले  आणि खुपच खाज, पैसा आणि माज अ...

नावं विचारा रे… 'नावात काय ठेवलाय?' असं म्हणतात! चुकीचं म्हणतात!

Image
 नावं विचारा रे… 'नावात काय ठेवलय?' असं म्हणतात! चुकीचं म्हणतात! आपल्या जीवनात खूप लोकं येतात न जातात त्यांची नावंपण माहित नसतात आपल्याला भंगारवाला पंचरवाला पोस्टमन फाटाकेवाला हे सगळे म्हणजे वर्षानुवर्ष दिसणार, हसणार, व्यवहार करणार पण आपल्याला साधी त्यांची नावं पण माहिती नसतात बालचित्रवाणी पाहायचो दुपारची… १ वाजता शाळेतून घरी आलो की नित्य्नियमानी तेच तेच प्रोग्राम्स असायचे पण मनाला भावणारे त्यामुळे कधीच कंटाळा यायचा नाही आणि तेव्हा सतराशे सठ चैन्नल्स ही नव्हते असो… एक पोस्टमन वरती छोटी फिल्म होती एक अपंग मुलगी असते एका घरी तिला हा पोस्टमन काका नेहमी पत्र आणून द्यायचा तिला लक्षात आले की पोस्टमन काका चपला नाही वापरत ती पैसे जमवून मोच्याकडून व्हाणा बनवून घेते पुढच्या वेळी जेव्हा पोस्टमन काका तिच्या घरी पत्र द्यायला येतो तेव्हा ती मुलगी त्याला व्हाणा देते... त्याला गहिवरून येतं, त्याला कळत नसतं की कसे आभार मानावेत... त्याला राहवत नाही म्हणून त्याला पडलेला एक प्रश्न विचारतो... 'ताई तुला माझ्या पायाचं माप तरी कसं कळालं!' फ्लाशबैक मध्यॆ ती पोस्टमनच्...

लगी रहे आनी जानी :)

लगी रहे आनी जानी :) वात प्रवृत्ती का काय ते म्हणतात ती माझी आहे, सकाळी गजर होण्या आधी माझा गजर होतो, पण फक्त आवाज हं! ह्याची हमी… आणि कधी कधी अपचन झाल्यास जो काय गोंधळ होतो, तो काय सगळ्यांचाच होतो!… मी अपवाद नाही. माझ्या पाद्ण्याचे कौतुक नाही पण ते दुर्लक्ष करण्याईतके साधे ही नाही! आलापा पासून हरकती वगैरे सागळं अगदी  नित्यनियमानी चालू असतं! आणि मुख्य म्हणजे शरीरास कळते की आपण कुठे आहोत! बाहेर असल्यास 'पादणे म्हणजे काय रे भौ!' आणि घरी म्हणजे 'पाद की मेल्या वात… आपलं वाट काय बघतोयस!' आणि आता त्यात भर म्हणजे माझी पोरगी… काय टमाटम्म पादत असते! आणि काय हसू येतं तिला… जसा काय ऑस्कर मिळाल्यामुळे जो काही आश्चर्यचकीत होण्याचा भाव! अगदी तसा! गालाला हात लाऊन वगैरे तोंडाचा चंबू करून!… ठंडी हवा का झोंका म्हणून 'हम दिल दे चुके सनम' चा सलमान आणि मी! तेव्हा पासून मला आवडायला लागलं… माझं नाव! बायको चिडते... नेहमी असं दाखवते की जणू तिने पहिल्यांदाच माझ्या कडून असं काही ऐकलय! आईला काय घेणं देणं नसतं, निश्कामकर्मयोगाप्रमाणे ती तिचं काम चालू ठेवते! दीपक त...

स्लीप टाइट हैवे ग्रेट फ्लाइट!

