बोरिवली डेय्स.zip
बोरिवली डेय्स.zip
केजी पासून ५वी...
खुप धमाल केली अमोल, शशांक, अभय, कौस्तुभ..
अजुन ही होते... आता नावं नाही आठवत!
पण काही गोष्टी जश्या घडल्या तश्या आठवतात…
.
.
• घरापासून ३-४किलोमीटर वर शाळा,
शाळे पासून १किमी वर मावशीचं घर,
आईची बालपणाची मैत्रीण...
मीनल मावशी, तीच्या कड़े शिकवणीला जायचो.
मी तसा अभ्यासात दगड,
फार मार खाल्लाय ह्या दगडानी,
नुसते उदाहरण देत बसायचे सगळे स्कॉलर मुलांचे!
हा दगड मावशी कडे जायला खुप घाबरायचा!
शाळा सुटल्यावर तो १कीलोमीटर रडत खडत...
रस्त्यावारचे आपल्यासारखे दगड मोजत,
गटारींमधली घाण बघत,
भेळवाल्याच्या गाडीवरची नावं बघत,
झाड्यांच्या खोडावारती ठोकलेल्या पत्र्याच्या पाट्या बघत...
'फ्रेम्स' अगदी घडाल्यात तश्या…
मग दरवाजा आला की पायाकडे बघत आत जायचो,
तेव्हाची भीती, अभ्यास बस्स...
बाकी कुठल्याच गोष्टीला तितका घाबरलो नाही,
अजुन ही मला स्वप्नं पडतात की उद्या परीक्षा आहे…
आणि माझं काहीच झा-लेलं नाहीये! :P
.
.
• एकदा काय झालेलं…
वर्गात एका मुलीने उल्हासनगर मेड किस-मी ची चाक्लेटं वाटलेली
व्हायचं तेच झालं… झाली मुलांना विषबाधा…
सर्वजण उलट्या काय काढत होते!
भयानक घाबरलेले सगळे, मी मात्र 'चिल्ल मोड' मध्ये होतो,
३ चाक्लेटं गिळून सुद्धा मला काही झालं नव्हतं,
आणि काही होण्याची चिन्हं पण दिसत नव्हती!
घराजवळच हॉस्पिटल होतं,
मनात विचार आला डॉक्टरांकडून घरी जात येईल,
बाजूलाच तर आहे!
पण कसलं काय डॉक्टरांकडून एक गोळी घेतल्यावर ब्याक टू स्कूल ना!
जी रिक्षा आली त्यानीच परत शाळेत…
'फ्रेम्स' अगदी घडाल्यात तश्या…
जाताना घराची बाल्कनी आणि खिडकी दिसत होती तो क्षण अजून ही आठवतो!
कारण शाळेच्या वेळेत घरी असणं हे म्हणजे महा आनंददाई 'कृत्य' असतं!
.
.
• शाळेच्या वेळेत घरी असणं वरून आठवलं
दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा चालू होणार ह्या विचारात तंद्री लागली…
आणि फुलबाजी संपली खाली पडली पायाखाली आली
भाजला पाय, बाबा आलेले सुट्टीवरून,
दुसऱ्या दिवशी शाळा नाही ह्याचा आनंद जमिनीवर मावत नव्हता!
अहो… म्हणजे जमिनी वर पाय ठेवता येत नव्हता ह्याचा आनंद!
का तर शाळेत जायचं नाहीये म्हणून!
नेमकं त्यादिवशी आई बाबांना बाहेर जायचं होतं नातेवाईकांकडे,
ते क्यान्सल करायचं बोलणं मी ऐकलं
आणि मला पण जायचं होतं
पण सांगणार कसं कारण आता पायाला पण लागलय!
शेवटी कन्फ़ेशन दिलं की मला शाळेत जायचं नव्हतच!
पायाचा प्रकार खोटा नसला तरी मी येतो!
आणि लाडीगोडी लावत मी गेलो आई बाबांबरोबर!
जाताना शाळेची ती खिडकी पहात गेलो,
'फ्रेम्स' अगदी घडाल्यात तश्या…
.
.
