लोकलचा डब्बा असतो ना तसा होता आमचा ३रा मजला!
॥ श्री ॥
२२ ऑक्टोबर २०१४
लोकलचा डब्बा असतो ना तसा होता आमचा ३रा मजला!
मोडेल कॉलोनी, पुणे… अगदी पोस्ट ओफ्फिस च्या डाव्या बाजूची आमची राधानगरी अपार्टमेंट…
पुंडले, रबडे, काळे आणि अजून २ बिर्हाडं रहायची आमच्या त्या 'अनऔथोराईज्ड' अप्पार्टमेंटच्या ३र्या मजल्यावर,
खाली एक ओफ्फिस होतं कॉम्पुटर असेम्बल / दुरुस्ती पार्किंग मध्ये ४ गाड्या १० दुचाक्या
पुण्यात तेव्हा दुचाकी जास्त, असाच रेशो असायचा… ९०चा काळ
असो तर आख्या बिल्डिंग मध्ये १बीएचके पण पुंडले, रबडे, काळे आणि अजून २ बिर्हाडं राहायची मात्र ३र्या माळ्यावर
सुरुवात आमच्या १बीएचकेनी पण आमची जागा सोडली की पुढे तो रेल्वे लोकल डब्या सारखा निमुळता भाग अजून ही आठवतो
अंधार, २ जणं कशीबशी जातील असा…
रबडे, २ मुलं, १ रबडे काकांच्या बहिणीचा डिवोर्स झाल्यानी त्यांच्याकडे राहायचा तो नचिकेत,
माझ्या दुपरच्या अपराधांचा बरोबरीचा साथीदार,
काकू मात्र खाटेवर, २ रा मुलगा पोलिओ झाल्यानी बिनकामाचा,
तरी रबडेकाका कधी वैतागलेले दिसायचे नाहीत,
१ला मुलगा कुठेतरी नोकरी करायचा,
कधी ही गेलो त्यांच्याकडे नचिकेतला बोलवायला की हातात खाऊ द्यायचे,
१ खोली आणि ५ जणं!
पुंडले, सारखी भांडणं…
१ मुलगी १ मुलगा… आणि काका काकू,
त्या छोट्या खोलीत प्रकाशाला खेळायला जागा नव्हती…
पण आवाज खूप खेळायचा!
कधी रद्दी वरून कधी दुधावरून भांडणं,
काहीही कारण चालायचं!
१ खोली आणि ४ जणं!
मग उरल्या त्या ३ खोल्या,
काळे कुटुंब तरुण नुकतच एक पोर झालेलं,
जास्त कधी संबंध आला नाही.
१ खोली आणि अडीचजणं!
उरल्या २, दोन्ही कुलूप वाली,
१-१ = राहणार शून्य!
पुंडले आणि रबडेंचे दरवाजे साताठ उघडे!
दिवाळीत पणत्या सोडल्या तर काळोखाच असायचा.
आठवतात ते लोक अजून,
मला आयुष्यात प्रत्येक ठिकाणचे लोक आठवतात,

#साशुश्रीके
http://places.wonobo.com/pune/Radhanagari-Apartment/288162

Comments
Post a Comment