लगी रहे आनी जानी :)

लगी रहे आनी जानी :)
वात प्रवृत्ती का काय ते म्हणतात ती माझी आहे,
सकाळी गजर होण्या आधी माझा गजर होतो,
पण फक्त आवाज हं!
ह्याची हमी…
आणि कधी कधी अपचन झाल्यास जो काय गोंधळ होतो,
तो काय सगळ्यांचाच होतो!…
मी अपवाद नाही.

माझ्या पाद्ण्याचे कौतुक नाही पण ते दुर्लक्ष करण्याईतके साधे ही नाही!
आलापा पासून हरकती वगैरे सागळं अगदी  नित्यनियमानी चालू असतं!
आणि मुख्य म्हणजे शरीरास कळते की आपण कुठे आहोत!
बाहेर असल्यास 'पादणे म्हणजे काय रे भौ!'
आणि घरी म्हणजे 'पाद की मेल्या वात… आपलं वाट काय बघतोयस!'
आणि आता त्यात भर म्हणजे माझी पोरगी…
काय टमाटम्म पादत असते!
आणि काय हसू येतं तिला…
जसा काय ऑस्कर मिळाल्यामुळे जो काही आश्चर्यचकीत होण्याचा भाव!
अगदी तसा!
गालाला हात लाऊन वगैरे तोंडाचा चंबू करून!…

ठंडी हवा का झोंका म्हणून 'हम दिल दे चुके सनम' चा सलमान आणि मी!
तेव्हा पासून मला आवडायला लागलं… माझं नाव!

बायको चिडते...
नेहमी असं दाखवते की जणू तिने पहिल्यांदाच माझ्या कडून असं काही ऐकलय!
आईला काय घेणं देणं नसतं, निश्कामकर्मयोगाप्रमाणे ती तिचं काम चालू ठेवते!
दीपक तर चीडतोच! स्पेशल्ली तो जेवत असताना मी पाद्लो तर ताटावरून उठतोच!
नीलम सुरश्री आणि ईतर जवळचे मित्र… त्यांना सवय झाल्ये,
ते म्हणजे आपलेच दात आपलेच ओठ ह्या भावनेने इग्नोर मारतात…
अन्वयाला काय, तीला मजा येते!… तडीक हास्यक्लब चालू होतो!

आणि कधी कधी आवाज नाही आला तर तिथूनही ऐकावं लागतं!
म्हणे आज शांत कसा रे शंख तुझा!

सो... करो तो बदनामी ना करो तो मेहेरबानी!
दबाओ तो परेशानी…
कभी लगे गुर्बानी, कभी कुर्बानी!
तबीयत खुश हो जानी, जब जब…
लगी रहे आनी जानी :)

#साशुश्रीके | १९ नोव्हेंबर २०१४ संध्याकाळचे ६.३६

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!