• ब्राम्हणाच्या घरातला,
मुंज झालेला आणि 'तरीही' संपूर्ण शाकाहारी
त्यामुळे ब्राम्हण म्हणून माझी खास मागणी असे!
मस्त पैकी टीपिकल ब्राम्हणी जेवण वरपून वर दक्षिणा 'न विसरता' घेऊन
त्या पैशाचे पेप्सिकॉले घेऊन,
मित्रांना जळवून जो काय थंडावा गिळायचो मी!
तोड नाय!
अचानक आई समोर माझ्या हातात एक सोडून तो रंगीत ५० पैश्याच्या काठ्या!
आईला माहीत होतं माझ्या हात काय आहे,
तरीही विचारत होती,
मी लपवत होतो,
आणि काय फालतू उत्तर दिलें असेल मी!
कह्हर…
अजून ही ते आठवून मी किती येडपट होतो असा विचार येउन हसायला येतं!
मी म्हणालो " काठ्या आहेत रंगीत! "
आईने जे काय धपाटे मारत ३ऱ्या मजल्यावर नेलंय! >.<
तरी त्या 'रंगीत काठ्या' काही संपल्या नाहीत माझ्या! आणि मार ही!
'फ्रेम्स' अगदी घडाल्यात तश्या… काठ्या आहेत रंगीत!...
आणि हे ऐकल्यावरचा आईचा चेहरा!
.
.
• बाकी 'निळी दुपार' सारख्या खूप दुपारी खूप उद्योग केलेले आहेत!
धाड धाड धप्प… ३ माजले १मिनटात
खालच्या मजल्यावर एक घर
कोणी रहायचमं नाही,
पण बॉल आदळून आदळून काचा फुटलेल्या,
त्यामुळे साहजिकच बॉल आत गेला की आम्ही खिडकीतून काठी ने,
मग जमलच नाही तर…
दादा मंडळींच्या मदतीने पार हात आत घालून दरवाजा पण उघडा करून बॉल मिळावले होते,
जळमटं, धूळीचं साम्राज्य असलेल्या त्या जागेत आर्कीटेक्ट रहात असावा,
छान छान बंगल्याची मॉडेल्स होती, धूळ खात!
तेव्हा ' आर्कीटेक्ट ' वगैरे प्रकार असतो हे नव्हतं, त्यामुळे अजूनच कुतूहल
त्या मॉडेल्स मध्ये जीव आहे, हातात घेऊ नको वगैरे 'दादा' मंडळी!
मग यायचा स्वप्नात… झोपी गीलेला जागा झाला!
'फ्रेम्स' अगदी घडाल्यात तश्या...
.
.
• एक अतिशय झटपट किस्सा म्हणजे आईच्या हातात हात…
तो सोडून सलून च्या दुकानात्लं पोस्टर बघत होतो पलीकडच्या रस्त्यावरचं
अचानक मला आणि कोणालाही कळण्याच्या आत!
एक रिक्षा पायावरून गेली!
मी आईला ही गोष्ट सांगितली नाही अजून ही…
आता हे वाचत असताना कळेल तिला!
कारण असं अचानक रस्त्याच्या मध्ये थांबून पहात उभं राहणं कोणाच्या आईला आवडेल!
आणि मी हा प्रकार सर्रास करायचो!
गाई दिसल्या कि त्यांच्या अंगावरचे डाग डाग बघत बसायचो…
आई म्हणायची त्या गाईने ऐकलं नाही ना आईचं तिच्या म्हणून देवानी असे डाग दिले तिला!!!
काहीही, हाहाहा आणि मला पटायचंही :)
.
.
• असे बरेच होते 'बोरिवली डेय्स'!
होते नाहीत… अजून ही आहेत तसेच,
आठवतात अचानक मध्येच 'फ्रेम्स' अगदी घडाल्यात तश्या..
झिप फ़ाइल उघडले की खेळ सुरू!
File name - बोरिवली डेय्स.zip
#सशुश्रीके | ८ ऑक्टोबर, २०१४
Hahaha.... Mast!
ReplyDeleteAre kharach khup chhan lihilay...... Kiss me vala kissa bharich.... Rangit kathya😂
ReplyDelete