हरत कोणी नाही!

तसा कुठल्याच खेळात मी जास्त 'जोरात' नाही!
क्रिकेट असो फुटबॉल साधे पत्ते पण…
ते आपलं सात-आठ, पाच-तीन-दोन पर्यंतच मजल…
सगळच अगदी 'बेसिक लेव्हल' असलेलं

पण खेळ हा ज्या त्या परिस्थिती वर खेळला जात असतो!
गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करायचं नसेल तर बाद झालच नाही पाहिजे…
हे झालं रोजच्या खेळण्या बद्दल!
पण जर सामना प्रतीश्ठेचा असेल तर स्वतःला बाद करवून,
जास्त 'लायकीच्या' सहकार्यास सामना जिंकण्यास मदत करणे…
ते करायलाही जिगर लागते! कोणी म्हणेल हा असला कसला खेळाडू!
अह्हो पण 'स्किल' लागतं, सध्यासुद्या माणसाचं काम नाही ते!
११ खेळाडू लागतात त्यातले अर्धे तंबाखू बिड्या मारून खंगलेले!
आम्ही खंग्लेलो नसलो तरी पातळ दुधाच्या अदृश्य साई प्रमाणे!

लास्ट ईयरची स्टोरी २००३-०४…
लास्ट ओव्हर जिंकायला १०-१२ हवे असतील
मी नेहमीप्रमाणे बौन्ड्री लाइनीवर दगडी मोजणारा…
सुर्य मस्त डोळ्यासमोर, संध्याकाळ दुपार चीरफाड करू घातलेला समय,
तेवढ्यात आवाज आला 'टाक्क'…
लक्ष गेले… शंत्या, अम्या बोंबल्ले "सम्या… सम्या… अडव बॉल!"
तो बॉल हवेतून जमिनीवरून गोलांट्या उद्या मारत त्या फालतू दगडी मैदानातून १२० च्या स्पीड नं…
डोळे त्यावर… आणि त्याचे बौन्ड्री वर… माझ्या आधी माझ्या हातानी बॉल पाहिला…
असला पकडलाय काय सांगू!... डाय का काय ते मारून भिरकाव्लान मी बॉल, रन ओउट!
रन ओउट… होता होता वाचला हो!

धड धड संपली… हाताकडे लक्ष
पांढरा हात मग त्यावर माती त्या दोघांच्या मध्ये रक्त…
असलं ते जखमी सैंडविच घेऊन प्रासंगिक देवा कडे पोचव्लं पोरांनी…
सामना चालू होता… नंतर कळालं हारलो!

लास्ट इयरच्या पोरांना सेकंड इयरच्या पोरांनी हरवलं ना र्राव!
हार जीत तो होती रेहती ही वगैरे सगळं च्युत्यपा अस्तं…
खेळात जिंकल'च' पाहिजे!

जिंकलं की किंमत 'मिळते', न हारलं की 'कळते!'
आम्ही जिंकता जिंकता हरलो!
काय नाय… नंतर कुठला सामना खेळलोच नाय…
हराय्चं दु:ख नको न जिंकायचं सुख नको!

पण पोरांना खेळताना बघताना मजा येते!
आपण प्रेक्षक म्हणूनच बरे…
आता ४-५ महिन्यातुन तो बॉल हातात घेतला की ते रक्तबम्बाळ सैंडविच आठवते!
आणि त्या न दुसर्या दिवशी गरम पाण्याची अंघोळ करायला शरीर ब्ल्याक तिकीट मागते!

असो…
खेळात जिंकल'च' पाहिजे! होय होय…
पण जिंकायला खेळलच पाहिजे असं थोडीच आहे!
प्रेक्षक जिंकतो…
खेळाडू खेळतात…
हरत कोणी नाही!



 #सशुश्रीके | १० नोव्हेंबर २०१४, सकाळचे १०.४४


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!