'कोंस्टीपेशन'

आज 'पिकू' पाहिला...
सदर लेख ज्यांना पिकू आवडला नाहीये त्यांनी वाचू नये, अथवा सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ज्यांना 'शी' ह्या विषयावर बोलायला/ऐकायला आवडत नाही त्यांनी सरळ सरळ ह्या लेखावर बहिष्कार टाकावा!

'शी' हा विषय लोकांना बोलायला आवडत नाही, आणि जेवणाच्या टेबल वरती जेवताना तर नाहीच नाही! त्वरीत अपचन झाल्यासारखा चेहरा करून तुमच्या कडे असे बघतील लोक की जसं काही तुम्ही स्वर्गात आवडता टीव्ही प्रोग्राम पहात बसले आहात आणि बेल वाजत्ये…  तुम्ही दरवाज्याच्या पीपहोल मध्ये बघता तर रेड्यावर विराजमान यम तुमची वात बघतोय! मध्ये मी पादणे ह्या विषयावर 'लगी रहे आनी जानी' हा लेख लिहिलेला!… पादतात सगळेच!… पण जे मान्य करतात त्यांच्या कडे पब्लिक असे बघतात जसे, 'मी नाही त्यातली न कडी लाव आतली!'

हे सगळं का लिहावसं वाटतंय सांगू का!… एखादा चित्रपट आवडला तरच मी त्या चित्रपटाबद्दल लिहितो, एखादा चित्रपट नाही आवडला तर त्याबद्दल न बोलणे/लिहिणे टाळतो, कारण मग तोच चित्रपट ज्यांना आवडलेला असतो त्यांबरोबर वाद होतात, असो… आज पिकू बद्दल २ओळी चांगल्या लिहिल्या… तर २-३ रिप्लाय असे आले की, 'फालतू' आहे वगैरे… कारण एकच असावं! चीत्रपटाचं आणि त्याच्या विषयाचं 'कोंस्टीपेशन'

आता एखाद्यानी 'कोंस्टीपेशन' हा विषय निवडून 'सुखी जीवनाचे गणित' काय असते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे… आणि माझ्या मते शुजीत सरकारने अक्खा चित्रपट छान दिग्दर्शित केला आहे!… आणि स्टारकास्टही अचूक आहे!  'कोंस्टीपेशन'ला कंटाळलेला अमिताभ, त्याच्या प्रोब्लेम्सना न कंटाळता त्यांना पुरेपूर सपोर्ट देणारी दीपिका… बवर्ची मधल्या राजेश खन्ना स्टाईल व्यक्तीरेखा असलेला इरफान खान! मौसमी चटर्जीची ही उत्तम साथ! एकूणच हा चित्रपट अपचनाचा अनुभव देत नाही! 'कोंस्टीपेशन' होतय त्या लोकांना ज्यांना 'शी' ह्या विषयाचं महत्व काळत नाही!

'कोंस्टीपेशन''चा त्रास असतो ह्याचा अनुभव मी कधी घेत्लाय असं माझ्या आठवणीत तरी नाही… पण लहानपणी आजोबा कायम चूर्ण घेत असायचे… हो हो… कायम 'कायम' चूर्ण, पुण्यात काकांकडे गेलो तिथे ही तेच!… त्यांच्या मुलांचाही तोच प्रोब्लेम! माझ्या बाबतीत अगदी उलटं!… लोकं ईच्छा-पाद वगैरे असतात…मी ईच्छा-हाग आहे! सकाळी उठल्या उठल्या दात घासू की शी ला जाऊ असा रोज प्रश्न पडतो!… शी लाच जातो बहुतेकदा… सकाळी २दा आणि रात्री १दा तरी शी प्रकरण असते! आणि विशेष म्हणजे थांबावे लागत नाही बसलो की हुरडा बाहेर. आता म्हणाल ते ईतकं डीटेल मध्ये का लिहितोयस! कारण मला अभिमान आहे… मला आता लोकं हाग्र्या म्हणतील…रैदर हाग्र्या म्हणतात ही… आय एम प्राउड अबाउट ईट… कारण मी अश्या लोकांना पाहिलंय ज्यांना वाट बघावी लागते…

#सशुश्रीके | १५ मे २०१५ । संध्याकाळचे ७.५९

Comments

  1. लै वंगाळ त्रास हा रे बाबा. लिहिलं आहेस ते सगळं मनापासून पटलं. तुझा हेवा वाटला. खोटं का बोलू?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!