छल कपट इससे सीखो

आत्ता पर्यंत छान छान लोकांबद्दल छान छान लिहीत आलोय..
आज मात्र एका घाण व्यक्तीबद्दल घाण ओतणार आहे, त्याबद्दल क्षमस्त्व
विशेष सूचना -
ह्या लेखाच्या सुरुवातीला नेहमी प्रमाणे 'श्रीं'चेनाव लिहित नाही, खुप शिव्या शाप ओततोय... 
आधीच सांगतो... पचणार असेल तरच वाचा
नाहीतर सोडून द्या इथेच!
माझ्या नोकरीच्या आजवरच्या कारकिर्दीत म्हणजे २००३ ते २०१२ पर्यन्त असले छान बॉस्सेस मिळालेत! देवाची कृपा म्हणा कीव्वा काहीही... पण २०१२ उरलेला अर्धा भाग एक असला राक्षस / दानव / विल्लन / निर्दयी / उर्फ़ाट्या काळजाचा माझ्या आयुष्यात घेऊन आला, काय सांगू काय नको असं अनुभवलं मी त्या १वर्षात!
त्याचं नाव फादी याईश.

तो काय चीज आहे हे मला माझ्या जुन्या मित्रांकडून ऐकलेलं होतं, म्हणजे मी ज्यांच्या बरोबर मुंबईत असताना काम केलेलं त्यांनी ह्या नराधमा बरोबर काम केलेलं, मी दूबैत आलो, आणि मकरंद, कार्तिक आणि गौतम नावाचे माझे सहकारी ह्या भिकारचोटा बरोबर बहरैन / दोहा क़तार मध्ये काम करू लागले, नंतर गौतम आणि औनी (गौतमचा कॉपी पार्टनर) ला घेऊन दुबैत आला, इथे दुबैत १ वर्ष त्रास दीला, ह्या दरम्यान त्या चोरानी खुप झोल केले, उदाहरणार्थ ऐजेंसी मध्ये नसलेल्या ब्रांड्स वर जाहिरात करून अवार्ड्ससाठी पाठवणे... अर्थातच त्यामुळे एजेंसीचे नाव खराब करणे, मग अवार्ड्स मिळाल्या वर पकडले जाणे, अजेंसीचे पैसे उड़वणे, एम्प्लॉईजना भरभक्कम पगार देउन नोकरा प्रमाणे वागवाणे... अश्या सारख्या तमाम वाइट गोष्टींसाठी हा माणूस बदनाम असूनही मी ज्या एजेंसीमध्ये काम करत होतो त्यानी ह्याला 'हायर' केले... त्याला नेमले होते सऊदी अरबिया साठी कारण साहेबांना दुबैतल्या ब्रांच साठी नेमले नव्हते, कारण दुबईच्या एका आधीच्या एजेंसी मधून हकलपट्टी झालेली! वर नमूद केलेल्या प्रकारामुळे.
पण हा शकुनी असला डोकेबाज...
कमीत कमी वेळात प्रोप्पर पॉलिटिक्स खेळुन ह्या नीच माणसानी आमच्या एजेंसी मध्ये आमच्या त्यावेळच्या बॉसचा हळू हळू काटा काढत... टॉप बॉस बनला. रिजिनल हेड झाला हा खाटिक! हे सगळं पहिल्याच महिन्यात!
माझ्या 'त्या' एजेंसीमध्ये ३ वर्ष झाली होती...
छान चाल्लेलं सगळ, जशी एड एजेंसी असते, तशीच कामं, कधी कधी उशीर, कधी वीकेंड्स ना काम वगैरे चल्लेल... ह्याचे नखरे सुरु झाले मग,
नवीन लोकं यायला सुरुवात झाली... आणि त्यांचा पगाराचा बॅलन्स ठेवायला जुन्यांचे बलिदान द्यायला.
इंटरव्यू नवीन ठिकाणी देतात... हा चोद्यानि आम्हा जुन्या लोकांचा इंटरव्यू घ्यायला सुरुवात केली... प्रूव करा म्हणे... तुम्हाला मी इथे का ठेउ!?
मला घाबरायचं काहीच कारण नव्हतं, कारण मला माझ्या कामाबद्दल विश्वास होता, ५-६लोकांची गच्छन्ती करून नवीन १०-१२ नवीन लोकांची सेना आली, जुने उरलेले लोक VS हे नवीन चेहरे - असले २ भाग पडले एजेंसीचे, विष प्यायचं रोज... रोज त्याला बघायचं न शिव्यांच्ं वादळ डोक्यात यायचं... असला विचित्र कायतरी हसायचा, टकला, कारपेटवरच्या दोऱ्यांसारखी दाढी, भलं मोठ्ठ नाक, बोलताना जाड़ेभरडे डाव्या बाजूला खेचले जाणारे ओठ, चालताना उजव्या बाजूला वळणारी मान, बारीक चौकटी / डिज़ाइन असलेला महाग ब्रैंडचा शर्ट, पैंट आणि डिज़ाइनर शूज...
बरं सगळ्यात आश्चर्य काय असेल, ह्या शकुनीसाठी जीव देणारे लोक आहेत ह्या जगात... पैसा, अवार्ड्स, ग्लैमर साठी... आणि अजुन भयानक गोष्ट म्हणजे, त्यानी हायर केलेले लोक... चिली, ब्राज़ील, स्वीडन वगैरेची मंडळी वैतागुन सोडून गेलेही, पण ह्याला काही कमी नाही, लगेच त्यांच्या जागेवर नवीन रक्त रेडी असतं, माझ्या समोरच अर्धे लोक सोडून गेले.
कारण काय... कारणांची रांग...
रांग त्याच्या ओफ्फिसच्या बाहेर रांग...
दुपारी बोलावलं असेल तर संध्याकाळी त्याचं थोबाड पाहायच, मग तो आपलं बघणार...
