मी बोलतो वाहनांशी!
।। श्री ।।
६ ऑक्टोबर २०१४ रात्रीचे १.३७
मी बोलतो वाहनांशी!
हो, मला सवय आहे अगदी लहान पाणापासून
शाळे पासून अगदी कॉल्लेज पर्यंत सायकलशी मग स्कूटरशी मग बाइकशी!
आणि आता सध्या कार्सशी!
.
.
वडलांनी केजी मध्ये असताना एक लाल चुटूक वेस्पा दिलेली वाढदिवसाबद्दल!
मस्त होती, बैटरीवर चालायची… तेव्हा फारच लहान होतो,
ती सोडली तर आयुष्यातल्या प्रत्येक वाहनाशी माझी गुफ्तगू आहे,
आणि राहील!
.
.
पहिली सायकल… १९९० साली बीएमएक्स!!!
सेकंड हैन्ड होती पण चकाचक! मला सरप्राएज :)
मस्त काळी आणि लाल, दणदणीत टायर्स!
तिला छान मड गार्डस पण लाऊन घेतलेले मोर पिशी रंगाचे!
काळी आणि लाल त्यात ते मोर पिशी रंगाचे मड गार्डस…
हाहाहा फुल ओंन झम्प्या!
येत नव्हती, आईने शिकवली,
मागे वळून पाहता पाहता… आईने कधी सोडली सीट ते कळालाच नाही,
त्या क्षणानंतर परत कधी धरू नाही दिली मी ती सीट… काय असतात ते दिवस!
नवीन काहीतरी साध्य केल्याचं समाधान! प्रचंड आनंद! सुसाट रस्ता, कधी छोट्या गल्ल्या,
तासोंतास फिरायचो! गोल गोल त्या वाळूच्या फुटबॉल ग्रोउंड च्या आजूबाजूला,
कधी फुटपाथ, कधी पार्किंग मध्ये!
.
.
ती सायकल क़तार हून मग पुण्यात आली,
उलटं सगळं,#उजव्या बाजूला मागचा ब्रेक आणि डाव्या बाजूला पुढचा, कारण परदेशात उजवी कडची बाजू भारतात डावी! आणि मित्रांना झेपायचं नाही, धडपड!
ज्यांचं आधीच धडपडून झालेलं ते नवीन बकरऱ्यांची मजा बघायचे! कारण वळताना मागचा ब्रेक सोडून पुढचा लागायचा,
इम्पोर्टेड सायकल चालवायची खाज ना!
मी छान चकाचक ठेवायचो तिला,
तेव्हा पासून मी बोलायला लागलो तिच्याशी!
धुताना, पळवताना, पार्क करताना!
चैन वगैरे पडली की हात काळे, नाक काळं, खिसे पण!
दसरा आला की अजून प्रेम यायचं, फुलं आणि हार, हळद कुंकू लावल्यावर तर
त्या सायकलला खराच जीव आहे... असच काहीतरी वाटायचं मला...
ती सायकल मग भाची ला देऊ केली :) अजून ही आहे ती सायकल…
दिसली कि बोलत नाही माझाशी,
सहाजिकच आहे तो रुसवा अजूनही तसाच टिकून आहे.
.
.
मग आठवीत गेलो, उंची वाढलेली, शिंग आलेली
हर्क्यूलस एमटीबी मनात भरलेली, वडलांशी खूप भांडलो,
आज घेऊ उद्या घेऊ करत करत शेवटी… सिंग सायकल्स, भवानी पेठ!
बघता क्षणीच प्रेमात, दुसर्ऱ्या दिवशी घरात! रूपये १८५०
भवानी पेठ ते नवी सांगावी, चालवत आलो…
मस्त चेर्री रेड, सुदृढ बांधा, तिला ही शिंग होती हैन्डलवर,
अगदी मला आलेली तशीच! :P
रोज साफ करायचो… धुळीचा कणही टिकू द्यायचो नाही!
जराही रंग गेला की माझा अख्या दिवसाचा रंग उडायचा,
कॉलेजच्या वेळी घारापासून बस पर्यंत जायचो,
तिथे एका झाडाला लावायचो... साखळी लॉक,
बाय कारायचो स्माईल देऊन :)
नंतर अभिनव कला महाविद्यालय, पाषाणला... सकाळी १३ किमी दुपारी १३ किमी
माझ्या सायकलला सोबत पण मिळाली, मित्राची हेरो हॉक!
पात्तळ टायर्स आणि पाषाणचा तो निर्दई रस्ता… माझी एमटीबीच पर्फेक्ट होती!
सेकंड इयरला मात्र अजून शिंग फुटून वडलांची स्कूटर न्यायला लागलो,
एमटीबीवरची धुळ वाढायला लागली, घरात येणारी मोलकरणीच्या मुलांचा डोळा होता तिच्यावर!
आईने एके दिवशी विचारलं, मी म्हणालो… हो हो वापरू दे त्यांना!
आता कशी असेल कुठल्या अवस्थेत असेल देवास ठाऊक.
.
.
