संगीताचा राजा - भाग २
संगीताचा राजा - भाग २
ऐन रंगात आलेली सभा अचानक बरखास्त केल्या सारखी...सर्व वादक आपआपली वाद्य आणि गायक आपआपले गळे सांभाळत महलाला सोडून जाउ लागले... अमच्या चेहऱ्या वर निराशेची लाट स्पष्ट दिसत होती... काही न बोलता एकमेकांकडे प्रश्नचिन्हांचे बाण सोडत असतानाच... राजे परत महालवर आलेले दिसले,
आता कोइन्टिअम फिंगरबोर्डही सुरक्षापेटीत जाताना पहिल्यावर आता महाल बरखास्त होणार ह्यावर आमचं शिक्कामोर्तब झालं!
आनंद म्हणाला...
'आत्ताच वेळ आहे... बॉस निघतोय!,
आता काहीकरून भेटायला हवच'
जसाजसा राजा महाल सोडून बाहेर जायला निघाला तसा तसा आमच्या सर्वांच्या पायला वेग आला... आता रेहमान अगदी जवळ... आजुबाजुला आमच्या सारख्याच वेड्यांची गर्दी...त्यात काहीजण 'सेल्फ़ी' साठी तडमडत होते, ज्यांना त्याच्याबद्दल माहीत काही विशेष माहीत नव्हते (ड्राइवर्स आणि इतर साफसफाई कामगार... काही फिलिपिनो काही एजिप्शिअन, पाकी, अफगाणी) ते ही फ़ोटो काढण्यासाठी पुढे मागे...
माझ्या मनात फक्त इतकेच की 'त्याला काही त्रास होउ नये ह्या गोष्टीचा, आज नाही तर नंतर कधी तरी भेटेल' असं करता करता शेवटी गाडी पाशी हा प्रचंड गोंधळ येऊन ठेपला... राजे वहनात बसे पर्यंत तो जनसमुदाय साखराला मुंगी लागल्या प्रमाणे त्या प्रसंगाला चिकटला होता! नुसते फ्लैशेस आणि मृदू गोंधळ!
गाडी सुटली... आशेचा किरण संपला... तेवढ्यात राशिद अली दीसला, आनंदनी त्याच्यापाशी जाउन हाय हेल्लो करत 'परत येणार आहात का... रीहलसल साठी?' असा महत्वाचा प्रश्न विचारला... त्याला उत्तर मिळाले!
"हा भई... डिनर ब्रेक के बाद मिलते है"
हे ऐकून धोणीने शेवटच्या चेंडू वर सिक्स मारावा आणि आपण सामना जिंकावा असा काही माहौल झालेला!
क्रमश:
#सशुश्रीके | २२ डीसेंबर २०१४ रात्रीचे १२.२४

Comments
Post a Comment