आज जाणार माझी लेक मला सोडून... तीन आठवड्यांसाठी म्हणून शक्य तितका वेळ तिच्याशी मस्ती करण्यात घलवाला...  एकची फ्लाइट म्हणून दहा वाजताच निघालो...  शनिवार असल्यानी सुट्टी असणार त्यामुळे ट्रैफिक कमी असा अंदाज होता...  पण दुबई शारजाह बॉर्डर ला बम्पर टू बम्पर ट्रैफिक...  मग काय अन्वयाची सर्व गाणी ऐकून संपली, आता तीला बोर व्हायला लागले होते ह्याची जाणीव होत होती...  तीने चक्क 'आई मला कंटाळा येतोय...' असं सांगून आमच्या संशयावर शिक्कामोर्बत केले!  आलच...एअरपोर्ट असा समजुतीचा एक्का फेकत... पोचल ो!  पार झोपेनी छोटी अन्वया अजुन छोटी दिसायला लागलेली...  पप्पी झप्पी देऊन टाटा बाय बाय केलं!  आता प्रथमच गेल्या दोन वर्षात तीन आठवड्यासाठी पोर दिसणार नाही बाबा विल मिश यू मनी! हैवे अ ग्रेट फ्लाइट... एंड हॅपी जर्नी करत निघाला बाबा... . . . . घरी पोचलो... फोन आला... बाय बाय करायला... बायकोनी फोन दिला मनीला "बाय बाबा...गुड नाईट बाबा... झालं बोलून" उदास बाबा हसला... परत... गुड नाइट मनी....

न फिटणारं कर्ज... एक रुपयाचं

स्कूटर होती माझ्याकडे , हवा कमी झालेली , हवा भरली मग घाटाजवळच्या पंचरवाल्याकड़े , सुट्टे नव्हते , म्हणाला नंतर दे...त्यात काय एवढं,  २-३महिन्यानी त्याच रोड वरुन गेलो , आता स्पेंडर होती हातात न कानात हेडफोन , सुट्टे असून पैसे न देता , घाइत होतो , अर्थात दुर्लक्ष करत , मग अनेकदा गेलो त्याच रोड वरून , त्या गोष्टीला आता दीड दशक होईल , अजुन ही जातो आता सैंट्रो असते , कर्ज वाढत चाल्लैय!  तो रुपया अजुन दिलेला नाहिये , २-३ वर्षा पूर्वी मुद्दामून त्या रोड वर जरा स्लो झालो , खंत अजुनही होती मनात , पण दूकान नव्हतं ते , निराश झालो!  वेळ असून वेळ गेलेली , आयुष्यभर सतावणार ती हवा!  अजुन ही जेव्हा जेव्हा तो हवेचा पाइप हातात घेतो , एक रुपया आठवतो तो!  न दिलेला...  एक रुपया  श्या... वेळीच परतफेड करा रे! वाट नका बघू... नाहीतर प्रत्येक पाइचं न फिटणारं कर्ज फेडावं लागतं... ते पण आयुष्यभर! ‪#‎सशुश्रीके‬ | १६ नोव्हेंबर २०१४ । रात्रीचे १.१२

कुबा... कुबा शोरोव्स्की… (Kuba Skowroński)

Image
॥ श्री ॥ १७ नोव्हेंबर २०१४ कुबा शोरोव्स्की…  (Kuba Skowroński) कुबा नाव ह्याचं... मुळचा पोलैंड वासी... मझाप्रमाणे दुबैत स्थाईक झालेला, पण अतीच टैलेंटेड...  ग्राफ़िक्सची प्रत्येक गल्ली बोळ पिंजून काढ़लेला... वेब म्हणू नका प्रिंट म्हणू नका 3डी म्हणू नका वडीओ एडिट म्हणू नका... सगळं जमतं ह्याला... एक नंबरचा तिखट खाणारा... ह्याला कोल्हापुरी द्या / चिली मिली पराठा द्या... हां त्यातही टबेस्कॉ ओततो अक्षरशः... मागच्याच् महिन्यात त्यानी एक सॉस आणला... 'डेथ सॉस'... तो म्हणे नॉर्मल हॉट सॉस पेक्षा ९००पटीने तिखट असतो, मी एक ड्रॉप ट्राय मारलेला... आयुष्यात कधी नाय करणार >.< बाकी अजुन एक अफलातून भयंकर वैशिष्ट्य म्हणजे... रोखठोक / स्पष्टवक्ते पणा... आपण जे मनातल्या मनात शिव्या घालत बोलतो तेच हा माणूस तोंडानी बोलतो... कोणीही असो.. मी असो, कोणी मुलगी असो किव्वा बॉस असो!!! एकदा तर वीकेंडला बोलावल म्हणून जाम उखडलेला... बॉस ला म्हणाला 'तू आणि कंपनी किती कमवता मला काही घण देण नाही...मी माझ्या गर्लफ्रंड ला गेले दोन आठवड़े भेटलो नाह्ये!!' असा हा कुबा... बिंदास शिंक...

