आठवणींची फास्ट लोकल!

॥ श्री ॥

२७ ऑक्टोबर २०१४, दुपारचे ३.२१

आठवणींची फास्ट लोकल!

९-१० वर्षापूर्वी!?
हो हो…  तेवढे झालेच असतील!
तेव्हा एव्हरेस्ट ब्रांड सोल्यूशन मध्ये काम करत होतो.
तेव्हा एक ७-८ दिवस काम केलं असेल.

आणि आज त्यानी मला इथे पाहिलं!
हाय हेल्लो इथे कुठे वगैरे बोलल्या वर कळालं
तो इथे गेली १० वर्ष आहे!

म्हणजे १० वर्षापूर्वी आम्ही भेटल्यानंतर साहेब दुबईत आलेले
आणि तरीही आम्ही भेटलो नाही,
सोशल मेडियावर 'तो' नसल्यामुळे हा प्रकार! बॊल्लो त्याला मी!

असो तर जवळपास ५ मिनिटं अरे तुरे बोलून झाल्यावर वरही नाव आठवेना!
मी विचारलं नाव काय पण तुझं… दोघे हसलो! हसलो हसलो…
१० वर्षात  आयुष्यात काय घडलं वगैरे वगैरे…
१०-१५ मिनीटांनी मीच विचारलं परत नाव काय बाबा???…
फोनची देवाण घेवाण करताना…
नाव… 'अश्विन पेडणेकर' वय ४०…
त्यालाही मुलगी! फोटो पाहिला, मी माझ्या पोग्गिचा दाखवला!

परत आलो जाग्यावर,
जुन्या आठवणींची फास्ट लोकल त्या मनाच्या रुळांवरून धडाधड निघून गेली,
जाम धमाल केली मुंबईत असताना जेवढे काही दिवस आम्ही एकत्र काम केले!
मस्त वाटलं भेटून!…

अशी माणसं भेटावीत…
भेटावीत अशीच माणसं :)

आठवणींची फास्ट लोकल!

#‎साशुश्रीके‬



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...