Posts

Showing posts with the label review

The Americans, TV Series Review

Image
The Americans ह्या अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजचा पहिला एपिसोड 2013 मध्ये FX चॅनेलवर आला. १०पैकी ८.३ रेटिंग मिळवणाऱ्या या सिरीजचे प्रत्येकी १३ भागांचे पाच सीझन झालेले आहेत. आता शेवटचा, सहावा सीझन मागच्याच महिन्यात सुरु झालेला आहे, गेल्या ५वर्षात ह्या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि आता ती शीगेला जाऊन पोचली आहे. विश्वासावरचा अविश्वास आणि अविश्वासावरती विश्वास किव्वा जो आहे तो कशावरून तोच, जो तुम्हाला वाटत आहे? असं काही तरी अजब कोडं घेऊन ह्या मालिकेची सुरुवात होते. एका रशियन गुप्तहेराला पकडून त्याला 'किडनॅप' करायचे काम आटोपल्यावर कळते की त्याला पकडणारे स्वतः २ रशियन्स गुप्तहेर आहेत, नुसते रशियन्स नाहीत ते एक जोडपं आहे, १९६० मध्येच रशियन्स ने अश्या जोडप्यांना 'तयार' करायला सुरुवात केलेली, त्यापैकीच एक गुप्तहेर जोडपं म्हणजे 'फिलीप' आणि 'एलिझाबेथ', कथानकाचे २ प्रमुख नायक, त्यांची दोन मूलं आणि त्यांच्या शेजारीच राहणारा FBI एजेंट त्याचे कुटुंब ह्यांच्या आजूबाजूला ही सर्व मालिका रंगवण्यात आलेली आहे. फिलिपची ट्रॅव्हल अजेंसी आणि एलिझाबेथ 'हाऊस ...

खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी... ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका. (Series Review)

Image
खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे 'NARCOS' मलिका.   खरा इतिहास आणि सादर केलेली कहाणी ह्यांचा उत्तम मेळ म्हणजे #NARCOS मलिका. अमेरिकेत गुन्हेगार साक्षीदाराला गायब करतो, कोलम्बियात 'पाब्लो' ने कोर्टच गायब केलं! - 'स्टीव्ह मर्फी.' आता हा पाब्लो कोण न हा स्टीव्ह कोण! सांगतो सांगतो... तर हा पाब्लो आहे ना तो खलनायक आहे मालिकेचा, मालिकाचे नाव आहे 'नार्कोस'... (अमली पदार्थांची निर्मिती/तस्करी करणारे ते 'नार्कोस') त्या पाब्लोच्या मागे लागलेला पोलीस म्हणजे स्टीव्ह आणि त्याचा सहकारी पण आहे एक हावी नावाचा, दोघे DEA agent . दोघे मिळून त्या पाब्लोला पकडायला जे शक्य असेल ते सर्व करत असतात, अगदी शेवट पर्यंत! असं सगळं आहे बघा, म्हणजे पोलीस आणि गुन्हेगार ह्यामधली झकाझकी, पण ह्यात वेगळं काय असा प्रश्न पडला असेल! तर वेगळेपण असय की ही कथा सत्य कथेवर आधारित आहे, जवळपास ५ ते १०% भाग रेकॉर्डेड चित्रफितींचा वापर करून सादर केलेला आहे, फारच डोकेबाज पद्धतीने तेव्हाच्या बातम्या आणि काही खाजगी चित्रफीती वापर करून वास्तविकता अजून प्रभावीपणे दाखवण्...

वॉल्टर व्हाइट!

