फ़ैन फोल्लोविंग!

।। श्री ।।

१ नोव्हेंबर २०१४, दुपारचे १. ११

फ़ैन फोल्लोविंग!
असं म्हणतात ना इंग्रजीमध्ये…
तसाच आहे माझा एक पंखा!
































माझ्या दुबईतल्या कार्यालईन जीवनातला अविभाज्य घटक!

इथे लोकं थंडीने कुडकुडत असतात, तरी माझ्या जवळचा माझा छोटा पंखा अखंड चालू असतो!
खूप सवय आहे मला पंख्याची!
हा पंखा दिला मला माझ्या जुन्या बॉस / मित्रानी, त्याला माहित्ये की मला गरम होत असतं,
एके दिवशी वाढदिवसाला हा पंखा दिला त्यांनी! खूप खुश झालो मी!
सगळ्यांना आवडतो हा… व्हींटेज लूक आहे, पूर्ण स्टीलचा!
दिसायला जेवढा स्टायलीश तेवढाच वागायला ही!
मुळीच आवाज नाही! आणि उत्तम हवाफेक!

कार्यालयात आल्या आल्या संगणका आधी मी हा पंखा चालू करतो!
ह्याचं वय ही बर्यापैकी आहे! ५-६ वर्षं!
हल्लीच्या चीनी जमान्यात कुठलीही गोष्ट २ वर्षापेक्षा जास्त टिकणे म्हणजे चमत्कारच!
आजू बाजूचे लोक, ज्यांना माझ्यासारख्या अश्या छोट्यामोठ्या गोष्टींची आवड असते,
ते हमखास विचारतात… कुठून घेतला हा पंखा, कितीला आणि का!??
हाहाहा… अधीचे २ प्रश्नांची उत्तरं असतात व्यक्ती आणि ठिकाण संबंधी! पण ३रा प्रश्न 'का?'
का असतो हा प्रश्न…
मी असला कटाक्ष टाकतो त्या व्यक्ती कडे कि परत तो प्रश्न विचारण्याच्या त्याच्या ईच्छेचा खून झालेला असतो!
बरं वातानुकुलीत यंत्रणेत बिघाड झाल्यास तीच व्यक्ती माझ्याकडे बघून हसते! खून केलेला दिवस आठवतो मग मला!

बाकी आता हा पंखा जरा आतल्याबाजूने धुळीने श्रीमंत होत चालला आहे!
कारण आतल्या पातींपर्यंत कापड पोहोचत नाही ना!
आणि ईतका व्यापलेला असतो काम, फेसबुक, व्हात्साप्प आणि ह्या लिखाणामध्ये,
की त्याला चालू आणि बंद करण्यापुरताच वेळ देता येतो!

बाकी दुबईत आल्यापासून कपाळावरचा तो मोठा पंखा!
त्याची पण खूप सवय होती…
पुण्याच्या त्या कोरड्या उन्हाळ्यात,
आणि मुंबईच्या त्या दमट उकाड्यात हवेचा अमृतवर्षाव कारायचा तो!
त्याची आठवण ही येते!
दुबईत आल्या आल्या एका छोट्या खोलीत रहायचो, जुनी ईमारत असल्यामुळे तिथे होता असा पंखा!

पण फ़ैन फोल्लोविंग वाला माझा कार्यालयातला पंखा सर्वात प्रिय! गेले ६ वर्ष मी जिथे जातो तीथे तो!
मी त्याला 'लोयल' आणि तो मला! देव करो हा पंखा मला आयुष्यभर साथ देओ!


#साशुश्रीके


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!