शुभदा बोलत का नाहीये, तेच कळत नव्हतं...
पाडवा किव्वा दिवाळी असेल, १९९३-९४ चा किस्सा!
आई वडील दर शनिवारी जायचे भजनाला तसे त्यादिवशीही गेलेले,
आईने छान साडी, दागिने वगैरे घातलेले :) छान दिसत होती
मी नव्हतो गेलेलो का ते आठवत नाही नक्की…
रात्री ९ च्या आसपास चतुःशृंगीच्या सिग्नल लागला म्हणून वडलांनी स्कूटर थांबवली,
सिग्नल खूप मोठा असल्यानी त्यांनी बंद केली स्कूटर…
मग निघाले हिरवा लागल्या लागल्या,
मध्यॆ आईशी गप्पा चालल्या होत्या,
घरा जवळ आले तेव्हा लक्षात आले,
की आई नाहीच आहे मागच्या सीट वर!
जरा 'कुल' चेहरा ठेऊन घरी आले, आणि मला हाक मारली,
विचारलं "आई आली का रे?" मी म्हणालो "नाही!"
मग जवळच माझ्या चुलत काकांच्या घरी गेले,
तिथेही विचारलं शुभदा आली का वगैरे!
तिथेही उत्तर तेच.
झालं असं होतं की त्या सिग्नल वर आई उतरली होती
आणि सिग्नल लागल्यावर वडीलांनी स्कूटर चालू करून निघून गेले,
आई तशीच राहिली मागे!
आई रिक्षाने आली घरी,
घरी येउन मग पैसे दिले रिक्षा वाल्याला.
त्या सणासुदीच्या दिवशी घडलेला प्रकार अजूनही आठवला की तो डायलॉग आठवतो वडलांचा!
" तेच म्हणालो, मी बोलत होतो अख्खा युनिव्हर्सिटी रोड पण शुभदा बोलत का नाहीये, तेच कळत नव्हतं!!! "
झालेला प्रकार होऊनही आई शांत होती, जसं काही घडलच नाही!
कारण असे किस्से तिला नवीन नसावेत! :P
#सशुश्रीके | ७ ऑक्टोबर, २०१४
हा हा हा. भारी किस्सा आहे हा.
ReplyDelete