जिंकणार (हिट होणार) काल्पनीकच!

आत्ताच रणजीत पराड़करनी नावीन चित्रपट 'लोकमान्य' बद्दल समीक्षा दिलेली वाचली... केवळ २स्टार्स दिलत,मी अजुन नाही पाहिला पिच्चर पण माझ्या मते कुठलाही इतिहास दाखवण आणि त्याला २-३तासात प्रेक्षकांसमोर मांडण हे फारच धाडसाचे काम पण काही लोक बखूबीने ते ही जमावतात ब्बा!

रणजीत म्हणतो की... न मावलेले लोकमान्य! ह्म्म्म...
मध्ये भगत सिंगचे ३चित्रपट आले ते पण एकाच वेळी... कोणीच तितका प्रभाव पाडला नाही... मंगल पांडे... बोस... सगळे पडले, इतिहास, महा कठीण कारण प्रत्येकाचे इतिहासचे वर्जन्स वेगवेगळे!

पण इतिहासाची शाई वापरणारा लगान सोल्लीड चालला!
कारण काय.... कारण काल्पनीक होता!... उत्तरं द्यायची नव्हती... कारण प्रश्नच नव्हता! काल्पनीक आणि सत्यकथा
यांमध्ये ही पकड़ापकड़ी चालू राहणाराच! आणि जिंकणार (हिट होणार) काल्पनीकच.

#‎सशुश्रीके‬ | ६ जानेवारी २०१५ दुपारचे १२.३५

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!