Posts

Showing posts from 2018

धडक धधक...

Image
धडक धधक... धक धक खंड खुड खुड कखीच धुक... धडक धडक... धडक धधक  रूळ बदलते ना रेल्वे... त्याचा आवाज, जेव्हापासून ऐकला तेव्हा पासून इतका डोक्यात कोरला गेलाय विचारू नका! ज्या डब्यात बसलोय त्याचा वेगळा, बाजूने जाणाऱ्या रेल्वेचा वेगळा.. संथ ... जोरात जाणाऱ्या रेल्वेचा वेगळा, काही तरी खास आहे ह्या आवाजात! संगीत आहे ह्यात... एक आकर्षण आहे... उगाच नाही द जेंटलमन च्या चीकबुकरैले किंवा दिल से वाल्या छईया छईया मध्ये रहमान ने वापरलं... वापरलं पण असलं खास! अरे हो... लकी अली ने पण वापरलं आहे 'कहा से तू आती है...' भोपाल एक्सप्रेस नावाच्या चित्रपटात, अजून पण आहेत... पण आता तरी ह्या ३गाण्यांची आठवण धडकली कानात. जाम भीती वाटायची लहानपणी त्या क्षणी जेव्हा रूळ/ट्रॅक बदलायची रेल्वे, आणि तो क्षण आठवून अजून आता मजा येते, मोठा प्रवास असेल तर रात्री झोपेत पण तो आवाज ऐकून कसं 'लै भारी' आवाज अशी स्वतःलाच एक दाद देतो मी.. तो दोन/तीन सेंटीमीटर का काय असेल तो गॅप दोन रुळांमधला, इतका इम्पॅक्ट करून जातो ना 😊 अजून ही रमतो मी त्यात, डोळे बंद करायचे आणि... धडक धधक धक धक खंड

व्योमकेश (ब्योमकेश) बक्षी...

Image
स्वप्नात दिसलेला एकदा... खूप प्रयत्न केला त्याने मला 'कलक्त्याला ये एकदा!' वगैरे सांगून, पण नाही... पुणे सोडवेना, इथे खून वगैरे ते पण रहस्यमय वगैरे अशक्यच, झोपेच्या वेळेत १-४दुपारी शक्य आहे, पण कोण सोडणार दुपारची झोप, आणि झालाच जर खून, तर कोण ठेवणार लक्ष... असो विषय भरकटत आहे! तर सांगायचं असं की हा रजीत कपूर! जणू ह्या रोल साठीच बनलेला, त्यानंतर च्या सर्व भूमिका त्याने केल्या असतील खास, पण... पण ही व्योमकेश मधली सरलता, सहज पणा... त्याचं ते हसणं, गू ढता खुलवणं, जरा फारच भारी! त्यात लहानपणी पाहिलेली मालिका, आठवत नाही म्हणून परत पाहिलेली दूरदर्शन वरच, मग आता युट्युब वरून, म्हणजे एक एपिसोड निदान ३दा तरी नक्कीच पाहिलाय... सुरुवातच काय खास शीर्षक वादनाने, कोणीतरी झपाटलाय खुनी ला पकडायला, पण प्रत्यक्षात मात्र थंड डोक्याचा, उंच, शिडशिडीत... कमालीचा हुशार आपला देशी जासुस! व्योमकेश नंतर खूप आले गेले... त्यावर हिंदी सिनेमा पण आला... वेगळा होता, छान संगीत, जरा हटके... पण मालिकेतली सरलता गाठता आली नाही, 'एक्शन' ला बाजूला ठेऊन व्योमकेश बक्षी मालीकेनी जी मजल मारल

सस्पेन्स!

आमच्या ऑफिस मध्ये घडलं हे... ज्युनियर डिजाइनर... माझ्या बाजूलाच बसणारा.. काम करता करता रडायला लागला अचानक! मला कळेना, कारण मला बोलावलेलं बॉस ने तेव्हा प्रमोशन दिले आणि आता हा रडतोय! उडवला की काय त्याला.. की अजून काय? तितक्यात एक मुलगी (एम्प्लॉई) आली त्याला रडताना पाहून त्याला घेऊन गेली कुठेतरी १मिनिटाने तो परत आला... रडणे थांबलेले आणि हसत होता गुलाबी गुलाबी! त्याला मग मी नंतर विचारलं.. बाबा काय झालं... ऑल ओके ना.. तू रडत वगैरे होतास! म्हणाला सगळं व्यवस्थित... मला प्रोमोशन दिले, मी आता ज्युनियर नाही.. नुसता डिजाईनर... ज्युनियर नाही! आनंदाश्रू होते ते! 🤣 माझा जीवात जीव आला तेव्हा! उगाच मधला अर्धा एक तास सस्पेन्स मध्ये गेला तो जेवायला गेलेला त्यामुळे! 🙄 #सशुश्रीके । १८ ऑक्टोबर २०१८

