चै...
चै...
चई किव्वा चैतु!
अशी त्याला आम्ही हाक मारतो,
तसं त्याचं नाव चैतन्य...
चैतन्य अशोक गोगटे.
माझ्या कडून सांगायच्या तर तीन ओळखी...
पहिला मित्राच्या चुलत भाऊ...
मग मित्र आणि आता साला,
पण दुसरं नातं खुप महत्वाचं, मित्र!
माझं आणि अमृताचं अनोफिशिअल कीव्वा लपूनछापून म्हणा
जे काय प्रेम प्रकरण चालू होतं ते ह्यानी बरोबर ओळखलं,
आणि 'गुड चॉइस' चा स्टैम्प ही दिला अमृताला!
तिथेच जिंकला त्याने गेम!
खरच जेम हो आमचा 'चई' जेम!
ठाण्याला राहतात साहेब..
पाच पाखाडी, तळवळकर जिम जवळ,
इन्टरिअर डीझाय्नर आहे.
मस्त गुबगुबीत बांधा...
बऱ्या पैकी कॉन्सिस्टेंसी युक्त पोट,
सदैव हसरा चेहरा...
सदा सर्वदा हेल्पलाइन चालू असलेला एक दर्जेदार मित्र!!!
अतिशय प्रेमळ, त्याची आई तर त्याहुन प्रेमळ... असे लोक अजूनही असतात का? असा प्रश्न पडण्याइतपत!
चई आणि माझ्यातलं एक मोठं आणि एकुलतं एक साम्य म्हणा किव्वा वीकपॉइंट म्हणा, ते म्हणजे वाहनप्रेम!
अगदी खेळातली असो की प्रत्यक्षातली... नवी कोरी असो की जुनी,
असे जपणार की बास रे बास,
चकाचक और इनडेप्थ लव गारंटीड!
त्याला कीचेनचे प्रचंड वेड,
निरनिराळया कीचैन्सचा मालिक आहे तो...
आणि अश्याच छोट्या मोठ्या गोष्टींनी श्रीमंत माणूस सापडणे अवघडच...
त्यातलाच हा एक वेडा.
पुण्यात आला की शक्यतो सर्वांना आवर्जून भेट देणार,
पुण्यातच काय अगदी भारतात कुठेही कामानिमित्त गेला असला तरी तिथे कोणी ओळखीचे असल्यास...
पब्लिक रिलेशनचा स्टैम्प ठोकुनच साहेब परततात!
अगदी वेळेत वेळ काढून!
अजुन एक प्रचंड महत्वाचा गुण म्हणजे वडिलोपार्जित लोकांचा आदर..
सोपी गोष्ट नाहिये ही!!!
लोकांना न दुखावता सर्वांचा मान राखून जगणे महा कठिण असतं!
आणि तो ते अगदी सहजपणे पार पाडत असतो
माझी बायको आणि चई...
खुप जमतं दोघांचं...
तसं पाहायला गेलं तर त्याचं कोणाशी पटत नाही...
असा इसम तरी मी अजुन पाहिलेला नाही.
आता मी ज़रा मैत्रीच्या पुढच्या भागात प्रकाश टाकतो...
सहसा जावई लोक जावई सारखे वागतात..
माझं तसं काही नसतं, अह्हो तसं वागुन काय साध्य होतं... घंटा!
त्यामुळे मी कधीच त्याला साला म्हणून पाहिलं नाही...
मित्रा सारखं असावं, आणि तो ही तसाच राहतो माझ्याशी.
मुंबईत कामाला असताना वारंवार भेट व्हायची...
तो कधी किंगसर्कलला/जोगेश्वरीला यायचा मी कधी कधी ठाण्यात चक्कर मारायचो,
त्याच्याकड़े राहायचो...
आता मात्र वर्षातून एकदा दोनदा भेट होते.
कैलेंडरच्या साली बदलतात मात्र आम्ही आहोत तसेच!
आता लग्न झाले...
छान बायको आहे...
प्रचंड प्रवासयुक्त नोकरी आहे,
माझ्यासारखे मित्र आहेत,
अमृतासारख्या बाहिणी आहेत!
पूण्य कमवले हो पॉराने!
उद्या भेटणार आहे...
मस्त झप्पी देणार आणि विचारणार चई...
लेख वाचलास का!?
चई...
ह्यच्या बद्दल लिहिणं खुप सोपं आहे,
पण त्याचा सारखं असणं महा कठिण!
अगदी एका वाक्यात उत्तरे द्या म्हणालात तर
गुलजारजींच्या ' बावर्ची ' चित्रपटातला हा डायलॉग...
'It is so simple to be difficult,
but its so difficult to be simple.'
असा आहे आमचा चई!
चैतन्य अशोक गोगटे
Comments
Post a Comment