Posts

Showing posts from January, 2015

रंग अजुनही ओलाच आहे!

रंग अजुनही ओलाच आहे! पाचवी सहावीत असेन... नीट आठवत नाही गणेशोत्सव... मी काढलेले नेताजींचे पोर्ट्रेट नेहमी मागायचे मंडळात लावायला, दर वर्षी प्रमाणे त्या वर्षीही आमच्या नेताजी नगरमध्ये चित्रकला स्पर्धा ठेवलेली, विषय होता देशप्रेम... मी मस्त प्रसंग रेखाटला... स्वातंत्र्य सैनिक झेंडा घेऊन ब्रिटिशांशी लढतायत,  मला आणि इतर सर्वांनाच मला पारितोषिक मिळणार ह्याची ग्यारेंटी होती. पारितोषिक वितरण सोहळा सुरू झाला.. पहिला नाही, दुसरा नाही... तीसराही नाही! शेवटी एक स्पेशल पारितोषिक जाहीर केले माझ्यासाठी... का तर प्रसंग छान रंगवलेला पण पण झेंडा उलटा रंगवलेला... हीरवा रंग वर आणि भगवा खाली! खुप अपमानास्पद वाटलं... स्वतःचा इतका राग आलेला म्हणून सांगू! त्यात स्पेशल पारितोषिक जाहीर करून... अजुनच अपमानस्पद वाटायला लागलेलं! त्या उलट पालट झालेल्या दीवसानंतर जेव्हा जेव्हा आपला तिरंगा बघतो तेव्हा तो दीवस आठवतो. चूक अजूनही सुखली नाहीये... रंग अजुनही ओलाच आहे! ‪#‎ सशुश्रीके‬ | २६ जानेवारी २०१५ | रात्रीचे ११.०६

'धब्बाक'

Image
'धब्बाक'   २५-५० पैसे जमावून आम्ही १०-१२पोरं रबरी चेंडू घ्यायचो डोंगर्यांकडून 'डोंगरे' नाव होतं मालकाचं, दुकानाच् नाव नाही आठवत, आक्षीच्या स्तंभाबाजूलाच होतं दूकान आणि जरासच अलीकडे एक उनाड मैदान, त्या रणरणत्या उन्हात फाटक्या टुटक्या चपला, घामानी अर्ध ओला बनियान, ढुंगणाच्यातिथे कुठेही बसून पडलेले डाग असलेली चड्डी, शेम्बुड येईल आत्ता असे वाटेल तेव्हा खेचून परत नोर्मल अवस्थेत आणलेले, आंबे खाउन तोंड न धुतल्यानी झालेलं सुखं पिवळे थोबाड! हे माझं वर्णन नाही, अमच्यातल्या बहुतांश पोरांची ही अशी अवस्था. मी वर्षातून २दाच जायचो, पण तिथलाच होऊन जायचो. त्यामुळे असल्या सर्व चेहर्यांची सवय. मैदानात दगडी जिथे कमी अशी जागा शोधून,  "कोणाला मुतायचाय रे..." २-३टाळकी त्या पवीत्र ठिकाणी येऊन प्रसन्न मुद्रेत ३काठ्या रोवायला बलिदान द्यायचे, नॉन स्ट्राइकर ऐण्ड ला एक महाकाय उंच दगड... त्या पिच च्या मध्य भागी ब्याट उल्टी करून जमीनेवर जितके खेळाडू तितक्या रेषा आणि ब्याटि खाली नंबर असा जुगार सुरु व्हायचा... त्यात खिलाडु वृत्ती आणि इतर ह्यांच्यात हुज्जत वगैरे प्रक...

वर्तक कुटुंब... एक ३पात्री 'मित्र'