लघुव्यथा

Image
बॉर्डर पार करून आम्ही आता हवे तिथे नको त्यावेळी आलेलो, गोळ्या संपत चालल्या असतानाही रिस्क घेऊन आणि नशीबाला बोलवत, आयुष्यात कमावलेली सर्व हिम्मत हातात गोळा करून मी पुढे लोळत लोळत सरकत होतो, आजूबाजूला शत्रू कुठूनही मला टिपू शकतो आणि मी त्यांना...   अंधार, शेत त्यात अमावस्या, रातकिडे, बेडकं, पाऊस चिखल आणि काळेभोर आकाश ह्यासर्वात एक धपाटा बसला माझी तंद्री लागलेली बहुतेक... आईचा आवाज पाठीमागून, अरे बसलायस काय नुसता ताटातले संपव, परत काही हवं असेल तर सांग मी अंगणात तांदूळ निवडायला जात आहे... ताट पाहिलं तर पूर्ण संपलेलं, प्रचंड झोप येत होती. आयुष्यात पहिल्यांदाच भर दुपारी मस्त पडी मारली. अचानक भूकंप आल्यासारखं वाटलं... घाबरायच्या ऐवजी 'काय कटकट आहे' असा विचार करत करत... आता मात्र फटाक्यांच्या आवाजाने जाग आली... "दुपारी कसले फटाके!" प्रयन्त केला डोळे उघडण्याचा... सर्व आवाज बंद झाले... आवाज येत होता तो आमच्या रेजिमेंट प्रमुख साहेबांचा,  माझ्यानावाने भाषण देत होते... मग लक्षात आलं एम नो मोर. जय हिंद. #सशुश्रीके 

"अरे दुष्काळ पडला आहे भाषण काय देतोस तांदूळ दे"

Image
भारतात न राहता तू का बडबड / पोस्ट करतोस *पेट्रोल* दरवाढी बद्दल असा प्रश्न विचारला एका मित्राने आणि पुलंचा एक संवाद ही चिकटवला... अंतू बर्वा म्हणाला ... "अरे दुष्काळ पडला आहे भाषण काय देतोस तांदूळ दे" तसच "अरे जुन्या सरकार ने काय केले ते काय सांगतोस पेट्रोल स्वस्त कर." हे पटलं ही! 😁 शेवटी सामान्य माणसाला जो फटका बसतो तो कोणाला नाही. आणि भारतात राहून तो हे बोलत आहे, त्यामुळं त्याला जे वाटत आहे त्याबद्दल मी काहीही बोलणे चुकिचेच, ही गोष्ट वेगळी की आता कित्येक वर्षे दुबईत दिरहाम १.२ ते १.४ असलेले पेट्रोल गेले काही महिन्यातच महाग होत होत आता दिरहम२.४८ ला आलेले आहे. म्हणे जागतिक बाजारपेठे नुसार रोज कमी जास्त होत राहणार, स्थिर राहणार नाही आकडा, पण हा आकडा वाढत जात आहे हे नक्की. बॅरल रेट $१५० चा $७५ वगैरे झाला असेल तरी. असो ... सध्या पेट्रोल दरवाढ का थांबत नाही किंवा स्वस्त का होत नाही ह्यावर मोर्चे संप बाचाबाची ओढाताण मतभेद सगळं होत आहे, अमुक अमुक देशात स्वस्त आहे, आपल्याकडे का नाही? सरकार ने दिलेल्या अश्वसनाचे काय झाले! • लग्ना आधी तुमच्या मुलीला सर्व सुख-

गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋

मॅच मध्ये रनौट व्हायचे किस्से सांगत होते मित्र एकमेकांना तेव्हा आठवलं 😆 मॅच असताना रन्स काढताना काय धडधडायचं छातीत! फुफ्फुस बाहेर येईल आणि शांत हो म्हणेल असं वाटायचं चायला... भलतच थ्रिल होतं ते! आणि धावून श्वास घेई पर्यंत तो मरतुकडा पण लै फास्ट बॉलर दुसरा बॉल घेऊन धावत येताना दिसायचा, तेव्हा पळून जावसं वाटायचं अक्षरशः 😣 एकदा गोट्यांवर फुलटॉस आलेला... थेट गेलो टीचर्स रूम मध्ये ... असला आडवा झालो विव्हळत ... तेव्हा तो सिलिंग वरचा पंखा हेलिकॉप्टर च्या पंख्यासारखा वाटत होता! फिल्डिंग च्या वेळी तर हातात बॉल आणि बळ दोन्ही आलं तर ठीक नाही तर ह्या शिव्या! गेले ते दिवस.. राहिल्या त्या शिव्या! 😋   #सशुश्रीके ०९.०९.२०१८

संतवाणी

Image
संतवाणी, हो हो संतवाणीच जणू ! हार्मनी मधली रहमानची वाक्ये म्हणजे... संतवाणी A.R. Rahman आत्तापर्यंत इंटरव्यू ला उत्तरे द्यायचा.. #Harmony with A.R.Rahman ह्या मालिकेत तो इंटरव्यू घेत आहे, आणि अधूनं मधून commentary पण देत आहे. जीवन कसे जगावे, कसे वागावे, काय साध्य करावे. किती सहजतेने सांगतो तो, तेही संगीताच्या माध्यमातून! मी लक्ष देऊन ३-४ दा ऐकले आहेत सगळे एपिसोड्स म्हणून असं लिहिलं आहे मालिकेच्या २ऱ्या भागात, कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी त्या विषयातले अज्ञान गरजेचे असते, आणि अज्ञान किती आहे हे जो जाणून घ्यायचा प्रयत्न करेल तोच पुढे जाईल... असं काहीसं बोलला तो आता नीट समजावून सांगता येत नाहिये, पण प्रत्येक वाक्याचा शेवट संगीताने(विषयाने) केलाय त्याने. संगीत माध्यमातून संतवाणीच ना ही! #सशुश्रीके

डांबर, सिमेंट की चिखल?

आपलं मन कसं असतं माहित्ये का, उगाच तुलना करावीशी वाटली म्हणून असेल पण...अगदी सेम असच असतं मन... कडक उन्हातल्या डांबरा सारखं कच्च्या सिमेंट सारखं, झालच तर सारवलेली जमीन किंवा चिखलासारखं अश्या ह्या गोष्टी जेव्हा प्राथमिक कक्षेत असतात तेव्हा त्यांवर चुकून / मुद्दामून कोणाचेतरी पाय.. वाहनांचे टायर इ. गोष्टींचे ठसे येतात. मुद्दामून जड गोष्टी सांगतोय बर का, हे लोकांनी टाकलेले कचरे, पिचकाऱ्या वगैरे टिकत नाहीत. मला अजून ही अशी ठिकाणे लक्षात आहेत जिथे लोकांच्या पायाचे किंवा चपला, बुटांचे ठसे बांधकामाच्या वेळेला जे चुकून किंवा मुद्दामून झालेले... ते अजून ही तसेच आहेत, रस्त्यावरच्या गरम झालेल्या डांबरावरून गेलेल्या एसट्या इतर वाहने, बैलगाडीच्या चाकाचे... बांधकामाच्या ठिकाणी केलेला कोबा त्यावर पडलेले पाय, किंवा तत्सम काहीही... असे हे ठसे... किंवा घाव! राहत नाहीत जास्त काळ ते फक्त चिखलावरचे, चिखलच की हो तो! एकदा झाला की फार काळ टिकत नाही तो, एक तर त्याची माती होते किंवा परत चिखल! त्यात ठश्यांचे काय कौतुक!? आपल्या जीवनात पण असच असतं की, कोणाची मनं डांबरा सारखी तर कोणाची सिमेंट तर कोणाची चि

सांसो की जरूरत है जैसे...