आता वेळ आलेली बाबांची स्कूटर… बजाज सुपर, ऑफ व्हाईट,
ते येडं ढेंगभर अंगावर ओढून आडवी करूनच चालू होणार,
मग सीट वर बसून, पहिला गिअरच्या झटक्यानी ३-४इंच हवेत विली करत,
शाबास म्हणायचो पठ्ठ्याला आणि बाकीचे गीअर्स काही सेकंदात खडाखड, नी टार्रकन गडी गुल्ल...
ती सुपर बजाज सदैव तयार सफरी साठी,
त्यावेळी स्कूटर्स ना टाकीत किती पेट्रोल आहे हे झाकण उघडूनच बघावे लागायचे!
तो हलणारा पेट्रोलचा समुद्र पाहून मजा यायची, मी आणि नीलम खूप फिरलो आमच्या स्कूटर वरून,
तोच चालवायचा जास्त, त्याच्या कडे ही लायसन्स नव्हतं पण दिसायला बर्यापैकी लायसन्स असल्यासारखा,
पडलोही एक दोनदा, एकदा झेड ब्रिज वर, पावासाळी दिवस, निमुळता रस्ता…नंतर एक गम्मत पण झाली, लकडी पुलावर ( जिथे दुचाकी वाहनांना बंदी - अजब पुणे ) गेलेलो चुकून, आजू बाजूचे बघायला लागले,
त्यांनी काही नं बोलताच मला कळालं नी पटकन वळवली नी धूम,
असो… सगळ्यात त्रास म्हणजे नंतर सारखी बंद पडायला लागली,
रिटर्न कीक म्हणजे तर काही विचारू नका... कानाखाली परवडली ईतका तो झटका!
सारखं तिला आडवी करा वगैरे, वैताग! शेवटी विकली,
आणि ज्याला विकली त्यांनी रेजर्व कॉक चेंज केला, उत्तम चालते म्हणाला!
हाहाहा… असो त्यामुळे माझी स्प्लेंडरची इच्छा पूर्ण होणार होती!
.
.
स्प्लेंडर घेतली, चावी हातात, तिला पाहिलं, हसलो, बसलो,
देवाचं नाव घेतलं, एक राउंड मारावी म्हणालो… मारली ही,
परत आलो शोरूम पाशी… अगदी शोरूमच्या दारातच तिला आडवी करावी लागली!
पेट्रोल कमी होतं, आमच्या माजी स्कूटरनी श्राप दिला असणार!
ती स्प्लेंडर… काय मस्त पीदडवली मी!
एमएच १२ बीएल ७१०! नंबर पण खास मिळालेला!
कालांतराने तीला हेंडल शोर्ट बसवलं, नंतर मडगार्ड काढलं, टायर जरा स्पोर्टि, चकाचक ऑलवेज! तोंडातलं बाष्प वापरून अगदी चेहारा दिसे पर्यंत प्रेम!
एका येडपट मित्रांनी चावी फेकली ३र्या मळ्या वरून ती नेमकी टाकी वर आदळली,
तो एक पोचा सोडला तर मी कधीच माझ्या स्प्लेंडर ईजा होऊन दिली नाही,
तो पोचा दिसू नये म्हणून खास लेदर चा ब्लाउस पांघर्लेला कायमचा टाकी वर! झूप झ्याप ट्राफिक मधून मस्त सर्वांना सहज मागे टाकत,
माझी शाबासकी मिळवायची रोज!
मी मुंबईत पण घेऊन गेलो तिला, तिथे त्या मोठ्या हायवेय्स वर पण राणीवानी धावायची,
पुण्यातल्या छोट्या रस्त्यांपासून दूर त्या ट्याक्स्या, ट्रक्सना नं घाबरत!
किल्ली फिरवून किक मारली की ती बट्टर स्मूद राईड सगळा कंटाळवाणा मूड कायापालट करून टाकायची!
माझ्या आणि अमृताच्या खूप आठवणी ह्या स्प्लेंडरशी, त्यामुळे अजून ही विकली नाहीये!
अजून ही तिला भेटतो, चौकशी करतो, डोक्टरांकडे नेतो, अजूनही ठणठणीत आहे तब्येत! सध्या सासरेबुआ 'टेक केयर' करतात तीची.
.
.
लग्नाच्या आधी सेन्ट्रो घेतली, ४ वर्ष वापरलेली, छान वापरलेली कोणी एका डॉक्टरनी,
ईतर गड्यांपेक्षा हटके होतं मोडेल ते… हाईटेड, मस्त जागा…
तिच्याशी बोलायला मजा यायची कारण…
पुण्यातलं / मुंबईचं ट्राफीक आणि ए. आर. रेहमानची गाणी यांचा संगम व्ह्यायचा!
आई, मी, अमृता-तिचे आई बाबा सर्वांसाठी जागा,
पांढरी झिप ड्राइव्ह, मस्त झीप्पी,
साखरपूडा, लग्न सारख्या महत्वाच्या प्रसंगांची माझी साथीदार!
दर वेळी जास्वंदाचं फूल वाहून चिंचवड देवस्थानला जायचा प्लान अजूनही कायम आहे तिच्यासोबत! पुणे मुंबई शिवाय महाबळेश्वर नंतर पन्हाळा वगैरे पर्यन्त मजल मारली आम्ही.
