तो 'सिंपल' असतो आणि आपण 'डिफिकल्ट'
Its very difficult to be simple
आपले दोन आत्मे असतात
पहिला - सच्चा, निरागस, निष्कपटी...
त्या आत्म्याला न्याय देणाऱ्या लोकांना सलाम!
कोणाची नावं घ्यायची गरज नाही इथे,
तुमच्या मनात अश्या व्यक्ती अल्याच् असतील आत्ता हे वचताना,
त्यांच्याच उल्लेख केलाय आता इथे असं समाजा,
किव्वा लाइव स्ट्रीमिंग स्ट्रेट फ्रॉम योर हार्ट!
दूसरा आत्मा... हा जरा उशिरा जन्म घेतो!
नशीब! लोकांसाठीचा आत्मा म्हणू त्याला आपण,
हे खरे तर सख्खे भाऊ,
पण वय जसं जसं वाढतं तश्या डोक्याच्या वाटण्या करतात हे आत्मे,
बहोतकरून पहिल्याच्या वाटणीला आंगण येते
आणि मुख्य घर दुसर्याचा नावावर!
बालपणात जितकं जमतं त्यानंतर
ह्या दोघांना कधीच एकत्र आणता येत नाही
कारण दोघांत रेस लागते... सामाजिक दडपण,
सोप्या शब्दात 'लोक काय म्हणतील'-च्या प्रचंड वजनात
पहिला आत्मा पार दबुन जातो.
तो दूसरा आत्मा दिवसेंदिवस लट्ठ होत जातो,
त्याचं वजन ईतकं वाढतं की
कधी कधी पहिल्या आत्म्याला जागाच मिळत नाही.
त्यात दूसरा आत्मा दादागिरी कारतो,
आवाज मोठा ठेऊनच बोलतो,
दहशत असते त्याची!
ताटात एक निरागस कोशिंबीर विरुद्ध मटणाचा रस्सा असा प्रकार होतो,
सहाजिकच लोक त्या लालभडक
आणि चमचमीत रश्श्यावरच ताव मारतात
पण शेवटी कोशिंबीरच उपयोगी पड़ते, तीच थंड करते.
थोडक्यात काय...
Its very difficult to be simple
तो 'सिंपल' असतो आणि आपण 'डिफिकल्ट'
#सशुश्रीके | १५ डीसेंबर २०१४ सकाळचे ५.५७
Comments
Post a Comment