दिसला... खरच दिसला #SACHIN दिसला!

॥ श्री ॥


१९ ऑक्टोबर २०१४ सकाळचे ४.०१


दिसला... खरच दिसला
अजुन ही विश्वास बसे ना
विक्रम गोखले वळुन बघतात तसा २-३दा वळुन पाहिलं...
तरी पटेच ना!
तोंडातुन नाव आलं चक्क... स-चि-न
हो हो... मनातलं नाही अक्षरशः तोंडातुन शब्द आले बाहॆर नकळत.. 
माझ्या पुढे चालणारा एक मुलगा माझ्याकडे पाहून मला उद्देशून काय म्हणाला असेल!? 
तो पण सैम.. स-चि-न
...आता नीट सांगतो काय झालं ते!
.
.
शनीवार... 
अमृता म्हणाली, चल आज जरा मॉल ला जाऊ जरा मला खरेदी करायच्ये अणि तिथे दीपक फॅमिली पण येईल, 
मी म्हणालो ठीके, दुपारचं जेवण करून निघु २-३ पर्यंत... 
ठरल्या प्रमाणे ३.१५ पर्यंत मी आणि अमृता पोहोचलो मॉल मध्ये मग फोनाफोनी करून डेबेन्हेम्स ह्या दुकानाजवळ भेटण्याचा प्लान झाला, मी म्हणालो दीपकला तिथेच थांब मी येतोय ५-१० मिनिटात.
मी हातातला आवडलेला टीशर्ट सोडून डेबेनहम्सच्या दिशेने पाय्तोड सुरु केली... 
हातात अन्वयाची बाबा गाडी... 
अणि तीचे बाबा... अर्थात मी... अणि माझ्या हातात फ़ोन... 
wifi मिळालं म्हणून ते रजिस्टर करण्यात ३-४मिनिटं घालवली,
५-१०मिनीटांची १५ मिनीटं झाली त्यामुळे दीपक वैतागुन त्याच्या बायकोच्या खरेदी करीता डेबेन्हम्स मध्ये घुसला. 
मी तिथे पोहोचे पर्यंत तो आत गेल्याने मी आजू बाजुला त्याचा शोध घेत होतो... 
इतक्यात...इतक्यात...
.
.
दिसला...एक व्यक्ती जी सचिन रमेश तेंडुलकर सारखी दिसते! हम्म... 
ज़रा जवळ जाऊन पाहू... तस तसा माझा तो भ्रम... 
त्या भ्रमाचा काचा फोडून एक सत्य दिसायला लागलं!... 
अहो तो खरा सचिन होता.. हो हो...आईशप्पत
बाजुला २जणं बहुदा त्याचा मित्र आणि ड्राईवर असावा... 
साहेब एग्जिट गेट पासून २०कदम मी साहेबंपसुन ५कदम... 
माझं लक्ष दीपक कडून १००००००० कदम... अन्वया तीच्या दुनियेत मी स्वर्गात...
अजुन ही विश्वास बसे ना...पटेच ना!
माझ्या पावलांनी वेग पकडला...
जस जसा तो एग्जिट गेट पाशी जायला लागला
लोकं आजुबाजुला लोहचूंबकाला जश्या टाचण्या चिकटतात तसे लोक / सिक्यूरिटी गार्ड्स वगैरे चिकटायला लागले!
तोंडातुन नाव आलं चक्क... 
स-चि-न
हो हो... मनातलं नाही अक्षरशः तोंडातुन शब्द आले बाहॆर नकळत.. 
माझ्या पुढे चालणारा एक मुलगा माझ्याकडे पाहून मला उद्देशून काय म्हणाला असेल!? 
तो पण सैम.. स-चि-न
मी हसलो तो हसला... कहाणी अजुन आहे.
.
.
मला त्याला त्रास देऊन त्याला बाघायची अजिबात इच्छा नव्हती, 
बिचार्या अश्या लोकांना फैन पब्लिक कडून खुप त्रास होत असतो हां डोक्यात विचार + अन्वया बरोबर + फोटो काढू की व्हिडीओ! कारण अशी संधी कधी आली नव्हती आणि पुन्हा येइलच ह्याची काय शाश्वती!?