Image
वर्तक कुटुंब... एक ३पात्री 'मित्र' अभिजीत वर्तक. चैत्रा वर्तक. प्राजक्ता वर्तक. सुरुवात करतो अभिजीत पासून... सुरुवातीला झीरो कट... नंतर सचिन टाइप्स... आता जवळपास झाकीर.. किव्वा डिट्टो शंकर महादेवनचा मुलगा, सेम हेयर स्टाइल! फूल दिल से क्यारेक्टर... सीधी बात नो बकवास वाला! आमची ओळख कशी झाली, डोक्याला ताण द्यावा लागतोय, आठवलं... २००८.. नवीनच होतो दुबैत, एका कामा निमित्त मी त्याच्या घरी गेलेलो, ८-९वाजले असतील... घरी बायलो आणि मुलगी ही होते, १०वाजले आणि म्हणाला चल जेवायला बसु हॉल मध्ये, मी चकीत... डायरेक्ट जेवायला, न विचारता... तेव्हा पासून मस्त दोस्ती. तसे बघितले तर प्रोफेशनली लोक जवळ आले की पर्सनली डिस्टन्स ठेवतात, पण अमच्यात तसल काय नाय... मी नंतर त्याच्याच बिल्डिंग मध्ये राहायला आलो, जवळपास रोज हाय बाय व्हायचा. त्याला चैत्रा नावाची गोड पोरगी (गॉड म्हणालात तरी चालेल)... आणि बायको कशी असावी अश्या प्रश्नचं उत्तर असलेली 'प्राजक्ता वर्तक'...केतकर आणि वर्तक मस्त आमची गट्टी जमलेली, चैत्रा येता जाता आमची बेल वाजवी, आणि धमाल... मी आणि ती भांडायचो, हो हो... तिच्या बरो...

छल कपट इससे सीखो

आत्ता पर्यंत छान छान लोकांबद्दल छान छान लिहीत आलोय.. आज मात्र एका घाण व्यक्तीबद्दल घाण ओतणार आहे, त्याबद्दल क्षमस्त्व विशेष सूचना - ह्या लेखाच्या सुरुवातीला नेहमी प्रमाणे 'श्रीं'चेनाव लिहित नाही, खुप शिव्या शाप ओततोय...  आधीच सांगतो... पचणार असेल तरच वाचा नाहीतर सोडून द्या इथेच! माझ्या नोकरीच्या आजवरच्या कारकिर्दीत म्हणजे २००३ ते २०१२ पर्यन्त असले छान बॉस्सेस मिळालेत! देवाची कृपा म्हणा कीव्वा काहीही... पण २०१२ उरलेला अर्धा भाग एक असला राक्षस / दानव / विल्लन / निर्दयी / उर्फ़ाट्या काळजाचा माझ्या आयुष्यात घेऊन आला, काय सांगू काय नको असं अनुभवलं मी त्या १वर्षात! त्याचं नाव फादी याईश. तो काय चीज आहे हे मला माझ्या जुन्या मित्रांकडून ऐकलेलं होतं, म्हणजे मी ज्यांच्या बरोबर मुंबईत असताना काम केलेलं त्यांनी ह्या नराधमा बरोबर काम केलेलं, मी दूबैत आलो, आणि मकरंद, कार्तिक आणि गौतम नावाचे माझे सहकारी ह्या भिकारचोटा बरोबर बहरैन / दोहा क़तार मध्ये काम करू लागले, नंतर गौतम आणि औनी (गौतमचा कॉपी पार्टनर) ला घेऊन दुबैत आला, इथे दुबैत १ वर्ष त्रास दीला, ह्या दरम्यान त्या चोरानी खुप झोल केल...

धन्यवाद गानू…

Image
"संध्याकाळची वेळ... ७.१० झाले असतील... एक माणूस बॅंकेत आला... गार्ड म्हणाला बैंक बंद झाली आहे ७ वाजताच, आता उद्या या, तो माणूस काय ऐकायला तयार नाही. गार्ड आला माझ्याकडे म्हणाला एक माणूस आलाय, म्हणतोय अर्जन्ट आहे, पैसे काढायचेत... मी म्हणालो, ठीके पाठव आत.. शटर अर्धवट उघडून गार्डनी पाठवलं त्या माणसाला आत... मी विचारलं चेक आहे का उत्तर नाही, पासबुक आणले का उत्तर नाही... डिमांड ड्राफ्ट आहे पण त्यावरून कॅश देणे जमणार नाही... कैशियर नाही, दिवासभराचा लेखाजोखा सम्पलेला आहे, उद्या या... हे ऐकून तो माणूस भडक्ला... अहो परिस्थिती समजून घ्या, मला पैसे हवेत हॉस्पिटलसाठी, तुम्हाला कळत नाही का... कसली ही सहकारी बैंक तुमची... मी नाही देऊ शकत पैसे, उद्या या हे त्यांना मी परत सांगितले... शिव्या शाप देऊन तो माणूस निघुन गेला. दुसऱ्या दीवाशी सकाळी सकाळी एक म्हातारं जोडपं आलं बँकेत, आणि काहीतरी चौकशी केली... गार्डनी माझ्याकडे बोट दाखवलं, मनात बोललो.. आता माझ्यावर आरोप करणार वाटतं, पण मी काय चुकीचं केले नाहीये, माझ्या हातात जेवढ शक्य तेच केलं! ते दोघे मझ्यापाशी आले, काल पैसे घ्यायला आमचा जावई आ...

