धडक धधक...
धडक धधक... धक धक खंड खुड खुड कखीच धुक... धडक धडक... धडक धधक रूळ बदलते ना रेल्वे... त्याचा आवाज, जेव्हापासून ऐकला तेव्हा पासून इतका डोक्यात कोरला गेलाय विचारू नका! ज्या डब्यात बसलोय त्याचा वेगळा, बाजूने जाणाऱ्या रेल्वेचा वेगळा.. संथ ... जोरात जाणाऱ्या रेल्वेचा वेगळा, काही तरी खास आहे ह्या आवाजात! संगीत आहे ह्यात... एक आकर्षण आहे... उगाच नाही द जेंटलमन च्या चीकबुकरैले किंवा दिल से वाल्या छईया छईया मध्ये रहमान ने वापरलं... वापरलं पण असलं खास! अरे हो... लकी अली ने पण वापरलं आहे 'कहा से तू आती है...' भोपाल एक्सप्रेस नावाच्या चित्रपटात, अजून पण आहेत... पण आता तरी ह्या ३गाण्यांची आठवण धडकली कानात. जाम भीती वाटायची लहानपणी त्या क्षणी जेव्हा रूळ/ट्रॅक बदलायची रेल्वे, आणि तो क्षण आठवून अजून आता मजा येते, मोठा प्रवास असेल तर रात्री झोपेत पण तो आवाज ऐकून कसं 'लै भारी' आवाज अशी स्वतःलाच एक दाद देतो मी.. तो दोन/तीन सेंटीमीटर का काय असेल तो गॅप दोन रुळांमधला, इतका इम्पॅक्ट करून जातो ना 😊 अजून ही रमतो मी त्यात, डोळे बंद करायचे आणि... धडक धधक धक धक खंड...