.
.
२ दरवाजे होते
डाव्या बाजुच्या दरवाज्यातून तो बाहेर पडला... 
तेव्हा एक बौंसर टाईप इसम त्याच्या बरोबर असलेल्या २ लोकांना सामिल झाला... 
अजुबजुच्या ३-४ लोकांची गर्दी आता ७-८लोकां एवेढी झालेली... 
त्यात मॉलचे सिक्यूरिटी गार्ड्स ज़रा पुढे मागे...
मी ठरवलं..  
त्याचा पाठलाग करण्यापेक्षा त्याच्या पुढे जाऊन तो कुठे जातोय हे बघावं.
सचिन बरोबर असलेल्या एकाने त्याला पार्किंग च्या मैन रस्त्यावरून नं नेता गाड्यांच्या मधून मधून वाट काढत नेले, त्यामुळे त्याचा पाठलाग करणाऱ्या लोकांची फजीती होत होती... 
मी मात्र तो कुठल्या गाडी पाशी थांबतोय हे पहात होतो पुढे जाऊन, 
शेवटी तो एका मेर्सेडीज एसयूव्ही पाशी येउन थांबला.. 
दरवाजा उघडण्याचा आधी मी त्याच्या मागे येउन उभा... 
फोटो घेत घेत..
सही आणि त्याच्या चेहर्याची अपेक्षा नं ठेवता.. 
त्याने सर्व लोकांना हात केला... दरवाजा उघडला... बसला... 
माझ लक्ष मोबाइल कैमराच्या व्हीडीओ मोड़ कड़े गेलं... 
तातडीने मोड़ केला चेंज अन गाडी मागे आली...
त्याचा चेहरा टीपण्या साठी माझा कैमरा तयार मी तयार... 
मध्ये मध्ये अन्वया ठीक आहे की नाही ह्याकड़े लक्ष... 
डोक्यात मुंग्या... हातावर शहारे
त्याला हात करायचं सुचलं... 
सहाजिकच 'हाय' वाला हात केला त्याला मी... 
त्या काळ्या काचेतुन मला परत 'हाय' कारायची जी त्यानी आपुलकी दाखवल्ये! 
जे काही स्माइल दिलय! बॉस्स.. क्या मोमेंट था... 
बाजुचा ड्रायव्हर पण थांबला, लगेच पळ काढला नाही, 
तो 'हाय' - 'बाय' मध्ये कन्व्हर्ट होत... 
गाडी गेली...२ऱ्या सेकंदाला...
मी पटकन व्हीडीओ रिकॉर्डिंग नं बंद करता अन्वयाच्या चेहऱ्या पाशी आणलं!
तीला म्हणालो आपण सचिन ला पाहिलं!
हाहाहा.. रिकॉर्डिंग थांबवलं,
अख्या अंगभर शहार्यांनी जवळजवळ २ मिनीटं राज्य केलं! त्याचा ही फोटो काढला!
.
.
अगदी १महिन्या पुर्वीच सचिन बद्दल लेख लिहिलेला तेव्हा शेवटचं वाक्य होतं... 
१३व्याला कावळा शिवला नाही तर... 
सचिन सचिन म्हणा... नक्की शिवेल! 
त्याला भेटण्याच्या संधीचा एकदा खून झालेला...
पण... पण आज मला देवानी देव दाखवला... 
खुप खुप आभार ह्या ४ मिनीटांचे!!!
.
.
मग दीपकला फोन लावला... 
कारण त्याच्यामुळे मी त्याभागात गेलो.. 
आणि हे सर्व घडले! पण त्याला नाही पाहता आले देवाला...
फ़ोन वर झालेला प्रसंग सांगितला...
त्याचं रिएक्शन...
क्सक्सक्स... मला का नाही फ़ोन केलास!??
हाहाहा...असो आता त्या डिटेल्स मध्यॆ जात नाही!
पण... फोन वर असाच काहीतरी बोललो मी...
दिसला... खरच दिसला
अजुन ही विश्वास बसे ना...


#सशुश्रीके






Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...