'विनायक म्हणे... जय कठोर परिश्रम'

Image
'विनायक म्हणे... जय कठोर परिश्रम' प्रत्येक माणसात मी स्वतःला शोधतो कधी कोणी १०% कोणी ७०%. कायना कायतरी जूळतच... शेवटी काय इतरांना ज्यानी घडवलं त्यानीच मला पण ना! पण ह्याचा ज्यानी घडवलं 'त्या' वर विश्वास नाही, नास्तिक म्हणतो ना आपण तोच प्रकार, (आपण म्हणजे आस्तिकांच्या बाजुनी लिहितोय असं समाजा) पण 'जय कठोर परिश्रम' अशी व्याख्या देतो तो... 'घरच्यांसाठी' नव्या घरी सत्यनारायण पूजा पण करतो... म्हणजे तुमच्या साठी असेल बुआ... माझ्यासाठी 'कठोर परिश्रम'च भारी! आणि फोन लावला किंवा आला त्याचा तर पहिला शब्द 'हैल्लो' नसतो...'जय कठोर परिश्रम'नी सुरुवात होते संभाशणाला! असा हा 'विनायक' कामत. वयोमानाच्या मानाने १०वर्ष आधीच पीकलेला... म्हणजे... केस पीकलेला! ६५%केस अक्षरशः पांढरे चेहऱ्यावर एक कायमचं हास्य चीकटवलेला... खळी का काय ते... ती पण पडते, ओव्हरऑल छान दीसतो. प्लस बायको लै स्मार्ट... मॉडल टाइप्स! मस्तच जोडी. दोघे भेटायला आलेले अन्वया १वर्षाची असताना, १सोडून २गिफ्ट्स आणलेले...का तर म्हणे कंफ्यूज झाला! पण ते सांगायला तयार नाही..श...

निखिल वसंत पोलजी.

निखिल आनंद, आनंद हे आडनाव नाही हो... पदवी दिल्ये मी... त्याचं खरं पूर्ण नाव... निखिल वसंत पोलजी. निखळ आनंद देणारा असा... निखिल आनंद! साधारण ४महिन्यापूर्वी फ्रेंड रेकवेस्ट आली म्यूच्यूअल फ्रेन्ड्स मध्ये आर्ट पब्लिक प्रोफाइल चेक केलं... गडी उत्तम क्यारीकेचरिस्ट! फेबु चैट मग व्हत्सप्प कधी न भेटलेलो पण अगदी जन्म जन्मांतराची ओळख असल्या सारखं सुख दुःखाची रेलचेल... माझ्यासरखाच् थोडं पोट सुटलेला, थोडं टक्कल आलेला... सचिनचा भक्त... गाडी वेडा, वर गातोही! उत्तम मिमिक्री... आता काय राहिलय अजुन करायचं! मध्ये त्यानी एकदा माझं क्यारीकैचर केलेलं.. फेबुवर किमान दीडशे लाइक्स! जवळपास महिनाभर प्रोफाइलपिक ठेवलेला मी!... आणि 3D स्केचेस, हस्तकला आणि बरच काही करत असतो लेकाचा... + गाड्या पण जमावतो ना हां माझ्यासरखा! गाड्या तर माझा वीक पॉइंट... बिछड़े भाई वगैरे झाल्यासरखा फील बे! २महिन्या पूर्वी अचानक मी पुण्यात चक्कर मारली त्याला आदल्या दिवशी सांगितलं... गडी आला ना भेटायला वीकेंडपे! सन्डे मार्निंग फ्रेंडके साथ सह्येब इन माय होम! विथ गिफ्ट्स एंड ऑल! मला बायकोला न अन्वयाला पण, त्याल...

झोप... नशीबात लागते हो!

