लहानपण देगा देवा...

॥श्री॥

काल घरी मोबाइल मध्ये काही चित्रपट घुसवले त्यातला 'अमेरिकन स्नायपर' पाहिला आत्ता...
त्याआधी थिन रेड लाइन, शिण्डलर्स लिस्ट, सेविंग प्रायव्हेट रायन... असे एक से एक युद्धपट पहिले आहेत.

प्रत्येक वेळी असले युद्धावरचे चित्रपट पाहिले की घसा कोरडा होतो,
सैनिक आणि त्याचं आयुष्य आणि आपल्या आयुष्यात किती फरक असतो, आपल्या आयुष्याच्या अगदी उलटे! ते युद्ध संपले की (युद्ध संपत नसतात) की मनाशी युद्ध सुरु होतं जगण्याचं, कारण माणूस एका माणसाला मारतो तेव्हाच तो मेलेला असतो, आणि युद्धात तर किती जीव जातात, मोठे असो लहान असो, खुले असो छुपे असो, जगायला मारतो माणूस! कल्पनाच भीषण!!!

सगळेच सैनिक झाले तर!?
किंवा,
कोणीच सैनिक नसेल तर!?
येईल,
असाच एक दीवस येईल...
असेल असाच काहीतरी तो काळा दीवस!

सैनिक तर हवेच, वाइट-चांगले ठरवणार कोण!?
आपल्यासाठी समोरचा पाकिस्तानी की तो वाइट,
अमेरिकन्स साठी समोरचा इराकी की तो वाइट,
कोण कोणाचा नसतो, डोळ्यासमोर लक्ष्य असते, 'टास्क' असतो... देशप्रेम असते... घरी आई असते, बायको असते, मुलं असतात... समोरच्या 'टास्क' मध्ये शेकडो-हजारों असेच 'शहीद' होणारे लढत असतात.
बऱ्याच चित्रपटांत 'काफीर' पण असतो, म्हणजे कोण देश-द्रोह करणारा, आपल्याच देशाला फितूर होणारा, घरचाच भेदी...जिस थाली मै खाता है उसी मै छेद करने वाला, का असा होतो तो!? 'सिस्टम' मध्ये गडबड, कोणाचीच 'सिस्टम' परिपूर्ण नसते! सरफ़रोश मधला संवाद आठवतो, जेव्हा सलीम ला एक 'काफीर' सलीमला म्हणतो की तू 'काफीर' आहेस, 'आमच्या' बाजूने लढ 'आमच्या'तलाच आहेस ना!? त्यावर सलीम उत्तरतो "आप  जैसे चंद लोगों की वजह से पुरे कौम बदनाम होती है", आता हा संवाद खरच सर्व ठिकाणी वापरता येईल असा आहे, जगात वाइट शिकवण देणारे तीतकेच असतील जितके चांगली, पण विजय नेहमी सत्याचा होतो वगैरे भाबळी मते फक्त पुस्तकात राहिली आहेत.
'असत्यमेव जयते' हा नवीन मार्ग निवडतायत, कारण जिंकायला आवडतय, असत्यच जिंकतय...

हे सगळे लिहून मी काय साध्य होणारे माहीत नाही,
युद्धावर आत्ता पर्यन्त लाखो पुस्तके आली असतील,
अजुन ही येतील....
युद्ध काही थांबणार नाहीत,
प्रत्येक देश आपआपल्या हद्दीत घुसणाऱ्या दुसऱ्या देशाला अद्दल घडवाच्या मागे असेल, हे असच चालू राहणार.

कधी कधी वाटतं उगाच मोठा झालो, हे राजकारण, युद्ध, दंगे वगैरे जेव्हा कळत नव्हतं तो काळ... लहान पण म्हणजे काय पाहिजे ते करा, कौतुक, लाड... बिंदास वगैरे गोष्टींपेक्षा वर मांडलेल्या गोष्टीबद्दलचे अदन्यान असणे ह्यात किती सुख होते!

चिंता करितो जगाची,
पण नुसतीच चिंता!
झाट काही करू शकत नाही,
लिहितोय,
लिहून चिडायला जमतय,
दाताला दात घासतायत,
जबडा हलतोय,
आणि कानात हेडफोन्स आहेत...
एकच गाणं अखंड ३०+मिनिटे ऐकतोय,
हो हो, लागोपाठ....
*ऐरावती रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार,
जया अंगी मोठे पण तया यातना कठीण!
तुका म्हणे...*

लहानपण देगा देवा, दे रे दे रे...
लहानपण देगा देगा... देवा दे रे!

#सशुश्रीके | २२ जून २०१५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!