Image
#NowWatching #BreakingBad #Again नाव मिस्टर वॉल्टर व्हाइट, वय एकूणपन्नास. करतो काय!? प्राध्यापक आहे... केमिस्ट्री टीचर. पगार पुरत नाही म्हणून काय करतो!? एका गैरेज मध्ये गाड्या धूवायचं काम! घरी कोण कोण असतं... बायको आणि एक मतीमंद मुलगा. बाकी वॉल्टरचे मित्र, नातेवाइक हे सर्व त्याच्यापेक्षा चांगल्या आर्थिक परिस्थितीतले. त्यात वॉल्टरला कळतं की त्याला कैंसर आहे आणि एक फक्त वर्ष वेळ आहे! पुढे काय... कुटुंबाला कसं सांभाळणार, घर खर्च कसा होणार... पुढे काय... तो घरी ह्या सर्व विचारांनी पाऊल टाकणार, 'सरप्राइज' त्याची जवळ जवळ सर्व मित्र मंडळी आणि जवळचे नातेवाईक त्याच्या घरी त्याला बर्थडे 'सरप्राइज' पार्टी द्यायला आलेले असतात, अर्थात बायकोनी प्लान केलेले असते सर्व, ह्याला हसावं का रडावं कळत नसतं... सगळे आनंदी असतात, त्या सर्व लोकांमधे वॉल्टरचा सालाही आलेला असतो, DEA (Drug Enforcement Administration) मध्ये मोठ्या पोस्ट वर असतो तो, टीव्ही वर न्यूज़ चालू असतात तेव्हा बातमी मध्ये त्याचाच उल्लेख, अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक लोकांना श्रेडर (वॉल्टर चा साला) आणि त्...

'द मार्षन'

Image
'द मार्षन' ३आठवड्यांपूर्वी 'एवेरेस्ट' (आइमैक्स थ्रीडी) पाहिला, मग मागच्या आठवड्यात 'द वॉक' (आइमैक्स थ्रीडी) आणि आज हा!  'द मार्षन' (मैक्स थ्रीडी) तीनही एकसेबढ कर एक!!! 'एवेरेस्ट' आणि 'द वॉक' हे दोन्ही उत्कृष्ट 'थ्रीडी' अनुभाव साठी पहावे असे... आणि 'द मार्षन' खास 'मैट डेमन' साठी पहावा! अप्रतिम गंभीर विषय असून विरंगुळायुक्त अश्या काही विचित्र 'जॉनर'चा 'द मार्षन' ****

Bourne (film series) 2002-2007

Image
Bourne (film series) 2002-2007 आत्ता पर्यंत हॉलीवूड मध्ये खूप चित्रपट येउन गेले, ज्यांचे ३ किंवा त्याहून जास्त भाग आलेत, उदाहरणार्थ Evil Dead, The Austin Powers, Indiana Jones, Back to the Future, The Godfather, Star Wars, The Lord of the Rings, The dark Knight, Terminator, Home-Alone वगैरे! सगळे अफलातून एक-से-एक! ह्यासार्वांमध्ये मला सर्वात भावणारी मालिका म्हणजे The Bourne Identity (2002) The Bourne Supremacy (2004) The Bourne Ultimatum (2007) रॉबर्ट ल्युडीअम च्या The Bourne Series कादंबरीवर आधारीत, जेसेन बोर्नची भूमिका साकारणारा प्रतिभावंत कलाकार मैट डेमन, पार्श्वसंगीताची अप्रतीम साथ देणारा जॉन पॉवेल ह्या सर्व दिग्गज मंडळींना एकत्र आणण्याचे काम डग लीमन, पौल ग्रीनग्रास ह्यांना जाते. ह्या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन डग लीमनआणि नंतरच्या २ भागांचे दिग्दर्शन पौल ग्रीनग्रास यांनी केले. दोन वेगळ्या माणसांकडून एकाच चित्रपटाची हाताळणी होऊनही हा चीत्रपट त्याची 'जात' सोडत नाही! ह्याच चित्रपटाचा चौथा भाग ही आलाय The Bourne Legacy नावाचा, पण त्यात मुख्य कलाकार म्हणजे...