झोप... नशीबात लागते हो! ती कधी येते, कधी बोलवायला लागतं, कधी आलेली कळत ही नाही, कधी येतच नाही, कधी इतकी येते की नशा बरा! जसं नशीब तशी झोप! मध्ये कोणी तरी म्हणालेलं... 'नींद तो बचपन में आती थी अब तो बस थक कर सो जाते है!' ते वाक्य बाप जन्मात विसरणार नाही! कारण ते इतकं पटलय! मला झोप मेली घरीच छान लागते बघा... त्यात प्रवासात किव्वा बाहेरगावी/नातेवाईकांकडे म्हणजे, तो मिण्मिण्ता-डोकावणारा प्रकाश, पंखा जास्त-कमी, खिड़की उघड-बंद न घडाळ्याची टिक-टिक यांमधेच झोपेचा बट्याबोळ! पूर्वी तर १२वाजता १२वेळा टांण टांण / कुक कुक वाजणाऱ्या घड़ाळयाचा सामना केलेलाय मी! असो, कशीबशी झोप मेहरबान होणार तेवढ्यात कायतरी अजुन अनपेक्षित व्यत्यय येऊन परत झोपेला बोलावणं करायला लागायचं.. महागच ती, माझ्या सारख्या निद्रा उदासीन व्यक्तिमत्वाला न परवाडणारं प्रकरण! मग दुसरा दीवस ते झोपचं ओझं पेलवत डोळ्यांचे व्यायाम चालू... कारण काय तर नशीबात लागते हो झोप! त्यातल्या त्यात डुलकी हां प्रकार उत्तम! वेगळच जग... त्या डुलकीतून बाहर आलं, की टाइम ट्रावेललिंग केल्या सारख्ं वाटतं, डोळ्याची आणि में...

अन्वया उवाच!

Image
'लास्ट टाईम' अन्वयाला कुठलीही गोष्ट १दा नाही २दा नाही ३दा वगैरे हवी असते उदा. - चोकॉलेट, ग्रेपस, बेबी टीव्हीचे कार्टून्स मग अमृता तिला अट घालते की आता बस हं, आता हे लास्ट टाईम आता अन्वया लास्ट टाईम ३ दा म्हणते.  — feeling आम्ही हरलो! ----------------------------------------------------- आजी ला 'ठकसा' लागलाय म्हणून ती औषध शाप्पिंग करायला गेल्ये! ----------------------------------------------------- अन्वया समोर चहा आणि चिप्स चोपत होतो म्हणते कशी… ते छी छी आहे म्हणून तू खातोयस ना!  ----------------------------------------------------- इंटरव्यू होता आज...माझा नाही,अन्वयाचा! अन्वयाचा पहीला इंटरव्यू. ऐकलं होतं, की लहान मुलांचा पण इंटरव्यू असतो आजकाल... आज पाहिलं, 'नाव काय?' पासून सुरुवात... रंग मग आकार ओळख... मग हाताची पकड कशी आहे खडू/पेंसिल वर वगैरे... सगळ उत्तम, इंग्लिश बोलता येत नसलं तरी शब्द येतात... त्यामुळे जमत होतं अन्वयाला, शेवटचा प्रश्न, नर्सरी राइम्स येतात का... पण अन्वया काय त्या प्रश्नाला भीक घालेना, आधीच नवीन चेहरा दि...

अन्वया उवाच!

Image
'लास्ट टाईम' अन्वयाला कुठलीही गोष्ट १दा नाही २दा नाही ३दा वगैरे हवी असते उदा. - चोकॉलेट, ग्रेपस, बेबी टीव्हीचे कार्टून्स मग अमृता तिला अट घालते की आता बस हं, आता हे लास्ट टाईम आता अन्वया लास्ट टाईम ३ दा म्हणते.  — feeling आम्ही हरलो! ----------------------------------------------------- आजी ला 'ठकसा' लागलाय म्हणून ती औषध शाप्पिंग करायला गेल्ये! ----------------------------------------------------- अन्वया समोर चहा आणि चिप्स चोपत होतो म्हणते कशी… ते छी छी आहे म्हणून तू खातोयस ना!  ----------------------------------------------------- इंटरव्यू होता आज...माझा नाही,अन्वयाचा! अन्वयाचा पहीला इंटरव्यू. ऐकलं होतं, की लहान मुलांचा पण इंटरव्यू असतो आजकाल... आज पाहिलं, 'नाव काय?' पासून सुरुवात... रंग मग आकार ओळख... मग हाताची पकड कशी आहे खडू/पेंसिल वर वगैरे... सगळ उत्तम, इंग्लिश बोलता येत नसलं तरी शब्द येतात... त्यामुळे जमत होतं अन्वयाला, शेवटचा प्रश्न, नर्सरी राइम्स येतात का... पण अन्वया काय त्या प्रश्नाला भीक घालेना, आधीच नवीन चेहरा दि...

