हनुवटी वरची रेश!


हनुवटी वरची रेश!

सदाशिव अमरापुरकर, जिम क्येर्रि... झालच तर फ्रेंड्स मालिकेतला जोई असे मोजकेच चेहरे आहेत ज्यांना हनुवटी वर एक रेश आहे!

ती रेश आवडते...पण लहानपणी ज़रा अतीच आवडायची, आणि आपल्याला का नाही दिली देवानी असा सारखा विचार यायचा मनात...

एसटी, बेस्ट बस वगैरे मध्ये जाळी असायची ना त्या पहिल्या सीट मागे बसायचो...
न चुकता अगदी किती ही गर्दी असली तरी माझा छोटा जीव मावयचा कुठेही...
बोटामध्ये त्या तारा पकडत... वाळणांवर बॅलन्स मारत...
हनुवटी त्या तारेच्या मध्ये रुतवून ठेवायची, प्रवास संपला की अक्खी ५ ते १० मिनिटं टिकायची ती 'रेश'

पण आजुबाजुला आरसा कुठं आहेे का ते बघत...
स्टैंड वरती स्कूटर कीव्वा तत्सम वाहन असेल तर त्याच्या आरश्यात नाहीतर मनाच्या आरश्यात हातानी चाचपडत अनुभवायचो ती माझी तात्पुरती हनुवटी 'रेश'

अजुन ही कधी कधी हा किस्सा आठवाला की का नाही दिली देवानी ती रेश असा प्रश्न पडतो ×_×

#सशुश्रीके | ९ नोव्हेम्बर २०१४ सकाळचे ६.३६











Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!