हरत कोणी नाही!

Image
तसा कुठल्याच खेळात मी जास्त 'जोरात' नाही! क्रिकेट असो फुटबॉल साधे पत्ते पण… ते आपलं सात-आठ, पाच-तीन-दोन पर्यंतच मजल… सगळच अगदी 'बेसिक लेव्हल' असलेलं पण खेळ हा ज्या त्या परिस्थिती वर खेळला जात असतो! गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करायचं नसेल तर बाद झालच नाही पाहिजे… हे झालं रोजच्या खेळण्या बद्दल! पण जर सामना प्रतीश्ठेचा असेल तर स्वतःला बाद करवून, जास्त 'लायकीच्या' सहकार्यास सामना जिंकण्यास मदत करणे… ते करायलाही जिगर लागते! कोणी म्हणेल हा असला कसला खेळाडू! अह्हो पण 'स्किल' लागतं, सध्यासुद्या माणसाचं काम नाही ते! ११ खेळाडू लागतात त्यातले अर्धे तंबाखू बिड्या मारून खंगलेले! आम्ही खंग्लेलो नसलो तरी पातळ दुधाच्या अदृश्य साई प्रमाणे! लास्ट ईयरची स्टोरी २००३-०४… लास्ट ओव्हर जिंकायला १०-१२ हवे असतील मी नेहमीप्रमाणे बौन्ड्री लाइनीवर दगडी मोजणारा… सुर्य मस्त डोळ्यासमोर, संध्याकाळ दुपार चीरफाड करू घातलेला समय, तेवढ्यात आवाज आला 'टाक्क'… लक्ष गेले… शंत्या, अम्या बोंबल्ले "सम्या… सम्या… अडव बॉल!" तो बॉल हवेतून जमिनीवरून गोलांट्या उद्या म...

हनुवटी वरची रेश!

Image
हनुवटी वरची रेश! सदाशिव अमरापुरकर, जिम क्येर्रि... झालच तर फ्रेंड्स मालिकेतला जोई असे मोजकेच चेहरे आहेत ज्यांना हनुवटी वर एक रेश आहे! ती रेश आवडते...पण लहानपणी ज़रा अतीच आवडायची, आणि आपल्याला का नाही दिली देवानी असा सारखा विचार यायचा मनात... एसटी, बेस्ट बस वगैरे मध्ये जाळी असायची ना त्या पहिल्या सीट मागे बसायचो... न चुकता अगदी किती ही गर्दी असली तरी माझा छोटा जीव मावयचा कुठेही... बोटामध्ये त्या तारा पकडत... वाळणांवर बॅलन्स मारत... हनुवटी त्या तारेच्या मध्ये रुतवून ठेवायची, प्रवास संपला की अक्खी ५ ते १० मिनिटं टिकायची ती 'रेश' पण आजुबाजुला आरसा कुठं आहेे का ते बघत... स्टैंड वरती स्कूटर कीव्वा तत्सम वाहन असेल तर त्याच्या आरश्यात नाहीतर मनाच्या आरश्यात हातानी चाचपडत अनुभवायचो ती माझी तात्पुरती हनुवटी 'रेश' अजुन ही कधी कधी हा किस्सा आठवाला की का नाही दिली देवानी ती रेश असा प्रश्न पडतो ×_× #सशुश्रीके | ९ नोव्हेम्बर २०१४ सकाळचे ६.३६