तुला मूल झालं की कळेल!

तुला मूल झालं की कळेल! हे वाक्य मी आत्तापर्यंत कीमान ५० वेळा तरी सहज एकलं असेल... आता तेच वाक्य रोज माझ्या डोळ्यासमोर नाचतं, पडतं, हसतं, रडतं, खेळतं, विचारतं, सांगतं, रुसतं, मनवतं, थकवतं, रमवतं... जितकं टेंशन तीतकाच आनंद! थोडक्यात काय... आनंदी टेंशन... टच वुड!... अर्थात "तुला मूल झालं की कळेल!" इज बेट्टर दैन... "तुला मुलं झाली की कळेल!" :P ‪#‎ सशुश्रीके‬ | १६ जानेवारी २०१५ / ११:१७

डिस्क्लेमर - सादर पोस्ट गमतीने लिहिल्ये गमतीनेच घ्यावी /// नावं

डिस्क्लेमर - सादर पोस्ट गमतीने लिहिल्ये गमतीनेच घ्यावी मी मुलींना नावं ठेवण्यात लै पुढे कालेजात विभावरी - हगावरी रूही - ढूई (काही कारण नाही पण री-री / इ-इ जमयचं शेवटचं) कैरन पवार - कैरन मोहोम्मद पवार. (सर्व धर्म समभाव) मीनल - ग्रेस्केल (तिच्या नाकावर रेशा होत्या... आणि असाइनमेंट असायची डार्क टू लाइट ग्रे कलरची आम्हाला) प्राची आत्या (ती माझ्या आत्या सारखी डीसायच्ची) अदिती टिल्लू - पिल्लू मग काय अक्ख् कालेज ह्याच नावनी वळखायला लागलं ना! #‎ सशुश्रीके‬ | १६ जानेवारी २०१५

अन्वयाचा पहीला इंटरव्यू!

इंटरव्यू होता आज...माझा नाही, अन्वयाचा! अन्वयाचा पहीला इंटरव्यू. ऐकलं होतं, की लहान मुलांचा पण इंटरव्यू असतो आजकाल... आज पाहिलं, 'नाव काय?' पासून सुरुवात... रंग मग आकार ओळख... मग हाताची पकड कशी आहे खडू/पेंसिल वर वगैरे... सगळ उत्तम, इंग्लिश बोलता येत नसलं तरी शब्द येतात... त्यामुळे जमत होतं अन्वयाला, शेवटचा प्रश्न, नर्सरी राइम्स येतात का... पण अन्वया काय त्या प्रश्नाला भीक घालेना, आधीच नवीन चेहरा दिसला की अन्वया बघुन न बघितल्या सारखं करते! मग आम्हीच म्हणालो येतात तीला नर्सरी राइम्स... थांब आता असं म्हणावा लागतं कधी कधी, तरी प्रयत्न चालू होते... ती काय म्हणायला तयार नाही, समोर असलेल्या खेळण्यां मध्ये गुंग! मी ज़रा प्रयत्न करत होतो तीला आठवण करून द्यायला... हे गा ते गा... त्यात व्हील्स ऑन द बस गो राउंड राउंड च्या ऐवजी 'पीपल' ऑन द बस गो राउंड राउंड...असं बोल्लो... अम्रुताने लगेच माझी चूक सांभाळत 'कवर अप' केलं, असो... आता काय बोलून उपयोग... एकदा बाहेर आलेले शब्द थोडीच परत घेता येतात! मग शाळा दाखवली... प्लेइंग एरिया... म्यूजिक रूम... वगैरे सर...

पूर्वीची गाणी!