दृष्यम

Image
अप्रतिम थरारक चित्रपट! उत्तम कथानक, छान मांडणी, कमी गाणी, मुळीच नको ते सीन्स नसलेला... डोक्याला विचारांची फोडणी देणारा दर्जेदार - दृष्यम - सुरुवातीला १५-२०मिनिटे काय बोर होतय वगैरे वाटत होतं... पण मग हळू हळू कथानकानी पकड घेतली, वेग वाढू लागला... व्यक्तीरेखा वाढत गेल्या, गुंता वाढत गेला, तब्बू, रजत आणि अजय ची भट्टी मस्तच जमली आहे! आणि दिग्दर्शक कामत आणि बाकीच्या मराठी कलाकार मंडळींनी आपआपल्या भूमिकेत उत्तम काम केल्यानी 'यू विल बी ऑन एज ऑफ दी सीट' ह्या इंग्रजी वाक्याची प्रचिती शेवटपर्यंत होते... 'ब्लैक कॉमेडी' ही छान जमली आहे. दृष्यम ला कमी मार्केटिंग / एडवरटाइजिंग करून ही त्यानी रसिकप्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात यश मिळवले! दिग्दर्शनाची कमाल! दूसरे काय? वन टाइम वॉच नक्कीच आणि तो ही सिनेमाघर वालाच... गुड जॉब टीम दृष्यम 👍 थ्री एंड हाफ स्टार्स फ्रॉम मी ⭐ ⭐ ⭐ ⚡ ‪#‎ सशुश्रीके‬

लहानपण देगा देवा...

॥श्री॥ काल घरी मोबाइल मध्ये काही चित्रपट घुसवले त्यातला 'अमेरिकन स्नायपर' पाहिला आत्ता... त्याआधी थिन रेड लाइन, शिण्डलर्स लिस्ट, सेविंग प्रायव्हेट रायन ... असे एक से एक युद्धपट पहिले आहेत. प्रत्येक वेळी असले युद्धावरचे चित्रपट पाहिले की घसा कोरडा होतो, सैनिक आणि त्याचं आयुष्य आणि आपल्या आयुष्यात किती फरक असतो, आपल्या आयुष्याच्या अगदी उलटे! ते युद्ध संपले की (युद्ध संपत नसतात) की मनाशी युद्ध सुरु होतं जगण्याचं, कारण माणूस एका माणसाला मारतो तेव्हाच तो मेलेला असतो, आणि युद्धात तर किती जीव जातात, मोठे असो लहान असो, खुले असो छुपे असो, जगायला मारतो माणूस! कल्पनाच भीषण!!! सगळेच सैनिक झाले तर!? किंवा, कोणीच सैनिक नसेल तर!? येईल, असाच एक दीवस येईल... असेल असाच काहीतरी तो काळा दीवस! सैनिक तर हवेच, वाइट-चांगले ठरवणार कोण!? आपल्यासाठी समोरचा पाकिस्तानी की तो वाइट, अमेरिकन्स साठी समोरचा इराकी की तो वाइट, कोण कोणाचा नसतो, डोळ्यासमोर लक्ष्य असते, 'टास्क' असतो... देशप्रेम असते... घरी आई असते, बायको असते, मुलं असतात... समोरच्या 'टास्क' मध्ये शेकडो-हजारों असेच...

हर दिल को धडकने दो!

हर दिल को धडकने दो! मस्त खुसखुशीत कुरकुरीत हलकाफुलका आहे दिल धडकने दो. तो अनिल कपूर! झकासच... अनुष्का चमचमीत, रणवीर अनेक्सपेक्टेडली सही काम! मला वाटलेलं फरहानचा मोठा रोल असे...

Jonathan Banks

He had a nice small role in 'Breaking Bad' and now he just had a BIG IMPACTFULL role in prequel of the same series called  'Better Call Saul' Jonathan Banks हा माणूस कमीतकमी शब्दात जास्तीत  जास्त अभिनय करणारा, आपल्या बॉलीवुड मधला इरफ़ान खान + नसीरुद्दीन शाह सारखा तगडा अभिनय! त्याचा ह्या नवीन सरीज म...

Mr.ROBOT

Image
Mr.ROBOT नावाची सीरियल आहे..  IMDB वर 9.4 रेटिंग मिळालय! http://www.imdb.com/title/tt4158110/ एकच एपिसोड रिलीज झालाय, पण काय ग्रिप आहे!  अप्रतिम... पहिल्याच एपोसोड मध्ये बाजी मारली आहे!  उत्तम पार्श्वसंगीत... मुद्देसुत मांडणी!  टेक्नोलॉजी आणि सोशल मीडियाचा गैरवापर कसा होतोय...  मालिकेचा मूळ नायक एक तरूण हैकर आहे,  सायबर फिशिंग /क्राइम थांबवण्या करीता  एका कम्पनीत तो टेक विभागात काम करत असतो, त्याच्या कंपनीत अचानक एके दीवाशी साइबर अटैक होतो,  पण हा शांतपणे डोके लाऊन तो साइबर अटैक थांबवतो, पण ह्या सर्व भानगडीत वायरसचा 'द एन्ड' करण्या ऐवजी  तो शेवटच्या टप्प्यात वायरस ला सोडून देतो,  का!? ह्या प्रशांचं उत्तर ही मिळतं एपिसोड च्या शेवटच्या टप्प्यात! पुढील एपिसोड आता २४जून ला रिलीज होणारे! कांट वेट यो!