'आठवणींचा छंद'

'आठवणींचा छंद' मला कुठलाच छंद जास्त कालावधीसाठी जोपासता आला नाही! त्यातल्या त्यात माझ्या आठवणीत आहेत नाणी, स्टैम्प, माचिसचे मुखपृष्ठ, सचिनचे फोटोज... अश्या छोट्या आणि परवड़वणाऱ्या छंदांपासून गाड्यांची महागडी स्केल मॉडेल्स... तो छंद अजुनही आहे, पण मंदावलाय! आता छंद आहे लिखाणाचा... अतिशय स्वस्त आणि तसा पाहिला गेला तर खुप महाग! महागापेक्षा भयंकर, वेळ खाणारा. कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि विकत वगैरे...आणि वेळ!?? साधी कल्पना सुद्धा अशक्य. हा असला कसला छंद! मी लिहितो जे घडलं, जसं घडलं अगदी तसं, सर्व आठवणींना न्याय देतो हा छंद, मेलेल्या काही रुसलेल्या, लपलेल्या, काही उनाड, काही दुरावलेल्या, काही जावळच्या 'आठवणींचा छंद' ऐसा छंद तुम्हा सर्वाना लाभों! आत्ता नाही पुढे कधीतरी, एकदा आयुष्यात... १महीना जरी घलवालात, तरी छान ताट सजेल अठवणींचं! लागला ऐसा छंद... शिव्या खातो हल्ली प्रचंड... हातात लेखणी नसून लिहितो अखंड, आठवणींचे दार ना होणे कधी बंद, वेदना कधी दुःख कधी... अश्रु कधी आनंद कधी राक्षस कधी गोविंद... आय कॉल ईट... 'आठवणींचा छंद' #...

क्यालीडोस्कोप!

।। श्री ।। ५ नोव्हेंबर २०१४  अन्वया आज सकाळी उ ठली  नेहमी प्रमाणे काहीनाकाहीरी मागणी असते  बाबा टीव्ही लाव  बाबा गम गम पापा दे  बाबा हे दे बाबा ते दे  आज मागितली शोकेस मधली खेळणी  मी उगाच आपलं गम्मत म्हणून सांगितलं  रडून सांग ना… तीने लगेच रडवेला चेहरा करून रडण्याचा आभिनय… ' बाबा गाडी दे ना…'  मग अजून लांबवला मी प्रकार… आता हसून सांग!…  तीने लगेच हसरा चेहरा करून हसायचा आभिनय…  ' बाबा गाडी दे ना…'  मला मग राहवलं नाही… खुल्जा सीम सीम करून तो खजाना हातात घ्यायला ईतकी सैरभैर झालेली  ही गाडी घेऊ की ती! आणि गाडी सोडून क्यालीडोस्कोप उचलला! खरच त्या क्यालीडोस्कोप सारखं असतं आपलं कधीकधी…   मागतो एक पण प्रत्यक्षात घेतो भलतच! #सशुश्रीके 

अजुन १०वर्षानंतर काय काय असेल!

आत्ताच एक विचार आला मनात... ह्या स्मार्ट फोन नी एंट्री करून ५ वर्ष झाली असतील... कल्पना करा त्या शुमाकर प्रमाणे कोमात गेल्यावर (कालावधी ७-८वर्षाचा ठेवा) जेव्हा परत जगात एंट्री मारतो तेव्ह्हा साध्या फोन वरुन आपण जर डायरेक्ट स्मार्टफोन वर उडी मारली असती! काय अचम्भीत झालो असतो आपण! बटणाचा फोन आणि हां टच स्क्रीन प्रकार... स्क्रीन वरच बटणं, तसच काही ह्या टेक्नोलॉजी इंडस्ट्रीचं आहे, सर्व गोष्टी १०वर्ष पुढे आहेत पण त्या अप्य्ल्या पर्यन्त पोहोचू देत नाहीत! आपण त्याला सामोरे जाण्यास तयार व्हायचा तो कालावधी असावा... २-३ वर्शापुर्वीचा गूगल ग्लास आणि आता गूगल आय! गूगल आय तर पापण्यांवर... अजुन १०वर्षानंतर काय काय असेल! #सशुश्रीके Video Link - Humans Need Not Apply #Technology #Future