पूर्वीची गाणी!  मग ती मराठी असोत हिंदी... ते स्टीरियो नसलेलं... काही छेडछाड़ काही इफेक्ट्स नसलेलं रिकॉर्डिंग! ब्लैक एंड व्हाइट ते एस्टमनच्या आधीच्या काळ, गाण्याच्या सुरुवाती पासूनच ज़रा खरखर... काय सुंदर असते ती, ती गाणी कितीही एकली तरी बोर नाही होत... उलट त्या जमान्यात नेउन सोडतात ज्या जमान्यात आपले आजोबा वगैरे तरूण होते... त्यांचे किस्से वडीलमंडळींकडून ऐकायला जाम मजा... असो... आमचे ससरेबुआ, त्याना जुन्या गाण्यांची इतकी माहिती असते की विचारुच् नका, ठरावीक काही जुनी गाणी लागली की ते कुठे चित्रित केले पासून त्या गाण्या वरचे किस्से कोणी गायले कोणाला गायचे होते कोण गाणार होते वगैरे वगैरे... मग मजा येते ऐकायला! तसा मी काही पूर्वीच्या गाण्यांना कोळून वगैरे प्यायलो नाहीये, पण 'भूले बिसरे गीत' लागलं की कान टवकारतोच, आत्ता लिहिता लिहिता •'दम भर जो उधर मु फेरे...ओ चन्दा.. मैं तुमसे प्यार कर लूंगा...' • 'लाखो है निगाह में जिंदगी की राह में...' • 'ओ नीले गगन के तले... धरती का प्यार...' अश्या जुन्या गण्यांचा ज्यूकबोक्स वाजतोय मनातल्या मनात... रेडि...

नावं

काय रे चिकन्या.. ऐ गोरा घाऱ्या... पांढरी पाल, लाल माकड, रबरी चेंडू.... अश्या नावांनी माझं बालपण नुस्तं गजबजलं होतं! काही 'नावांचा' भयंकर राग यायचा... गोरा आहे म्हणून काय झालं... मी थोडीच ठरवलेला माझा रंग! आणि जरा काही मनाविरुद्ध झालं की कान लाल... त्यामुळे कधी काही लपवून ठेवणं आयुष्यात जमलच नाही, डोळ्यात पाणी तर इतक्या लावकर यायचं... त्यामुळे 'हळवा' आणि 'नाठाळ'चं अजब कॉम्बिनेशन होतो मी, त्याच त्याच चुका परत परत करून त्या चुकांवर पीएचडी व्हायची राहिलेली. त्यात कंपेरीझनला जाम वैतागायचो... मित्र बघ तुझे, किती हुशार...किती ह्याव किती त्याव, पण नंतर नंतर कळायला लागलं, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला! काय घ्यावे काय सोडावे... हे कळुनही न कळाल्या सारखे करणे, तो 'एक्टर' फ्याक्टर आपणा सर्वांमध्येच थोड्या फार प्रमाणात असतो! तसा माझ्यात ही आला. त्यामुळे मी हल्ली कोणालाच रंगावरून / शरीरयष्टी / स्वभावावरून बोलायचं टाळतो... मनात जे काय असेल ते मनात... कारण अनुभवले आहे की काय वाटत असेल, आणि माझ्या तोंडातून जेव्हा जेव्हा निंदा झाल्ये तेव्हा त...

अंत

त्या सरफ़ीऱ्या धार्मिक नाराधमांनी उछाद मांडलाय...चूक दोघांची... दुसऱ्या धर्माचा अपमान का करायचा... आणि अपमान करण्याबद्दल थेट गोळीबार, चूक कोणाचीही असो... ह्यासर्व गोष्टीचा आपल्या दैनंदीन जीवनातही प्रभाव पडतोय हे अनुभवलं आज. "समीर... झालेल्या प्रकारबद्दल ऍफ़बी वर काही शेयर करू नकोस... उद्या परवा आपल्यालाही मारायला कारण नकोय!" मी बघत बसलो अमृताकडे... उत्तर शून्य, ओफ्फिस मध्येही अस्लाच काहीतरी माहोल! किती ते विष, न पीताच चव घेतोय आपण रोज रोज! मरायची घाई नाही... म्हणून हे असलं मरण रोज रोजचं... आपली मूलं, काय काय पाहतील अजुन, अजुन काय कलयुग दाखवणारे काय माहीत... सुरुवात आहे म्हणे ही... अंत बघतायत सगळे!!! #सशुश्रीके | ८ जानेवारी २०१५ दुपरचे २.४४

