स्लीप टाइट हैवे ग्रेट फ्लाइट!

आज जाणार माझी लेक मला सोडून...


तीन आठवड्यांसाठी म्हणून शक्य तितका वेळ तिच्याशी मस्ती करण्यात घलवाला... 


एकची फ्लाइट म्हणून दहा वाजताच निघालो... 

शनिवार असल्यानी सुट्टी असणार त्यामुळे ट्रैफिक कमी असा अंदाज होता... 

पण दुबई शारजाह बॉर्डर ला बम्पर टू बम्पर ट्रैफिक... 

मग काय अन्वयाची सर्व गाणी ऐकून संपली, आता तीला बोर व्हायला लागले होते ह्याची जाणीव होत होती... 

तीने चक्क 'आई मला कंटाळा येतोय...' असं सांगून आमच्या संशयावर शिक्कामोर्बत केले! 

आलच...एअरपोर्ट असा समजुतीचा एक्का फेकत... पोचलो! 

पार झोपेनी छोटी अन्वया अजुन छोटी दिसायला लागलेली... 

पप्पी झप्पी देऊन टाटा बाय बाय केलं! 

आता प्रथमच गेल्या दोन वर्षात तीन आठवड्यासाठी पोर दिसणार नाही
बाबा विल मिश यू मनी! हैवे अ ग्रेट फ्लाइट...
एंड हॅपी जर्नी करत निघाला बाबा...
.
.
.
.
घरी पोचलो...
फोन आला...
बाय बाय करायला...
बायकोनी फोन दिला मनीला
"बाय बाबा...गुड नाईट बाबा... झालं बोलून"
उदास बाबा हसला...
परत...
गुड नाइट मनी...
स्लीप टाइट हैवे ग्रेट फ्लाइट!
 
लव या अन्वया!

‪#‎सशुश्रीके‬ | १६ नोव्हेंबर २०१४ । रात्रीचे १.१२

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!