उशीराच झाला...

॥ श्री ॥

३० ऑक्टोबर २०१४ संध्याकाळचे ६.४४

उशीराच झाला... आधी भेटायला आणि आज कॉल करायला...

कधी कधी काही माणसं काही कमी दिवसांतच छान मित्र होतात.. अगदी खुप वर्ष एकत्र असल्या सारखं वाटतं... विचार जुळतात, स्वभाव साम्य... वगैरे वगैरे!
असाच एक भेटला...
इथे दुबईतच... माझ्या नवीन कार्यालयाच्या ईमारतीतच... इथे ७वर्ष आहे, मला इथे नवीन जागी रुजू होऊन ४महीने होतील, ज्वाइन होण्या आधीच एका मित्रानी सांगितलं, अरे माझा मित्र आहे तुझ्या ऑफिस बिल्डिंग मध्ये, भेटा जमलं तर! फोन, इमेल्स, व्हाट्सएप्प वर गप्पा झाल्या त्याचाशी, नाव महेंद्र भिड़े... भेटलो तब्बल २महिन्याच्या अवधीने.
भिड़े साहेबांना क्याबीन वगैरे! मी विचार केला...प्रकरण जरा मोठं दिसते ओह्द्यानी आणि वयानीपण, भेट घेतली... तू कुठचा इथे कधी आलस दुबईत वगैरे विचारपूस झाली. डबा आणतोस का तू... वगैरे गप्पा झाल्या.
मग आम्ही रोज भेटाय्चो,
तो म्हणायचा मला एकट्याला जेवायला नाही आवडत... पण इथे डबा आणणारं कोणी नाही, माझं ही असाच काहीसा प्राकार, मग काय... अता रोज जेवायला भेटायला लागलो!
१९९२ च्या दंगली, शीळ्या आमटीचं थालीपीठ, बर्ड फोटोग्राफी, माझे लिखाण, मोदी, लाहनपणी घडलेले किस्से असे प्रचंड 'रैंडम' विषय असायचे आमचे... कधी २मिनट असे शांत कधी बसलेलो आठवत नाही, दुपारी चहा, कॉफ़ीला जमलं तर तेव्ह्हा ही भेटायचो! तेव्ह्हा ही अखंड गप्पा...

ह्या सर्व गपांच्या मध्येच तो म्हणाला की मी जॉब सोडतोय, मी म्हणालो का बाबा, म्हणाला अजुन २महीने आहेत, तो पर्यन्त भेटूच की! मग २ आठवड्यानी जेवायचं पण थांबलं कारण त्याच्या केबिनमध्ये त्याला रिप्लेस करायला आलेला आता बसायला यायला लागलेला.. त्यामुळे डबे ठेवायला जागा नाही... मग हळु हळु चहा कोफ्फी पण कमी कारण हैण्डओव्हर मध्ये साहेब खुपच बीझी... खुपदा मी केबिनच्या बाहेर त्याची गड़बड़ पाहून त्याला फ़क्त बाय करून परतलोय!

काल त्याला फोन लावला म्हणालो जेवायचं का... म्हणाला ये आता वेळच वेळ उद्या शेवटचा दिवस... उद्या पण ये जेउ एकत्र...
आज बरोबर १ला ठरल्या प्रमाणे कॉल केला... तो म्हणाला... अरे मी निघालो.. शारजाहला पोचिन आता ज़रा वेळानी... मी म्हणालो.. अरे असा कसा जाऊ शकतोस तू मला नं सांगता! तर म्हणतो... अरे नाही रे, जाम इमोशनल करून टाकलं मला सहकार्यान्नी... गिफ्ट काय अणि काय काय वगैरे!
मला कळालं... उशीर झालेला मला कॉल करायला, 
आज ज़रा अर्धा तास आधी फोन करायची बुद्धि झाली असती तर, जेवलो असतो ना बरोबर!
उशीरच झाला!

#सशुश्रीके


Comments

  1. आणि अश्या रीतीने महेंद्र भिडे अधिकृत आगाऊ झाले😀👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...