पल्सर

२००७ चा मे महिना… मी एका आठवड्यात दुबईला जाणार होतो, त्यामुळे पुणे विझीट होती वीकेंडला… परत कधी यायला मिळेल, निदान वर्ष भर तरी नक्कीच नाही! त्यामुळे सर्व जवळच्या लोकांकडे एक एकदा डोकावत बाय बाय करणं चालू होतं, त्यादिवशी गेलेलो गानू काकांच्या कडे, आमचे पुण्यातले गानू काका, सहकार नगरला... संध्याकाळी फोन आला मित्रांचा कि टिळक रोड ला भेटूयात का! मी म्हणालो भेटूयात!… गानू काकू म्हणाली अभिषेकची पल्सर घेऊन जा, तो बसनीच ये जा करतो ओफ्फिस ला त्यामुळे जा घेऊन, मी मस्त मारली किक, झाप्झुप करत २० मिनटात टिळक रोड, १-२ तास टाइमपास करत निघालो परत मारली किक! परत येताना ट्राफिक पार करत २५ मिनटात बैक टु सहकार नगर, घरी आलो, अभिषेक होता बाहेरच… म्हणाला अरे ही कोणाची पल्सर आणलीस रे! मी डोळे मोठे करून, ही काय भानगड, हे काय घडलं आता नवीन! ते उघडलेले डोळे न मिटताच, निघालो परत जिथुन ही 'जुडवा बेहेन' आणलेली!… त्या टिळकरोड वरच्या अभिनव कोल्लेज्च्या पार्किंग पाशी गेलो, जिथे आधी आमची 'ओरिजिनल' पल्सर लावलेली अगदी तिथेच! पार्किंग समोरच्या दुकानदाराला विचारलं… तो  म्हणाला...

ईट वास बेटर देन बीफोर!

एक पॉलिश मुलगा आहे भयंकर तिखट खाणार... 'कुबा' आज पराठा किंग मधून दाल खिचडी मागवणार म्हणून ओफ्फिस पब्लिकला पण विचारात होतो, कुबाला पण विचारलं, म्हणालो तुला चिलीमिली पराठा हवाय का! मागच्या वेळी त्याला तो ईतका तिखट नव्हता लागला म्हणून मी ओर्डर देतना 'एक्ष्ट्रा स्पाईसी बनाना' असं सांगितलं! गरम गरम त्या आग ओकणार्या पराठ्यावर ह्या माणसानी 'तबस्को' ओतून व्होरापला! आणि म्हणतो कसा!… ईट वास बेटर देन बीफोर! >.< #साशुश्रीके | ७ जानेवारी २०१५ दुपारचे १२.२०

पान!

एरोल (माझा बॉस) खुप सीगरेटी पीतो,त्याला जस्ट सांगत होतो की कमी कर वगैरे, बोलता बोलता विषय निघाला पान खायचा! मी सांगितलं मुंबईत असताना जेवण झाले की लोकं फुंकायला आणि पान खायला बाहर पडायची! पान म्हणजे काय रे भाऊ ( पान? व्हाट इट इस ब्रो!? ) मग माझी कसोटी होती, सुरुवातीला सांगितलं तंबाकू असतो त्यात, पण पुढे काय कत्था, चुना वगैरे ला काय म्हणायचं, त्याला सांगितलं! तुला विकी-लिंक पाठवतो! तडीक लिंक पाठवली, एरोल म्हणाला- यो कूल स्टफ एह! मी म्हणालो येह ईट इज! मनात म्हणालो थूंकण्याबद्दल विचारलं नाही म्हणजे मिलवालं आता! #सशुश्रीके | ६ जानेवारी २०१५ दुपारचे ३.३४

जिंकणार (हिट होणार) काल्पनीकच!

आत्ताच रणजीत पराड़करनी नावीन चित्रपट 'लोकमान्य' बद्दल समीक्षा दिलेली वाचली... केवळ २स्टार्स दिलत,मी अजुन नाही पाहिला पिच्चर पण माझ्या मते कुठलाही इतिहास दाखवण आणि त्याला २-३तासात प्रेक्षकांसमोर मांडण हे फारच धाडसाचे काम पण काही लोक बखूबीने ते ही जमावतात ब्बा! रणजीत म्हणतो की... न मावलेले लोकमान्य! ह्म्म्म... मध्ये भगत सिंगचे ३चित्रपट आले ते पण एकाच वेळी... कोणीच तितका प्रभाव पाडला नाही... मंगल पांडे... बोस... सगळे पडले, इतिहास, महा कठीण का रण प्रत्येकाचे इतिहासचे वर्जन्स वेगवेगळे! पण इतिहासाची शाई वापरणारा लगान सोल्लीड चालला! कारण काय.... कारण काल्पनीक होता!... उत्तरं द्यायची नव्हती... कारण प्रश्नच नव्हता! काल्पनीक आणि सत्यकथा यांमध्ये ही पकड़ापकड़ी चालू राहणाराच! आणि जिंकणार (हिट होणार) काल्पनीकच. ‪ #‎ सशुश्रीके‬ | ६ जानेवारी २०१५ दुपारचे १२.३५

