माय नेम इज जॉर्ज...
माय नेम इज जॉर्ज... (भाग-१) कांसच्या त्या निमुळत्या गल्यांमधुन कधी स्वतःच्या तर कधी कैमेऱ्याच्या नजरेतून मी अखंड पायतोड करत होतो, आजचा दिवस शेवटचा होता, उद्याची फ्लाइट, जितके लवकर निघता येईल तितक्या लवकर रूम सोडलेली, सकाळी ९.४५ वाजले असतील, यूरोपात उन्हाळ्यातला दिवस मोठा... त्यामुळे बऱ्यापैकी सूर्य आग सोडत होता पण कमाल अशी की ती आग कांसला येई पर्यन्त जणू गायब होत होती! असो... गेल्या ५ दिवसात गेल्या ४ वर्षात केली नसेन इतकी पायतोड केली होती, त्यामुळे पायांनी माझ्या शरीराला प्रत्येक पावलावर 'मी किती महत्वाचा अवयव आहे' ह्याची जाणीव करवुन द्यायचे ठरवले होते! त्यात त्या गल्ल्यांयामधुन मध्येच एक ठिकाण असे आले जिथे न संपणाऱ्या पायऱ्या!... आधीच पायांचे १२ वाजलेले, त्यात १३वा मजला, हो हो संपतच नव्हत्या, पण माझा कैमरा आणि मी, जणू तो माझ्या अंगाचाच एक भाग. दोघे न थकता आपापली कामे करत होतो. डोळे मिचकावतो आपण, तसे कैमऱ्याचे शटर पाडत होतो, तेवढ्यात एक म्हातारा,अती म्हातारा नाही पण नक्कीच ६०ठी ओलांडलेला असावा, मला पाहुन म्हणाला की कुठला कैमरा आहे त...