पान!

एरोल (माझा बॉस) खुप सीगरेटी पीतो,त्याला जस्ट सांगत होतो की कमी कर वगैरे,
बोलता बोलता विषय निघाला पान खायचा!
मी सांगितलं मुंबईत असताना जेवण झाले की लोकं फुंकायला आणि पान खायला बाहर पडायची!
पान म्हणजे काय रे भाऊ ( पान? व्हाट इट इस ब्रो!? )
मग माझी कसोटी होती, सुरुवातीला सांगितलं तंबाकू असतो त्यात, पण पुढे काय
कत्था, चुना वगैरे ला काय म्हणायचं,
त्याला सांगितलं! तुला विकी-लिंक पाठवतो!
तडीक लिंक पाठवली, एरोल म्हणाला- यो कूल स्टफ एह!
मी म्हणालो येह ईट इज!
मनात म्हणालो थूंकण्याबद्दल विचारलं नाही म्हणजे मिलवालं आता!

#सशुश्रीके | ६ जानेवारी २०१५ दुपारचे ३.३४

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!