.फ्रेग्रंस

Image
.फ्रेग्रंस आपण आवाज, छायाचित्र, चलचित्र वगैरे हल्ली अगदी सहजतेने 'रेकॉर्ड' करू शकतो... मग वास का नाही!?... असं झालं तर अत्तर आणि सेंट विकणार्यांची इंड्रस्टी बर्बाद होईल हे नक्की, त्यांनीच ब्रेक लावला असणार ह्याचा बाबतीतल्या संशोधनाला अशी शंका येते कधीकधी! विचार करा ना... व्हाट्सअप वरुन कोणीतरी आपल्याला एक .फ्रेग्रंस फ़ाइल पाठावल्ये...  आणि आपण ती डाउनलोड करून... बेशुद्ध झालोय!   #सशुश्रीके | ५ जानेवारी २०१५ रात्रीचे १०.०५  

चहा

Image
आलं किव्वा गौती किव्वा तुळस त्यात सपटचा चाय टाइम - मुम्बई टापरी चाय फ्लेवर चहाचा अर्धा चमचा आणि २कप पाणी... अगदी चीडचीड होइ पर्यन्त उकळवायचा मग ताजचे २चमचे आणि साखर ४चमचे... अगदी भरभरून नाही... सपाट... आय लेवल ला पाहिल्यावर चमच्यावर न दिसेल इतके, मग महाग दूध...'महाग' म्हणजे कमी दूध! कड़क लागतो चहा आपल्याला... ते चिखला सारखं नाही पण अगदी गहुवर्णीय पण नाही, मग धीम्या गतीनी त्याला चिड़वायचं... मस्त बुडबुड्यांचा छळ! मग हळूच गैस शांत करून मोबाइल वर टाइम पास... ठरलेले २कप्स घ्यायचे... गाळणं शोधावं लागतच, आणि साणशीही... त्या प्रचंड भांड्यांच्या गादारोळात नेमके लपून बसलेले असतात... त्यात परत आवाज करायचा नाही! अन्वया उठली तर शांत चहा प्यायला मिळणार नाही ह्याची धमकी! हे सर्व झाल्यावर ५मिनट मुरलेला तो चहा गाळायचा... चमचा घेऊन दाबायचा त्या चहा पत्तीवर म्हणजे अर्क काढून अजुन कड़क चहा! मग स्लो मोशन मध्ये हळूच कप फरशीवर टेकवून... जोरात गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत ढुंगण टेकवाचं बीन बैगवर... नी हा मेसेज सोडायचा खर्डेघाशीत... सुख! वीकेंडचा परमोच्च आनंदी क्षण... तो हाच! अन साथीला ऐस.डी.बर्मन हिट्स...

'माळा'

'माळा' हो... माळा, पूर्वी सगळयांच्या घरी असायचा! काय आकर्षण होतं त्या माळ्याचं माझ्या आयुष्यात! ज्या ज्या गोष्टी लपवायच्यात त्या सर्व माळ्यावर माझा डोळा अखंड माळ्याकड़े, सकाळी दात घासताना, आई कपडे वाळत घालतना, त्या पैसेजचं ते काळोखी वातावरण, दिवसा ढवळ्याही लाइट लावावा लागायचा! तिथेच बेसिन तिथेच वॉशिंग मशीन तिथेच कपडे वाळत घालायच्या दोऱ्या आणि त्या दोऱ्यांच्या बाजुलाच तो माळा! सोनी, नेशनल, पैनासोनिक चे बॉक्सेस त्यात खजाना, बाबांच्या कंपनीची एक्वीपमेंट्स, जुन्या कैस्सेट्स, माझी जुनी खेळणी, एक मोठा सिंथेसायझर, न लागणारी भांडी, त्यात लहान पाण्याची टाकी, ती टाकी साफ़ करायला वर चढायचो कधी कधी मग... मजा! एकदा आई बाबा गेले होते बाहेर, मित्राला मदतीला बोलावलं, म्हणालो चल पियानो वाजवु आज.. धमाल... त्या पियानो वरती ड्रम्स वाजवायला काय मजा यायची! आम्ही तो कसाबसा काढला, उघडणार तेवढ्यात बाबांच्या स्कूटरचा आवाज आला, मी म्हणालो 'आदेश... आले वाटतं आई बाबा... ' आणि किमान पंधरा ते वीस सेकंदात अगदी चार्ली चैप्लिनपेक्षा फास्ट चपळतेने आम्ही तो पियानो बॉक्स मध...