'कोंस्टीपेशन'

आज 'पिकू' पाहिला... सदर लेख ज्यांना पिकू आवडला नाहीये त्यांनी वाचू नये, अथवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यांना 'शी' ह्या विषयावर बोलायला/ऐकायला आवडत नाही त्यांनी सरळ सरळ ह्या लेखावर बहिष्कार टाकावा! 'शी' हा विषय लोकांना बोलायला आवडत नाही, आणि जेवणाच्या टेबल वरती जेवताना तर नाहीच नाही! त्वरीत अपचन झाल्यासारखा चेहरा करून तुमच्या कडे असे बघतील लोक की जसं काही तुम्ही स्वर्गात आवडता टीव्ही प्रोग्राम पहात बसले आहात आणि बेल वाजत्ये…  तुम्ही दरवाज्याच्या पीपहोल मध्ये बघता तर रेड्यावर विराजमान यम तुमची वात बघतोय! मध्ये मी पादणे ह्या विषयावर 'लगी रहे आनी जानी' हा लेख लिहिलेला!… पादतात सगळेच!… पण जे मान्य करतात त्यांच्या कडे पब्लिक असे बघतात जसे, 'मी नाही त्यातली न कडी लाव आतली!' हे सगळं का लिहावसं वाटतंय सांगू का!… एखादा चित्रपट आवडला तरच मी त्या चित्रपटाबद्दल लिहितो, एखादा चित्रपट नाही आवडला तर त्याबद्दल न बोलणे/लिहिणे टाळतो, कारण मग तोच चित्रपट ज्यांना आवडलेला असतो त्यांबरोबर वाद होतात, असो… आज पिकू बद्दल २ओळी चांगल्या लिहिल्या… तर २-३ रिप्लाय...

इटर्नल सनशाईन ऑफ द स्पोर्ट्लेस माइंड

Image
इटर्नल सनशाईन ऑफ द स्पोर्ट्लेस माइंड माझी पहिलीवहिली चित्रपट समीक्षा, नवीन चित्रपटांची करण्यापेक्षा मला आवडलेल्या काही निवडक चित्रपटांची करतो, तुम्हाला वाईट आठवणींपासून कायमची सुटका हवी आहे का? तुम्ही एखाद्या व्यक्तीला व त्या व्यक्तीशी निगडीत सर्व आठवणींना 'टाटा बाय बाय' करायच्या मनस्थितीत आहात काय? तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता…  'लकुना इन्कॉर्पोरेशन' ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास, उत्तम प्रायोगिक मांडणी, बारकावे + प्रेम कथा ह्यांचा संगम पहायचा असेल तर * ईटर्नल सनशाईन ऑफ द स्पोटलेस माइंड * नावाचा इंग्रजी चित्रपट नक्की पहावा. जिम कैरी आणि केट विन्स्लेटचा अगदी हटके स्वरूपातला चित्रपट; २००४ साली प्रदर्शित झालेला एक अप्रतीम पण खूप न गाजलेला / प्रसिद्धी न मिळालेला चित्रपट!   माझा एक मित्र आहे… नाव मिहीर आपटे, इंग्रजी चित्रपटांचा चाहता… मला नेहमी त्यानी उद्गारलेलं एक वाक्य आठवत असतं, म्हणे "आयुष्यात चित्रपटांसारखं काहीच नसतं!" तो म्हणाला अरे येड्या हा बघच… बघच तू! आणि त्या दिवसापासून त्यांनी जे काही पहायला सांगितलं ते बिनबोभाट पाहिलं! असे मित्र मिळायल...