अवदसा!

॥ श्री ॥

आयुष्यात २ गोष्टी असतात त्या फेमस 'ओफ्फिस ऑफिस' मालिकेतल्या सारख्या (वरना २ बातें हो जाएंगी)
१) वेळेत घडणाऱ्या
२) चुकीच्या वेळेत घडणाऱ्या


दोन्ही गोष्टींचे अनुभव सगळ्यांकडे असतात, घडणारी गोष्ट ही अचानक/अन्प्लाण्ड असते उदाहणार्थ अपघात किंवा वेळेत न पोहोच्ल्यानी गाडी सुटणे वगैरे. मी अश्या गोष्टी आठवतोय ज्या ओढावून घेतलेल्या, अर्थात त्यातही २ प्रकार -
१) वेळेत 'घडवून आणलेल्या'
२) 'चुकीच्या' वेळेत 'घडवून आणलेल्या'


वेळेत 'घडवून आणण्यासारख्या' गोष्टींचा माझा जास्त संबंध आला नाही, 'तितका' कर्तुत्ववान मी नाही!
पण चुकीच्या वेळेत 'घडवून आणलेल्या' गोष्टी चिक्कार आहेत त्यातल्या  ठळक घडामोडी म्हणजे माझ्या दहावीचे वर्ष!

नाही कळत आहे का मला काय म्हणायचं? सांगतो एक उदाहरण, एक कशाला २ सांगतो,

• उदाहरण १) १०वीत असतानाची गोष्ट, माझा अभ्यासात भोज्जा होता, अभ्यास म्हणजे सर्व धडे लिहून काढणे त्याशिवाय लक्षात राहणे शक्य नाही, पाठांतर वगैरे लांबची गोष्ट. त्यात बीजगणित आणि भूमिती हे दोन राक्षस अखंड मानगुटीवर अगदी विक्रमवरच्या वेताळासारखे, त्या २ वेताळांचे वजन सहन करत ईतर विषयांना तुडवत कसाबसा ९वी पास झालेलो, आता होती शेवटची कसोटी, दहावी नंतर चित्रं काढायची (कमेर्शअल आर्ट / पैंटींग) असा प्लान, पण त्यातही 'अवदसा' आठवलेली म्हणे मला, ऐन दहावीच्या दिवसात 'स्वयंपाक' कलेत रस आला होता मला, बेसिक मैगी पासून बटाटा भाजी, चाट, परोठे करणं निरनिराळी सरबतं वगैरे करायला लागलो होतो! फुल ऑन फूड-एक्ष्पेरीमेंट! अचानक माझ्या स्वयंपाका बद्दल झालेली ओढ ही चुकीच्या वेळेत 'घडवून आणलेल्या' गोष्टीं पैकी हे निश्चित होणार तीतक्यात त्यात अजून एक भर…

• उदाहरण २) एके सकाळी कुत्र्याची २-३ लहान पिलं आमच्या अंगणात कुई कुई करत होती, त्यातलं एक साफ पांढरं, मी त्याला हातात उचललं, जाम जीव आला त्यावर, माझ्या बोटाला इतकं चाटत सुटलं… मला रहावे ना, त्याला एका स्टीलच्या ताटलीत दुध दिलं, पटापट संपवलं त्यानं, मग काय त्या दिवसा पासून तो जणू माझा भाऊच, असा जपायला लागलो! तो जस जसा मोठा होत गेला तस तसा माझा अभ्यास अजून बोंबलायला लागला, शेवटी बाबांनी त्याला लांब देहू रोड ला वगैरे सोडून दिला, शाळेतून घरी आलो 'जाकी' गायब! आईने झालेला प्रकार सांगितला, त्या 'जाकी' ला देहू रोड वर सोडायला बाबांना किती कष्ट घ्यावे लागले, ज्या टेम्पो रिक्षा तुला त्याला सोडला त्या रिक्षाचे आत्ल्याबाजुने 'जाकी' ने किती नुकसान केले… किती त्रास झाला वगैरे ऐकूनही माझी शोककळा विझेना, दुसर्या दिवशी शाळेतून परत आलो तर 'जाकी' अंगणात उभा! परमानंद… बिछडे भाई मिल गये सारखा सीन! आता मात्र आई - बाबांनी 'गिव-अप' केलेलं, पास झाला तर ठीक नाहीतर 'भगवान मालिक' अशी भावना त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट पणे दिसायला लागली होती!

चुकीच्या वेळेत 'घडवून आणलेल्या' ह्या दोन गोष्टी ईतक्या जिवंत आहेत अजून मेमरीलेन मध्ये! अगदी घडले तसे सर्व आठवते आणि 'काय अवदसा आठवल्ये ऐन १०वीत!' हा शब्द-प्रयोग अगदी ऐकला तसा डोक्यात घुमतो अजून ही!

#सशुश्रीके । १३ जुन  २०१५ (रविवार) । रात्रीचे १.११

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!