कुठल्या तरी मूवी मध्ये गडबड सीन ला नाही का ... "#गोलमाल है भाई सब गोलमाल है" हे गाणं वाजतं बॅकग्राऊंडला... आठवलं, आठवलं...  #हेराफेरी! 😆 डिरेक्टर/स्क्रीप्टरायटर किंवा जो कोणी असेल हा सीन सिनेमात ओतणारा तो लै भारी! आणि ही कल्पना नाही, सत्य परिस्थिती आहे... माझ्या कडून हे नेहमीच होतं आणि मजा म्हणजे ह्याउलट ही होतं, एखादं गाणं ऐकल्यावर मला तो प्रसंग आठवतो जेव्हा ते गाणं वाजत होतं! म्हणजे रँडमपणाचा कळस... उदाहणार्थ प्रवासानिमित्त भल्या पहाटे कुठे एका ढाब्यावर कुमार सानु किंवा अलका याग्निकचे प्रेमरस युक्त तडका गीत वाजत असेल जे मला फारसं आवडत नसेल पण तरी जे जेव्हा जेव्हा वाजतं तेव्हा तेव्हा तो ढाबा अक्षरशः 3D मध्ये माझ्या आजूबाजूला तयार होतो! जस्ट इमॅजिन फोक्स... यु आर इन मिडल ऑफ समथिंग, लाईक... तुम्ही मंदिरात आहात आणि दुरून कुठल्या तरी ठिकाणाहून "सांसो की जरूरत है जैसे..." वाजत आहे आणि दिसला ना ढाबा! आता नमस्कार करायचा की ऑर्डर!?? 😫🤔😝 #सशुश्रीके १४.०८.१८

जूनं ते सोनं!

Image
हा फोटो पाहिला आणि एकच आलं मनात...   जूनं ते सोनं ! जुने  # Walkman किंवा कुठले ही # Portable cassette player पाहिले आत्ता की काय वेगळच वाटतं! Side A/B Head साफ करा, # Cassette जाम झाली की pencil ने नीट करा... नाजूक # Earphones ना सांभाळा, सारख्या batteries बदला... किंवा rechargeable batteries charge करत बसा, मग नंतर नंतर advance level आले... दोन्ही side cassette न काढता # Play करता यायला लागले, २ च्या ऐवजी एकाच batteryवर काम व्हायला लागले, Manual # equalizer मग # Pop #R ock # Jazz # Clas sical सारखे #P resets येऊ लागले! आणि मग # CD आता # usb , त्यातल्या त्यात cd players ने जराशी धूम केली, पण portable cassette players नी आपल्या सारख्या #Music lovers च्या मनात एक घर केलं, त्या घराचं रूपांतर बंगल्यात केलं... आणि आता ते घर स्वप्न होतं की काय असं वाटू लागलय! जुन्या गोष्टींमध्ये एक कमालीची शक्ती असते, जसं आयुष्यात काही नवीन घडावं, यावं असं वाटतं तीतकच हे असं जुनं परत यावं नवीन करकरीत होऊन असं वाटतं, आणि जगात अश्या गोष्टीही आहेत ज्या जुन्या असून ही Br

सुपर ड्यूपर!

Image
चावी तीच्या मानेला लावून पिळायची उजव्या बाजूचा क्लच आणि मोठं अड्जस्ट करत न्यूट्रल ला आहे का नाही तपासायचं जरासं वाकून पण न बघताच ऑफ चा खटका पेट्रोल आहे की नाही हे आठवत असल्यास ऑन / रिजर्व च्या दिशेने वळवायचा मग तीच मूठ घट्ट पकडून दुसरा हात पहिल्या सीटच्या मागच्या बाजूला धरून खाली खेचायची जरा हलवायचं अख्ह अंग जमिनीच्या दिशेने (तिचं) , एकदा किव्वा मूड असेल तर दोनदा परत मूळपदावर आणून ठेवायची मग आता उजवी आणि डावी मूठ दोन्ही बिझी करून पायाला आज्ञा द्यायची नशीब बलवत्तर असेल तर ठीक नाही तर रिव्हर्स किकच्या अपेक्षित झटक्यांसह शरीर सहन करण्यात सज्ज ठेवावे लागायचे सुरु झाली एका किक मध्ये तर देवाचं नाव घेत उडी थेट सीटवर दोन्ही पाय आजूबाजूला फायनली खट्ट कनी पण गियर अलगद टाकल्याच्या अभिनयासकट एक्सलरेटर न वाढवता तिला स्टॅन्ड वरून रस्त्यावर स्थानापन्न करायचे डावा पाय जमिनीवर ठेवून उजव्या हाताने साइड मिरर सेट करत दाणेदार आवाज अंग अंग हलायचं असा तो दरारा आणि... झेप घ्यायची ती लक्षा कडे कधी कॉलेज कधी दळण कधी ईथे कधी तिथे अशी होती आम

व्यक्त व्हा!

