शेवटचे असे दिवस आहेत अजुनही तसेच्या तसे आठवतात...


खुप वाइट वाटतं जेव्हा शेवटचे दिवस येतात,
शेवटचे असे दिवस आहेत अजुनही तसेच्या तसे आठवतात...


मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर ते रिजेर्वशनचं टिकिट आणि कालनिर्णयाच्या दिनांकाकड़े ओलसर डोळ्यांनी पाहणे, आजीने दीलेल्या लाडवांचा डबा, चिवड्याची पिशवी... अर्धवट ओले कपड्यांची वेगळी... आलेपाकसाठी दिलेले सुट्टे पैसे.

बाहेरगावी जाण्या आधी आईने दिलेले परोठे, चटण्या, लोणची... रुमलांच्या घड्या... हे करू नकोस, ते करू नकोसचे पाढे, फोन नंबर्सच्या यादीचा तो छोटा कागद...

बाबांना मारलेली ती शेवटची हाक...
गुड नाईट... रोजच्या सारखं वाटणारं पण अखेरचं ते वाक्य, तो शेवटचा संवाद... ती शेवटची रात्र.

परागावास निघालेलो असताना आमच्या हीचा झालेला तो छोटा चेहरा, एक पत्र... काही फोटो, शेवटची मीठी, कड़कडून... सोडवुन न सूटणारी.

जाणार पोर म्हणून झालेला आरश्यातला तो इमोशनल चेहरा... रोज नाही म्हणत म्हणत त्या चिमण्या मुठीत हळूच दिलेलं ते चोकलेट... शेवटच्या झलकेपर्यन्त उड्या मारत बाय बाय करताना...

परत आठवतात जुने दिवस,
होतात ओले डोळे...
पसरतात बोटांवर काही गालांवर...
आठवतात, अजूनही

#‎सशुश्रीके‬ | २८ डीसेंबर २०१४ रात्रीचे ११.४३

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...