सावरकरांना / त्यांच्या विचारांना अखंड आपलंसं करणं महा कठीण आहे...

Image
।। श्री ।। २ नोव्हेंबर २०१४ ३२ वर्ष झाली... त्यातली ५मिनिटासाठी का होइना...  एखाद्याचं बोलणं मला 'नास्तिक' करेल असं बाप जन्मात वाटलं नव्हतं! गेले कित्येक महीने सावरकरांचं भाषण, पु.ल.देशपांडेंनी केलेलं. डाउनलोड करून ठेवलेलं...  आज पाहीन उद्या पाहीन...  वेळ मिळत नव्हता...  म्हणा काढत नव्हतो म्हणा! काल ठरवलं...  बघता नाही येत तर ऐकू तरी!  पुलंना एकणं हे बघण्यापेक्षा पलीकडचं वाटतं मला..  असो... सावरकरांना / त्यांच्या विचारांना अखंड आपलंसं करणं महा कठीण आहे...  असं म्हणाले त्या भाषणात भाई!  सिक्युलरिस्म चा नेमका अर्थ काय तो समजवला... भाई सोडून का गेलात हो...  आम्ही खुप स्वार्थी... तुमच्या विचारांचे...  अजुन असतात तर काय काय पेरलं असतं हो तुम्ही नवीन पीढी साठी! भाई, लव यु बाय बॉटम ऑफ़ माय हार्ट यो! फील इट ‪#‎साशुश्रीके‬ P. L. Deshpande's rare speech on V. D. Savarkar - Part 02 स्वा. सावरकरांनी दिलेले ४५ मराठी शब्द

फ़ैन फोल्लोविंग!

Image
।। श्री ।। १ नोव्हेंबर २०१४, दुपारचे १. ११ फ़ैन फोल्लोविंग! असं म्हणतात ना इंग्रजीमध्ये… तसाच आहे माझा एक पंखा! माझ्या दुबईतल्या कार्यालईन जीवनातला अविभाज्य घटक! इथे लोकं थंडीने कुडकुडत असतात, तरी माझ्या जवळचा माझा छोटा पंखा अखंड चालू असतो! खूप सवय आहे मला पंख्याची! हा पंखा दिला मला माझ्या जुन्या बॉस / मित्रानी, त्याला माहित्ये की मला गरम होत असतं, एके दिवशी वाढदिवसाला हा पंखा दिला त्यांनी! खूप खुश झालो मी! सगळ्यांना आवडतो हा… व्हींटेज लूक आहे, पूर्ण स्टीलचा! दिसायला जेवढा स्टायलीश तेवढाच वागायला ही! मुळीच आवाज नाही! आणि उत्तम हवाफेक! कार्यालयात आल्या आल्या संगणका आधी मी हा पंखा चालू करतो! ह्याचं वय ही बर्यापैकी आहे! ५-६ वर्षं! हल्लीच्या चीनी जमान्यात कुठलीही गोष्ट २ वर्षापेक्षा जास्त टिकणे म्हणजे चमत्कारच! आजू बाजूचे लोक, ज्यांना माझ्यासारख्या अश्या छोट्यामोठ्या गोष्टींची आवड असते, ते हमखास विचारतात… कुठून घेतला हा पंखा, कितीला आणि का!?? हाहाहा… अधीचे २ प्रश्नांची उत्तरं असतात व्यक्ती आणि ठिकाण संबंधी! पण ३रा प्रश्न 'का?' ...