मोठी गोष्ट! व्यक्त व्हा... म्हणजे फेबु / ट्वीटर हे माध्यम नाही प्रत्येक गोष्ट सांगायला, पण इन जनरल सांगतोय. हल्ली कमी वयातच तणावाने हार्ट एटॅक येतात, काही आत्महत्या करतात, आणि ह्याचा अंत चांगला नसतोच. भविष्यातील 'डॅमेज' अटळ! आनंद वाटण्याने सुख वाढते, आणि निराशा न वाटण्याने दुःख. हे लिहायला/बोलायला/ऐकायला कितीही सोपे असले तरी हेच खरं आहे. मनात जे असेल ते मनात ठेवून मन जड करण्यापेक्षा हलकं व्हा, खिडकी बंद करून श्वास कोंडण्यापेक्षा जराशी उघडी खिडकी कधीही चांगली... नाहीतर शेवटी ऑक्सीजन लावायची वेळ येते. स्वतःची काळजी घ्या, तुमच्यावर इतरही अवलंबून आहेत हे लक्षात ठेवा. - तुमचाच काहीसा गंभीर समीर.

राजी

Image
काहीतरी दुःखदायक घटनेची बातमी ऐकली / वाचली असेन मी त्या दिवशी, आणि जरा संतापून/निराश होऊन मी एका मित्राला प्रश्न विचारला, का एक माणूस दुसऱ्या माणसाला मारतो! म्हणजे एका जिवाने दुसऱ्या जीवाला का मारावे? त्याने सहजच एक उत्तर दिले, म्हणाला... "तुझ्या मुलीला जर कोणी मारलं तर तू त्या व्यक्तीला काय करशील!?" मी चटकन प्रतिसाद दिला नाही, hmmmm केलं न शांत राहिलो, पण मानातल्यामनात त्या व्यक्तीला मारलं. हा एक प्रसंग/प्रश्न/उत्तर मी कधी विसरणार नाही, खूप साधा आहे प्रसंग, पण खूप परिणामकारक, जर इतका साधा प्रसंग एखाद्याच्या मनात इतका खोलवर जाऊ शकतो, आणि काहीतरी असे घडवतो की त्याचा तुम्ही तिरस्कार करत असता... तर असे काहीसे घडलेल्या / अनुभवलेल्या व्यक्तीच्या मनावर तो काय परिणाम करेल!? तुमच्यासाठी काय पण पासून... कुटुंबासाठी काय पण धर्मासाठी काय पण राष्ट्रासाठी काय पण देशासाठी काय पण असे वेगवेगळे 'काप पण' ची वेळ परिस्थिती नुसार प्रत्येकाच्या आयुष्यात कधीनाकधी येत असते. सेहमतच्या (आलिया भट) आयुष्यात पण अशीच एक परिस्थिती येते, परिस्थिती का येते आणि त्या परिस्थितीला ती

१०२ नॉट आऊट / 102 NOT OUT

Image
102 NOT OUT छानच टाइम पास आहे,  दोन महान बॉलीवूड म्हाताऱयांनी मजा केली आहे मस्त, शेवटी भावनात्मक शेकोटी आहे, कथानकेकला उबदार पणा छान येतो त्यामुळे, कुठे बोर वगैरे होत नाही. १०२ वर्षाचे वडीलच मुलाला वृद्धाश्रमात टाकतात ही गम्मत तर ट्रेलर मध्येच सांगून टाकली आहे त्यामुळं त्याहून जास्त काही पाहायला मिळेल असं वाटतं... आणि तसं आहे ही काही, पाहून बघा... आवडला नाही तरी नाही आवडला असं तरी म्हणणार नाही असा काहीसा आहे... म्हणजेच वन टाइम वाच नक्कीच! औलाद अगर नालायक हो, तो उसे भूल जाना चाहिये, सिर्फ उसका बचपन याद रखना चाहिये. अमिताभने हा डायलॉग इतका नैसर्गिकपणे म्हटला आहे, की अभिषेकला सिनेमे मिळत नसल्याचं आठवल्याशिवाय राहवत नाही. डायलॉग रायटरला दंडवत!    3 स्टार्स फ्रॉम मी #सशुश्रीके

