'हिन्दुस्थान से...'

*खीच खीच कच कच गर्र गर्र*भारत की ओर से *गर्र गर्र* पाकिस्तान की ज़मी... *गर्र गर्र*
बरदाश्त नहीं किया जाएगा *गर्र गर्र*


ते केस कापाय्चं मशीन आणि माझे कान आणि तो पाकिस्तानी न्यूज़ च्यानल...
सांगतो सांगतो सव्विस्तर...
आत्त्ताच केस कापायला गेलेलो..
नेहमीचा मल्लू/गुज्जु केस कापणारा वाल्याकडे जाम गर्दी होती,
परत घरी निघालो निराश होऊंन ..
येता येता एका केश्कर्तनलयाकड़े लक्ष गेले, कोणीच नव्हतं,
नेहमीचा नसून वेळ वाया नं घालवणे ह्या उद्देशानी आत घुसलो,
पाकिस्तानी न्यूज़ चैनल आणि त्यावरची जड़ उर्दू बडबड ऐकली,
नी कळालं की हां पाकी असणार नक्कीच!
त्यातच माझ्या मागोमाग एक आला पटकन बसला जाउन,
माझ्या आधी आलेला पण पार्किंग ला गाडीला टिकिट लावायला गेलेला,
"एक साहब है उनकी हजामत करके आपकी कट्टींग करूंगा"
असं मला तिथल्या एकमेव ईसमानी सांगितलं,
मी मान हलवली आणि मोबाइल वर बोटं फीरवायला लागलो,
माझी वेळ येइ पर्यन्त इमरान खान आणि तत्सम न्यूज़ चाललेली,
मग २ अजुन आले केस कापायला,
त्यांना उद्देशून तो इसम म्हणाला...
ये एक साब है, इनके बाद आपकी बारी...
आणि मग त्यांची बडबड...
आता मी बसलो,
माझे उरलेले सुर्लेले केस पाहत मी त्या इसमाला केस कसे काप ह्याची ब्रीफ दिली,
अता बॉर्डर वरचे न्यूज़ सुरु झाले...


*खीच खीच कच कच गर्र गर्र*
भारत की ओर से *गर्र गर्र* पाकिस्तान की ज़मी... *गर्र गर्र*
बरदाश्त नहीं किया जाएगा *गर्र गर्र*


मागुन आवाज आला...
आप कहा से हो जनाब
मी हसत म्हणालो,
मै हु हिन्दुस्थान से
मग काय नाय, काहीच विशेष घडलं नाही,
पण 'हिन्दुस्थान से...' हे सांगायला जाम मजा आली


*खीच खीच कच कच गर्र गर्र*






#सशुश्रीके | ११ ऑक्टोबर, २०१४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...