मग फोन वर बोलणार, मेल्स चेक करणार त्यांना रिप्लाय करणार, काहीच नसेल तर डेस्क वरच पेन मोबाइल लैपटॉप वगैरे शिस्तीत लावत बसणार...
मध्येच कोणी आलं की त्याला बोलावणार आत,
त्याला आपल्या बाजूला बसवून त्याचा अपमान किव्वा त्याच्या समोर आपला अपमान करणार,
काम जे दाखवायला आलोय ते सोडून भलताच विषयावर बोलणार, मूड मध्ये असेल तर टुकार जोक्स मारणार, इतका चोदुभगत होता ना... त्याचा रोज खून व्हायचा माझ्याकडून... 
एकदा मला विचारलं, हां जो लोगो केलायस तो तुला आवडला का!? मला नाही आवडला, माझ्या डोक्यात गरम तेलाची फोडणी रेड़ी होती, तरीही थंड लोण्याचा गोळा मारत बोल्लो... 'मला तर काही प्रॉब्लम वाटत नाहीये' हे असं मी बोलीन असं त्याला अपेक्षित नसेलच, 'मला अजुन ऑप्शन्स दे' म्हणत दुसरा विषय काढला. तेव्हा जर त्यानी अजुन काहीतरी विचित्र किवा तड़क भड़क रिप्लाय केला असता तर त्यादिवशी माझा एजेंसीमध्ये शेवटचा दीवस नक्कीच असता. असे जास्त नाही पण ३-४ 'शेवटचे दिवस' आले नंतर... आणि ते 'शेवटचे दिवस' त्यानी हायर केलेल्या लोकांना तर बिनबोभाट सहन करावे लागायचे.
कधी कधी एखाद्याला वीकेंडला काम नसताना ही ह्याला ओफ्फिस मध्ये पब्लिक लागायचं, कारण तो आणि 'त्याचे' लोक्स 'त्याच्या' कामात असायचे... मला सर्व ओफ्फिस मध्ये हवेत, तुम्ही इथे येऊन कॉमिक्स वाचा किव्वा काही करा... 
मी असे काही वीकेंड काढलेत ओफ्फिसात, 
काय करायचय माहीत नाही, कारण काय!?
तर त्या हिटलरनी बोलावले आहे!
लोकांना कामावरून काढून टाकणे हे... 
आणि अपमान करून काढणे... हे तर त्याला खुपच प्रिय! एकानी रजेचा अर्ज केलेला, आयत्या वेळेला म्हणाला, खुप काम आहे जाउ नकोस मी नुक्सान भरपाई देतो, वर्षभर प्लान केलेली सुट्टीला नकार दील्याबद्दल त्या इसमानी स्पष्ट 'जमणार नाही' म्हणून सांगीतले तर ह्या नालायकानी त्याचा डेस्क वर जाउन लैपटॉप 'जप्त'करत एचआर कड़े जाऊन, ह्या माणसाला उद्या पासून ह्या ओफ्फिस मध्ये प्रवेश द्यायचा नाही असा आदेश दीला. काय तो माज!!!
आयुष्यात पहिल्यांदा एखादा मनुष्य.... 
मनुष्य नाहीच तो, तो जो कोण आहे तो मरत का नाही!? ह्याचा जन्म का झाला!? ह्याला इतकी पॉवर का!? त्याच्या फॅमिली बद्दल तर इतकं वाइट वाटतं... त्याला २मुलं... त्यांना सोडून हा इथे एकटा इतरांच्या मुलाना अप्रत्यक्ष रीत्या छळत असतो, स्वतःची फॅमिली नाही म्हणून इतरांच्या जीवनाचा भोगदा कारायचा... काय पैसा आणि ऐश्वर्य आणि रुबाब / नाव कमावून उपयोग!
असो... वेळीच नवीन जॉब मिळाला, 
म्हणजे नाही म्हंटलं तरी १वर्ष सहन केला त्याला, इतका त्रास नाही दीला जितका इतराना दीला, का कोणास ठाऊक, मला इतरांपेक्षा कमी छळलाय, पण इतरांचे छळ मला बघवेना म्हणून मी ती नोकरी सोडली, निघताना जवळपास एक तासाची बड़बड़ (मी कसा चांगला आणि योग्य आणि तू किती चांगला पण चूक आहेस) ऐकायला लागली, मी म्हणालो की माझं मन बदलल्ल तर येइन परत, म्हणतो कसा... जे लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाहित, त्यांवर मी विश्वास ठेवत नाही... मी म्हणालो! जशी तुझी इच्छा... मला जाताना वाकड्यात घुसायचं नव्हतं, तरी मी एचआर ला एग्जिट इंटरव्यू मध्ये झालेला प्रकार सांगितला. त्यानीही माझ्या निर्णयाला न्याय देत मला सेवेतून मुक्त केले.
बाकी अजुन लिहिण्यासाठी खुप घाण शिल्लक आहे, ज्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही... पण आता थांबतो... नसलेलं ब्लड प्रेशर जाणवायला लागलय.
छल कपट इससे सीखो
सीखो इससे मारना काटना
करो इसकी गुलामी यारो
गाओ झूठे गुणगान
शैतान इसकी नसनस मैं भरा
कलयुग है... हा कलयुग यही है,
यही है हीरो आज का...
दिखेगा इसका ही चेहरा पन्नों पे...
यही होगा 'महापुरुष' कल का


‪#‎सशुश्रीके‬  | २४ जानेवारी २०१५  | सुरुवात संध्याकाळचे ७.२० - अंत रात्रीचे १०.०९

Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!