'PK' Movie Review

PK पाहिला...

धार्मिक खेचाताण आहे...
सुरुवात आणि शेवट चांगला केलाय,
एकच आवडलं नाही की हिन्दू धर्माला जास्त टार्गेट केले आहे...
कारण असे ही असेल की भारतात जास्त लोक हिन्दू आहेत.
आणि मी हिन्दू असल्यानी सहाजिकच ज़रा दुखावला गेलो आहे.

एका प्रसंगात 'धंदा बंद करवाएगा क्या' असा प्रश्न विचारतो मुर्त्या विकणारा PKला
आता PK त्याला काय विचारतो हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहायचा कि नाही ते तुम्ही ठरावा!

शेवटी मात्र 'मॉरल ऑफ़ द स्टोरी' पटते.
ह्या जगात २देव आहेत एक आपण बनवलेला
म्हणजे ढोंगी / अंधश्रद्धा पसरवणारा / गरीबन्ना रांगेत ठेवणारा
आणि श्रीमंतांना लवकर पावणारा आणि एक जो खरा...
ज्यानी आपली निर्मिती केली तो.

मुसलमान सच्चा नसतो असा 'भारतीय' समाजात जो समज आहे तो चुकीचा आहे,
ह्याबादल चा युक्तिवाद मांडलाय. आणि यात पाकिस्तानी मुसलमानचा शिरकावही आहे!
हल्ली बोल्लीवूड चित्रपटांत शेजारी देश का ईतका महत्वाचा विषय करून ठेवलाय ही एक मोठी चीडचीड!

एकूणच वादग्रस्त भेळ केल्ये,
त्याचा फायदा प्रेक्षका पेक्षा बॉक्सओफ्फिसला,
म्हणजेच बॉलीवुडला होणार / झालाय ह्याचा ९७करोड़च्या ओपेनिंगने सिद्ध झालं आहे म्हणा.

आमिरचा अभिनय अपेक्षे प्रमाणे... बाकी सगळ्या अक्टर्स ने बऱ्यापैकी साथ दील्ये.

‪#‎सशुश्रीके‬

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...