जगतल्या सर्वात बोरिंग जगांपैकी एक जागा म्हणजे बैंक!


जगतल्या सर्वात बोरिंग जगांपैकी एक जागा म्हणजे बैंक!


कूपन घ्या, चेक, डिपाजिट, विड्रोवल, लोन, लॉकर्स अणि कित्येक व्यवहारिक धुमाकूळ असतो, त्यात अर्ध्या लोकांना फॉर्म भरता येत नसतात, ती दोऱ्यानी लटकणारी पेनं दर वेळी गळफास लाऊन आत्महत्या करतात असच वाटतं...त्यापेक्षा लोकं त्यांना तसं करायला भाग पडतात असं म्हणनं जास्त योग्य! कारण काम सरो वैद्य मरो हीच भावना ठेऊन लोक्स् त्या पेनाचा अपमान करतात! आणि कधी कधी तर ते पनही गायब असतं! नेमकं आपल्याकडे पेन नसतं.. मग "दे माय..२दीस लिहला नाय... थोडं लिहायचय माय... दया कर माय... तुझं ल्वोन माफ़ व्हइल माय...तुझा च्येक कधी बॉउंस नाय होणार माय... तुला येक टका ज्यास्त याज मिलल माय.." अश्या .zip फाइलच्या इमोशनल स्माइली तोंडावर लोड करून 'पेन' हे अमूल्य शस्त्र थोड्या वेळपुरती मिळवण्याची कसरत करावी लागते.

मग टोकन नंबर हातात आला की...

• सोन्याच्या बिस्किटा सारखं त्याला वरून खालून निहाळत बसणे!

• टॉस करत... खाली पडला की तो घोंगाळत कोणाच्या पायखली आला की कपाळावर आठ्या देत हसून आपल्या बालमनाचा मोठेपणा सिद्ध करणे

• ओळखीचे कोणी दिसले की.. "काय इथे कुठे!?" सारखा वह्यात प्रश्नांची दगडफेक करणे

• बँकेच्या लोन/व्याजदराची माहिती भिंतींवर असतानाही उगाच गरज नसताना 'बीझी' कार्यकर्त्यांना विचारपुस करणे

• महत्वाची कागदपत्र विसरल्यास ९९वर आउट होण्याचा भाव आणणे

• सेक्युरिटी गार्डच्या बंदुकीकड़े पाहुन आपण उगाच काहेतरी गुन्हा करणार आहोत आणि तो आपल्याला आता गोळी मारणार आहे असा भास होणे

• केशियर काउंटर वर तो केशियर निश्काम कर्मयोगी भावनेने पैसे मोजून देणे / घेणे. • लॉकररूम मध्ये गेल्यास डबल चावी घेऊन येणारा इसम आपल्यास त्या कमी प्राणवायु असलेल्या खोलीत आपला शेवटचा श्वास घेण्यासाठी सोडून गेला की काय अशी वाइट कल्पना येणे.

• कूपन क्रमांक आपलाच आहे का.. जरी आपला नंबर अगदी दहा नंबर पुढे असला तरी तो लगेचच येणार आहे अशी निरर्थक अपेक्षा करत तो अंकफलक डोळे न झापता बघत बसणे

• मध्येच कोणाचा फोन आला की उगाच बैंक लूटण्यासाठी कोणाचा कॉल आलाय असे संशय आणून सिक्युरिटी गार्ड येऊन आपणास फोन बंद करण्यास लावणे.

• त्यात बैंक बंद व्हायची वेळ आली की चोराला पळून जाण्यास मदत कारवी असा काही प्रसंग आल्यासारखा अर्धवट शटर कडे बोट दाखवत तो गार्ड एक फेक निरागस स्माइल देतो... असे खुप प्रसंग आहेत.

पण काही बँकामध्ये वर्षोंवर्ष जर येणजाणं असेल तर लगेच गार्ड पासून अगदी मेनेजरपण घरी पाहुणे आल्या सारखे वागतात! चहा पाणी विचारतात.. मस्तच वाटतं, आणि जे काम करायला आलोय ते होताच परत अजुन काही कामं पण होतात उदा. पासबुक क्यू वीना भरून मिळतं, काही कागदपत्रांची झेरॉक्स वगैरे नसतील तर "काही हरकत नाही हो... ऐ राकेश ह्या डाक्यूमेंट्सच्या ३झ्येराक्स आण पाहू" असा काहीसं अल्हाद्दायक मदतकार्य मिळतं!

पण तरीही...
जाम बोरिंग... नाहीच आवडत मला बँकांची विझीट, तरी बरे आहे हल्ली ऐटीएम् + डिपॉज़िट+व्हीड्रॉवल मशीन्स मुळे पूर्वीसरखं हागल्या मुतल्या बॅंकेचं थोबाड बघावं लागत नाही!

बैंक ऑफ़ अमुक अमुक, अमुक बैंक सगळ्या सारख्याच... आल बैरिंग यो!

#सशुश्रीके | २७ डीसेंबर २०१४ दुपारचे १२.३९

Comments

  1. खरंच अगदी असंच वाटतं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...