उशीराच झाला...
॥ श्री ॥ ३० ऑक्टोबर २०१४ संध्याकाळचे ६.४४ उशीराच झाला... आधी भेटायला आणि आज कॉल करायला... कधी कधी काही माणसं काही कमी दिवसांतच छान मित्र होतात.. अगदी खुप वर्ष एकत्र असल्या सारखं वाटतं... विचार जुळतात, स्वभाव साम्य... वगैरे वगैरे! असाच एक भेटला... इथे दुबईतच... माझ्या नवीन कार्यालयाच्या ईमारतीतच... इथे ७वर्ष आहे, मला इथे नवीन जागी रुजू होऊन ४महीने होतील, ज्वाइन होण्या आधीच एका मित्रानी सांगितलं, अरे माझा मित्र आहे तुझ्या ऑफिस बिल्डिंग मध्ये, भेटा जमलं तर! फोन, इमेल्स, व्हाट्सएप्प वर गप्पा झाल्या त्याचाशी, नाव महेंद्र भिड़े... भेटलो तब्बल २महिन्याच्या अवधीने. भिड़े साहेबांना क्याबीन वगैरे! मी विचार केला...प्रकरण जरा मोठं दिसते ओह्द्यानी आणि वयानीपण, भेट घेतली... तू कुठचा इथे कधी आलस दुबईत वगैरे विचारपूस झाली. डबा आणतोस का तू... वगैरे गप्पा झाल्या. मग आम्ही रोज भेटाय्चो, तो म्हणायचा मला एकट्याला जेवायला नाही आवडत... पण इथे डबा आणणारं कोणी नाही, माझं ही असाच काहीसा प्राकार, मग काय... अता रोज जेवायला भेटायला लागलो! १९९२ च्या दंगली, शीळ्या आमटीचं थालीपीठ, बर्ड फोटोग्राफ