सावरकरांना / त्यांच्या विचारांना अखंड आपलंसं करणं महा कठीण आहे...

।। श्री ।।

२ नोव्हेंबर २०१४

३२ वर्ष झाली...
त्यातली ५मिनिटासाठी का होइना... 
एखाद्याचं बोलणं मला 'नास्तिक' करेल असं बाप जन्मात वाटलं नव्हतं!

गेले कित्येक महीने सावरकरांचं भाषण, पु.ल.देशपांडेंनी केलेलं.
डाउनलोड करून ठेवलेलं... 
आज पाहीन उद्या पाहीन... 
वेळ मिळत नव्हता... 
म्हणा काढत नव्हतो म्हणा!
काल ठरवलं... 
बघता नाही येत तर ऐकू तरी! 
पुलंना एकणं हे बघण्यापेक्षा पलीकडचं वाटतं मला.. 
असो...

सावरकरांना / त्यांच्या विचारांना अखंड आपलंसं करणं महा कठीण आहे... 
असं म्हणाले त्या भाषणात भाई! 
सिक्युलरिस्म चा नेमका अर्थ काय तो समजवला...
भाई सोडून का गेलात हो... 
आम्ही खुप स्वार्थी... तुमच्या विचारांचे... 
अजुन असतात तर काय काय पेरलं असतं हो तुम्ही नवीन पीढी साठी!
भाई, लव यु बाय बॉटम ऑफ़ माय हार्ट यो! फील इट


‪#‎साशुश्रीके‬



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!