The Americans, TV Series Review

Image
The Americans ह्या अमेरिकन टेलिव्हिजन सिरीजचा पहिला एपिसोड 2013 मध्ये FX चॅनेलवर आला. १०पैकी ८.३ रेटिंग मिळवणाऱ्या या सिरीजचे प्रत्येकी १३ भागांचे पाच सीझन झालेले आहेत. आता शेवटचा, सहावा सीझन मागच्याच महिन्यात सुरु झालेला आहे, गेल्या ५वर्षात ह्या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली आणि आता ती शीगेला जाऊन पोचली आहे. विश्वासावरचा अविश्वास आणि अविश्वासावरती विश्वास किव्वा जो आहे तो कशावरून तोच, जो तुम्हाला वाटत आहे? असं काही तरी अजब कोडं घेऊन ह्या मालिकेची सुरुवात होते. एका रशियन गुप्तहेराला पकडून त्याला 'किडनॅप' करायचे काम आटोपल्यावर कळते की त्याला पकडणारे स्वतः २ रशियन्स गुप्तहेर आहेत, नुसते रशियन्स नाहीत ते एक जोडपं आहे, १९६० मध्येच रशियन्स ने अश्या जोडप्यांना 'तयार' करायला सुरुवात केलेली, त्यापैकीच एक गुप्तहेर जोडपं म्हणजे 'फिलीप' आणि 'एलिझाबेथ', कथानकाचे २ प्रमुख नायक, त्यांची दोन मूलं आणि त्यांच्या शेजारीच राहणारा FBI एजेंट त्याचे कुटुंब ह्यांच्या आजूबाजूला ही सर्व मालिका रंगवण्यात आलेली आहे. फिलिपची ट्रॅव्हल अजेंसी आणि एलिझाबेथ 'हाऊस

आनंद गानू.

Image
जगातली सर्वात आवडती व्यक्ती कोण, असा कोणी प्रश्न विचारला तर नक्कीच डोळ्यासमोर काही चेहरे येतात, पहिला चेहरा असतो, नेहमी पहिला तो म्हणजे आनंद काका आनंद गानू.   कपाळावर गंध, कानात वाळा जंन्नत-ए-फिरदौस किंवा अशाच कुठल्यातरी अत्तराचा कापूस, कोपर्याच्या आणि मनगटाच्या मध्ये फोल्ड केलेला फुल शर्ट, पॅन्ट, हातात अंगठ्या, कोल्हापुरी किव्वा बाटा चप्पल असा साधा आमचा आनंद काका, आणि सतत हसतमुख 😊 म्हणजे आनंद काका ला कोणी पाहिलं तर तुमचा मूड कसा ही असो, तुमच्या चेहऱ्यावर नकळतच एक आनंद छटा उमलणारच, बर मी ही अतिशयोक्ती करत नाहीये, आनंद काका माहीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी लिहिलेल्या वर्णनाला १०१% पाठिंबा मिळणार हे नक्की! 👌 तर, असा हा बाबांचा मित्र पण, त्यांचं बालपण एकत्रच गेलं... ब्राम्हण वाडीत काका राहायचे जवळच्याच एका इमारतीत माझे वडील, अरुण-आनंद अशी जोडी. बाबांबद्दल खूप नवीन नवीन काय काय सांगायचा काका, हो.. माझ्या साठी नवीनच ना, तुझे बाबा गाड्या काय छान काढायचे, सरळ रेश तर पट्टीविना वगैरे, बाबा असे तसे, आणि मी पण हे सर्व ऐकून आपण किती नशीबवान आहोत, असे बाबा आणि काका मिळ

सही कशाला हवी, सही माणसं हवीत!