अजुनही भारतात गेलो की माझा साला तीला माझ्या साठी रेडी ठेवतो, तीची देखभाल उत्तम करतात साहेब! कारण तो ही बोलतो माझ्यासारखाच... वाहनांशी!
.
.
दुबईत दीड वर्ष ट्याक्स्या आणि बस करत करत शेवटी मी सिविक घेतली!
का!? तर एकदा आई, मी आणि अमृता तब्बल दीड तास ट्याक्सीच्या लाइन मध्ये उभे होतो!
प्रचंड चीडचीड… मनात सिविक अगदी मुंबईपासून आवडलेली, तो यूनिक डैश बोर्ड विथ नुमरिक डिजिटल स्पीडोमीटर!! खरच तसला चिकणा डैशबोर्ड मी आजुन ही बघिलेला नाहीये!!!
पण बजेट जरा त्रास देत होतं म्हणून सीटीची टेस्ट ड्राईव्ह घेतली, आणि गम्मत म्हणून सिविकची पण, अणि सिविक आवडली... ब्लैक पाहिजे होती, पण मारामारी होती, मिळत नव्हती, पण मिळाली नशीबानी...
आठवड्या भरानी सिविक घरी आणली :) मित्रांनी दिलॆला गणपती लावला मध्यभागी डैशबोर्ड वर अन सुंदर सफर सुर्रू!
जाम जीव माझा… रोज एकदा फडकं मारायचो!
पोलिश करणं, टायर चकचकीत ठेवणे…
टायरचं सोडा, त्याच्या भोवतालचा भाग ही काळा कुळकुळीत ठेवायचो!
कधी कुठे केव्हा पोचा / रंग गेला ते अजून ही आठवतं >.< मित्र, लोकं येड़े म्हणे पर्यन्त साफसफाई, सिग्नलला थांबलो की आतून, कोणाची वाट बघत असलो की बाहेरून!
तब्बल ४वर्षानी तीला बाय बाय केलं,
घरात नवीन मेम्बर एंट्री आणि त्यामुळे सिविकची एक्झिट,
पण विकायची मुळीच घाई केली नाही, ३महीने २गाड्यांचा मालक होतो! अलविदा केली...
पण शेवट पर्यन्त जीव अडकलेला... नाही हो अजुन ही जीव अडकलाय त्या सिविक मधे! त्या नवीन मालाकानी विचारलंही, नक्की विकायची आहे ना!? मी म्हणालो हो हो... नक्की! बापाला मुलगी सोडून जाते तसा फील आलेला सिविकला शेवटी पाहेले जाताना तेव्ह्हा! दिल्या घरी सुखी रहा...
.
.
नवीन अगदी १० महिन्या पूर्वीची..
हुंडईची सँटा-फे... घेण्याच्या ६महीने आधीच एका पार्किंग लॉट मध्ये दर्शन झालेले.. लाइट ब्लू सिल्वर होती... मस्त 360नजर फीरवली, तेव्ह्हाच प्रेमात पडलेलो! मग मित्रहि म्हणाला! गो फॉर इट... पण स्टॉक उपलब्ध नव्हता! अखेर मिळाली, पाहिजे ते कॉम्बिनेशन ह्यामुळे गाडी अडकलेली! सफ़ेद अन आतून बेज... मस्त बंदूकीतुन गोळी सुटायला तयार असं काही फ्लुडीक डिजाईन आहे! आणि ७सीटर / 3.3लीटर व्ही6 / इलेक्ट्रॉनिक स्टियरिंग!!! मख्खन हो मख्खन! सिविक एवढी रोज रोज नाय पुसत हीला... मेटालीक व्हईट आहे ना! पण ब्लैक स्ट्रिप्स आहेत चहू बाजूनी खालून + एज तू एज पनारोमिक सनरूफ त्यामुळे तीथे धुळ दिसतेच! त्यामुळे गाडीला वेळ द्यावा लागतोच! कधी वीकेंड कधी अगदी उशीरा घरी आलो तरी!
+ छान साउंड सिस्टम असायचा एक मोठा फायदा! ट्रेफ्फिक कितीही असलं तरी स्टियरिंग वरची बोटं आणि लेफ्ट साइडचा रिकामा पाय ह्याची जुगलबंदी चालू असते! रोज घरी आलो की शाबासकी मिळवते माझी सँटा-फे! आणि हो परवाच दसरा झाला... तीच्या समोरच्या नंबर प्लेट वरचा झेंडू! क्या बात है... मस्त मस्त! हीने माझं मोठं स्वप्नं पूर्ण केलं ते म्हणजे एलॉय व्हील्सचं! जे सन्ट्रो आणि सिविक मध्ये 'मिसिंग' होतं...
आजच धुवायला गेलेलो... तरी घरी आणून डीटलींगला हात काळे केलेच ;)
तुम्ही पण असं करून पहा, बोलून पहा... तुम्हाला रीस्पोंस मिळेल! नक्कीच...
मला मिलतो! कारण मी बोलतो वाहनांशी!
© सशुश्रीके
Comments
Post a Comment