क्यालीडोस्कोप!

।। श्री ।।

५ नोव्हेंबर २०१४ 

अन्वया आज सकाळी उठली 
नेहमी प्रमाणे काहीनाकाहीरी मागणी असते 
बाबा टीव्ही लाव 
बाबा गम गम पापा दे 
बाबा हे दे बाबा ते दे 

आज मागितली शोकेस मधली खेळणी 

मी उगाच आपलं गम्मत म्हणून सांगितलं 
रडून सांग ना… तीने लगेच रडवेला चेहरा करून रडण्याचा आभिनय… 'बाबा गाडी दे ना…' 
मग अजून लांबवला मी प्रकार… आता हसून सांग!… 
तीने लगेच हसरा चेहरा करून हसायचा आभिनय…  'बाबा गाडी दे ना…' 

मला मग राहवलं नाही… खुल्जा सीम सीम करून तो खजाना हातात घ्यायला ईतकी सैरभैर झालेली 
ही गाडी घेऊ की ती!

आणि गाडी सोडून क्यालीडोस्कोप उचलला!

खरच त्या क्यालीडोस्कोप सारखं असतं आपलं कधीकधी…  
मागतो एक पण प्रत्यक्षात घेतो भलतच!


#सशुश्रीके 

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!