Image
बोरीवलीत असतानाची गोष्ट, गोखले विद्यालयात होतो, ३/४ थीत असेन, शाळेत आम्हाला एक फॉर्म दिला, हेल्पेज इंडिया संबंधित, घरोघरी जायचं आणि पैसे गोळा करायचे, सगळ्यांनाच एक एक कागद दिलेला, नाव / पत्ता / सही आणि पुढे रक्कम वगैरे तक्ता असलेला कागद. मला तर खरं हे करायला आवडायचं नाही, पण प्रत्येकाला करणं भाग होतं, मी ओळखीच्या लोकांना आधी भेटायचो, मग घरी आलेल्या पाहुण्यांना, मग सोसायटीची अनोळखी दारं असं आठवडा भर तरी चाललं असेल, तो फॉर्म कधी एकदा पूर्ण भरतोय असं झालेलं. शेवटी आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये पण गेलो, एका अनोळखी दरवाज्याची बेल वाजवली, एका आजोबांनी उघडला दरवाजा, मी त्यांना फॉर्म दाखवला, त्यांनी चष्मा नीट अड्जस्ट करून फॉर्म पाहिला, आणि हसत हसत ५ रुपयांची नोट दिली, मी त्यांना त्यांचं नाव वगैरे लिहायला सांगितलं, त्यांनी हातानेच नको नको केलं, म्हणाले तू तुझ्या नावाने देशील का? (किव्वा असच काही तरी बोलले, मला नक्की आठवत नाहीत त्यांचे शब्द) त्यांचा हात थरथरत होता, वयामुळे असेल... असो, मी काही बोललो नाही, फॉर्म वर त्यांचं नाव लिहिलं... त्यांची सही नाही मिळाली! तो दिवस आहे आणि आजचा, म

मोठी गाडी, मोठा टीव्ही, मोठं घर

मित्राची जागा होती एका चाळीत, नाव आठवत नाही, शनिवार पेठ आणि घाटाच्या बरोबर मध्ये, चाललं तरी हालायचा मजला, जागा इतकी लहान की जेमतेम ३लोकांनी पाय पासरले तर लागतील एकमेकांना, यामुळे घरात सगळच लहान... लहान टीव्ही, लहान फ्रीज, लहान आरसा, लहान पंखा, पण मनं मोठी असतात ह्यांची, हसतमुख चेहरे दिसतात नेहमी, टेबलावर चहा बिस्किटे येतातच, काहीच नाही तर माठातल्या पाण्याचा भरलेला तांब्या! हे सगळं छान वाटतं! 👌 आणि आपण सगळ्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावत असतो! मोठी गाडी मोठा टीव्ही मोठं घर 😏 #सशुश्रीके 

चाळीत राहावं एकदातरी! एक गुळगुळीत अनुभव 👌

Image
चाळीत.. गुळगुळीत असतं सगळं, म्हणजे सगळं कसं एक्सपेरियन्स असलेलं, चढताना उतरताना हात लागून लागून झालेले लाकडी कठडे, जीने, भिंतींचे कोपरे.. सगळं कसं गुळगुळीत... पावसात सोडून इतर वेळी असलेल्या जळमटंयुक्त खिडक्या, त्यातून डोकावणारी पिंपळाची पानं, ती ही त्याच माजल्यावरची... भिंतीतून जन्माला आलेली. पहिला मजला संपला न प्यासेज मध्ये शिरलं की 'दिल के टुकडे टुकडे...' वगैरे झालेल्या फारश्या, त्याची डागडुजी साठी वापरलेलं ठिसूळ सिमेंट, कोणाची तरी वाट पहिल्यासारखी वाटणारी एक म्हातारी, अजून पुढे गेलं की २-३ आजोबा, त्यांच्या हातात पेपर... आणि कोणी ऐको न ऐको, एकमेकांकडे न बघता चाललेली बडबड, अजून जरासं पुढे गेलं की कानावर नकळत राज्य करणारी आकाशवाणी, दरवाज्यातून डोकावणारी मुलं, फिस्कटलेल्या रांगोळ्या, वाळत घातलेले पण वाऱ्याने पडलेले कपडे... हे सगळं रोज पाहायचो! परत एक मजला चढायचो, हो... २मजली होती आमची ब्राह्मण वाडी, परत वरच्या लिहिलेल्या गोष्टी थोड्या फार प्रमाणात दिसायच्या, घडायच्या... एका बंद दरवाज्या पाशी येऊन मी थांबायचो, लगतच्याच उघड्या