वाईट 'इमोशनल' फजिती

।।श्री।।

नेहमी प्रमाणे मे महिन्यात अलिबाग इसटी ने आक्षीला चाल्लेलो, पुण्यात बसून लोणावळा घाटापर्यंत आली बस, मी रीझर्वेषन केले नसल्यानी ड्राईव्हर च्या बाजूच्या त्या 'न' असलेल्या 'शीटा' वर बसलेलो, अचानक स्पीडोमीटरच्या बाजूचा एक लोखंडी पत्रा थडथड वाजायला लागला, वाफ येत होती… जारावेळनी कुकरची शिटी उडावी तसा कायतरी प्रकार झाला, एसटी थांबवली ऐन घाटात, कंडक्टरसाहेब हातात एसटीतच ठेवलेला एक दगड घेऊन बाहेर उतरले, एकूणच बहुतांश प्रवाशांची फाटली होती, कारण हे अनुभवणारे निदान अर्धे लोक तरी एसटी मध्ये असावेत! आणि तेव्हा आजच्या जमानातल्या सारखे स्मार्ट फोन ही नव्हते, धोक्याला 'नजरअंदाज' करून किंवा धोक्याचा वास घेऊन 'स्ट्रक्ड इन लोनावला, एसटी सक्स' वगैरे अपडेट मारायला!

एसटी मधली २-३मुलं आणि पुरुष वर्ग एसटी बाहेर आला. त्या रणरणत्या उन्हात रस्त्यावर आम्ही धक्का मारायला लागलो, कशीबशी चढावरून नॉर्मल रस्त्यावर आणली. काही नतद्रष्ट लोक अजूनही एसटी मध्ये बसून होते, निर्लज्ज! काही झोपलेले ही! आता आश्या लोकांना काय बोलायचे, शब्द ही आठवत नाही, असो!

कोणीतरी एका बादलीतून जवळच्या विहिरीतून पाणी आणले, ते बाटलीत भरुन वगैरे प्रकार चालू होते, येणारे जाणारे पब्लिक आम्ही 'एलीअन्स' वगैरे असल्या सारखे बघत होते हा सर्व प्रकार! शेवटी मी दुर्लक्ष करून धार मारायला गेलो… परत आलो तेव्हा एसटी नव्हती जिथे मी तीला सोडून गेलेलो तीथे ती नव्हती! कान लाल, माझ्या बाजूला बसलेले काका पण आजूबाजूला दिसत नव्हते, एक स्कूटर वर एक दादा मला बघून थांबला, मला म्हणाला पुढेच 'गराज हाय तिथं गेली हाय एसटी, म्या चाल्लुय त्यीथच, बस मागी… ' माझं समान होतं एसटी मध्ये राहिलेलं, त्या मुलानी मला ग्यारेज जवळ नेले… तिथेही एसटी नव्हती!

आता एकाच पर्याय होता, मागून येणारी दुसरी एसटी पकडली, न लोणावळा गाठलं, यार्डात होती बस… न आवरता येणार्या भुकेला मागे टाकून धावत पळत माझा 'न' असलेल्या सीट पाशी गेलो, तिथे होती माझी ब्याग… निःश्वास टाकला. जीवात जीव आला. असली चीडचीड झालेली, मला अपेक्षित होतं की माझ्याबाजूला बसलेले काका मी नाही हे पाहून कंडक्टर ला सांगतील की एक मुलगा होता माझ्या बाजूला वगैरे…

ते काका आंधळे होते ते नंतर कळाले! त्यामुळे सगळ्या शिव्या तोंडातल्या तोंडातच भिजल्या. त्याच गिळून पोट भरले ही.

ह्या घडलेल्या किस्श्या नंतर एसटी सोडून कधी जायचे नाही हा एक मोठा धडा मिळाला. पण नंतर कधी एसटीत बसायला मिळालच नाही. त्या काकांचा चेहरा आठवला कि तो घडलेला प्रसंग अजून ही काल घडल्यासारखा वाटतो. वाईट 'इमोशनल' फजिती असा काहीसा प्रकार घडलेला! त्यापेक्षा ती एसटी नसती त्या यार्डात तर बरं झालं असतं असं वाटतं कधी कधी! कारण नुसती फजिती पचवता येते!

#सशुश्रीके । १५ जुन २०१५ दुपारेचे १.५९

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!