कोणी वेळ देतं का वेळ!?

कोणी वेळ देतं का वेळ!?

घड्याळ मिळेल पण त्यातली वेळ!? ही एकच गोष्ट कितीही पैसा ओतला तरी मिळत नाही! त्यामुळे वेळेला किम्मत आहे, असं उगाच नाही म्हणत! त्यामुळे घड्याळाला ही किम्मत, पैशानी नव्हे, आपल्या दैनंदीन जीवनातली घड्याळाची किम्मत...करा करा विचार करा, एखादी बाई दिवासातून जेवढ्या वेळी अरश्यात बघत नसेल, तीतक्या वेळी आपण घड्याळ पहात असतो!

मग वेळेची टिंगल केली की डोकं फिरतं, नवीन गाणं, 'टिक टिक वाजते डोक्यात' म्हणे! ते गाणं कधीच पूर्ण ऐकवतच नाही, असं वाटत वेळ वाया चाल्लाय!

हाच वेळ वाया जातो म्हणून दुपारी कितीही मरणा इतकी झोप येत असली तरी झोपत नाही, काही वर्षच जगतो आपण, त्यात झोपायचं का! झोप असावी, झोपेपुरती! पण कायपण म्हणा..घड्याळ खऱ्या अर्थाने नाचावतं सगळ्यांना,कधीच कोणासाठी थांबत नाही, आणि ते थांबल तर काही खरं नाही, पूर्वी हा प्रकार व्हायचा म्हणे! किल्ली द्यायला विसरले की काटे हळू व्हायचे आणि पुढे गोंधळ जोरात!मानगटात घालताच चालू होणारे आणि मग पुढे ७-८ तास चालू राहणारी घड्याळ पण होती! माझ्याकडे आहे अजुन ही, बाबांचं 'सीको' कंपनीचं!

लहानपणी पै-पै जमा करून कोम्बडा आणि इतर काही आवाज येणारं एक हाततलं अलार्म वॉच अजुनही आठवतं, खरं पाहिलं तर इतकं कुरूप होतं ते, पण काहीतरी वेगळं, खाज ना मित्रांमध्ये शाइनिंग करायची! नंतर डिजिटल चा कंटाळा आला म्हणून मग क्वार्टझ!, त्यातही खाज, आतलं डायल काढून त्या ऐवजी 'सचिन'चा फोटो, तो नीट सेट होइ पर्यन्त धडपड, चीड़चीड़! धमाल होती पण, कोणी नवीन घड्याळ दाखवलं की आपलं कसं 'भारी' ते प्रूव करायचं आणि वेळ न बघता त्या घड्याळाकडे बघत राहायचं!

तसं माझं घड्याळ नेहमी ५ ते १० मिनिट पुढे असतं, उगाच समय के आगे चलो वगैरे मै हम विश्वास रखते है या साठी नव्हे, पण सवयच झाल्ये तशी, आणि माझीच नाही खुप जणांना असते ती!

काही लोक घड्याळच वापरत नाहीत, अरे काय असं!!! काय ते वेगळेपण, अहो घड्याळ पाहिजेच! 'अरे मोबाईल मध्ये कळते की वेळ!' किंवा  'मला नाही आवडत घड्याळ घालायला' हे ठरलेलं उत्तर असतं! पुढे भयाण शांतता, मी आपला माझ्या मनगटा वरचं घड्याळ निहाळत दुर्लक्ष करतो!

बाकी सामाजिक वेळ पालन करणे ह्यात मुख्य कलाकार म्हणजे, आपली मुम्बई लोकल, लग्नकार्य मुहूर्त, शाळेची घंटा, मीलचा भोंगा सगळे कसे वेळेत! तो ही एक प्रकारचा अलार्म, पण आपल्या घराच्या अलार्म च्या अगदी उलटा, वाजण्या आधी वाट पाहायला लावणारा!

आता जरा माझ्या फोन वरची वेळ बघुयात! ह्म्म्म १२.५५ ...ते पण रात्रीचे! 

जाउदे, बर... मी काय म्हणत होतो, माझ्याकडे एक डीजल टोटल ब्लैक घड्याळ आहे, लोक ते पाहून म्हणतात तुला ह्यात वेळ कळते?? मी म्हणतो हो… अजून चष्मा नाही लागला! 




अजुन एक डीज़लचच पण डिजिटल, 


एक पिवळं 'फॉसिल', 


एक 'निक्सन' वॉटर प्रूफ, फुल मेटल, प्रोफेशनल डाइविंगवालं मस्त जड! 


आणि एक बाबांच सीको आहे, पण  ते खास प्रसंगीच वापरतो, दिवाळी दसरा किंवा  काही ख़ास दिवस आणि तसा पेहराव असेल तरच! वाडलांना त्याच्या कंपनीने १४ वर्षांच्या कार्यकिर्दी बद्दल दिलली भेट! अजुन ही आहे...ते घड्याळ घातलं की बाबांचा सहवास जाणवतो आजुबाजुला!

बाकी आमच्या घरी हॉल च्या भिंतीवर एक 'कुकूक' घड्याळ होतं! काय सुन्दर होतं सांगू मस्त घरट्याच्या आकाराचं, त्यात ३ खीडक्या दर तासाला  कुकुक करत ते तीन पक्षी डोकावायचे, आणि बारां वाजले की मज्जाच! बारा वेळा 'कुकुक'!!!


लाहनपणी राग यायचा तो त्या अलार्म क्लॉकचा, असं वाटायचं की हा अलार्म प्रकार कोणी काढला त्याला सारखं झोपेतुंन इठवून त्रास देत राहावं, झोपला की उठवला! मर मेल्या, पण आता महत्व कळतं, व्हेन यू स्नूझ, यू लूझ! आता परिस्थीती वेगळी आहे, उठलो नाही वेळेत, तर पोटापाण्याचे वांदे होतील!

एकूणच घड्याळ हां विषय खुप 'वेळे'वर संपवलेला बरा! 
कारण झोपायला उशीर, मग उठायला मग, सारखं त्या गाडीतल्या घड्याळाकड़े पहात रहा!

#सशुश्रीके | २३ डीसेंबर २०१४ रात्रीचे १.१०



Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...