कुबा... कुबा शोरोव्स्की… (Kuba Skowroński)

॥ श्री ॥

१७ नोव्हेंबर २०१४

कुबा शोरोव्स्की… 
(Kuba Skowroński)


कुबा नाव ह्याचं... मुळचा पोलैंड वासी...

मझाप्रमाणे दुबैत स्थाईक झालेला,
पण अतीच टैलेंटेड...  ग्राफ़िक्सची प्रत्येक गल्ली बोळ पिंजून काढ़लेला...
वेब म्हणू नका प्रिंट म्हणू नका 3डी म्हणू नका वडीओ एडिट म्हणू नका...
सगळं जमतं ह्याला...

एक नंबरचा तिखट खाणारा... ह्याला कोल्हापुरी द्या / चिली मिली पराठा द्या...
हां त्यातही टबेस्कॉ ओततो अक्षरशः... मागच्याच् महिन्यात त्यानी एक सॉस आणला...
'डेथ सॉस'... तो म्हणे नॉर्मल हॉट सॉस पेक्षा ९००पटीने तिखट असतो,
मी एक ड्रॉप ट्राय मारलेला... आयुष्यात कधी नाय करणार >.<

बाकी अजुन एक अफलातून भयंकर वैशिष्ट्य म्हणजे... रोखठोक / स्पष्टवक्ते पणा...
आपण जे मनातल्या मनात शिव्या घालत बोलतो तेच हा माणूस तोंडानी बोलतो...
कोणीही असो.. मी असो, कोणी मुलगी असो किव्वा बॉस असो!!!
एकदा तर वीकेंडला बोलावल म्हणून जाम उखडलेला...
बॉस ला म्हणाला 'तू आणि कंपनी किती कमवता मला काही घण देण नाही...मी माझ्या गर्लफ्रंड ला गेले दोन आठवड़े भेटलो नाह्ये!!'
असा हा कुबा...
बिंदास शिंकणारा / पादणारा...
जे लोकं जपून किव्वा चार चौघात टाळतात ते सर्व हा अगदी सहजपणे करणारा...

कुबा शोरोव्स्की!


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!