Posts

Showing posts from February, 2015

चिक्कीय... चिक्कीय

Image
चिक्कीय - चिक्कीय     चिक्की घेऊन यायचे पूर्वी लोक, काही जणं आइसक्रीम, बिस्कीटं, चोकॉलेट्स, पण लोणावळा चिक्की, वेगळीच मजा होती त्याची! खास करून तो 'मगनलाल' चा लोगो बघुन डोळे मोठे व्हायचे! लाळ सुटायची लाळ, त्यात मिक्स चिकी पैक असेल तर डाळ आणि नारळवाली नालायक चिक्की सोडून, बाकी सर्व अर्ध्या दिवसभरात फस्! एका मागोमाग एक,  काजू नंतर बदाम नंतर आपली रेग्युलर शेंगदाणा, परत चक्र चालू! आत्ता तीच खातोय, डेस्क वर कोणीतरी आणून ठेवलेली माझ्या, विकत घेऊन खाणे बहुतेक ते सगळ्यांनाच जमतं, मागवून मिळणं ते पुण्य! न मागता अश्या गोष्टी मिळणं! महा-पुण्य! चिक्कीय - चिक्कीय ओरडणारा तो घसा ट्रेन ते एसटी ते ह्या डोक्यात - परत चक्र चालू! आठवणींची चिक्की! #सशुश्रीके । २४/०२/२०१५ । २.३१

आठवणी!

Image
॥श्री॥ फुंकर मारत पाणी गरम केले आहे का कधी!? त्या चुलीत जळणारे नारळाचे काथे लालबूंद करत करत... तोंडात ब्रश... तंद्री! अगदी पहाटे, सूर्योदय होण्याच्या ही अगोदर कधी येणार तो दीवस परत अस झालय! पानगी खावीशी वाटत्ये...मस्त खमंग... त्यावर सरसरीत गरम तूप... केळीच्या पानावर आजीच्या हाकेसकट... पडवीत झोपाळ्यावर पावसाची रपरप बघत! त्या उन्हाळाच्या दुपारी आजीचा डोळा लागलेला आजोबा गोठ्यात अन मी झोपाळयावर... एका हातात दोरी, दुसरा हात जमीनीवर, ते बोट खरवडत नखांचा आवाज करत, लक्ष्य हळूच कलडे वाळत घालण्यासाठी अडकवलेल्या बांबूवर, पाहूण्या सारखा भुंगा बाहेरून पडवीत, त्याच्या आवडत्या बांबूवर गुफ्तगू, झिंग झुंग असा तो, ऐकवेना, मी कुस बदलली, दुसऱ्या हाताला दोरीची जवाबदारी देत पहिला हात जमीनीवर, आता डोळे झोपाळ्याच्या मागच्या खिडकीवरुन कौलांकड़े, या कौलांमध्ये एका कौलाच्या जागी फ्रॉस्टेड काच., ज्यातून दैवी प्रकाश आत यायचा, धूलीकण चा क्यालीडोस्कोप दाखवायचा, चटपट पाली मध्येच लक्ष्य वेधायच्या, जळमटांच्या बाजुनी पळायच्या, कोणीतरी जणू 'स्टेचू' म्हणून थाम्बवल्या सारख्या गोठायच्या का...

अजूनही...

॥श्री॥ त्या उन्हाळाच्या दुपारी आजीचा डोळा लागलेला आजोबा गोठ्यात अन मी झोपाळयावर...  एका हातात दोरी... दुसरा हात जमीनीवर... ते बोट खरवडत नखांचा आवाज करत... लक्ष्य हळूच कलडे वाळत घालण्यासाठी अडकवलेल्या बांबूवर... पाहूण्या सारखा भुंगा बाहेरून पडवीत, त्याच्या आवडत्या बांबूवर गुफ्तगू... झिंग झुंग असा तो, ऐकवेना... मी कुस बदलली... दुसऱ्या हाताला दोरीची जवाबदारी देत पहिला हात जमीनीवर... आता डोळे झोपाळ्याच्या मागच्या खिडकीवरुन कौलांकड़े...त्या कौलांमध्ये एका कौलाच्या जागी फ्रॉस्टेड काच... ज्यातून दैवी प्रकाश आत यायचा... धूलीकण चा क्यालीडोस्कोप दाखवायचा... चटपट पाली मध्येच लक्ष्य वेधायच्या, जळमटांच्या बाजुनी पळायच्या, कोणीतरी जणू 'स्टेचू' म्हणून थाम्बवल्या सारख्या गोठायच्या काय परत पळायच्या काय... त्यात हळू हळू डोळे मिटायला लागायचे... हाततली दोरी जागा सोडायची, परत उठल्याशिवाय घेता नाही येणार इतकी लांब जाऊन रुसायची...आता फक्त झोपाळ्याचा आवाज... बाहेरच्या किड्यांचा... रास्त्यावरच्या चपलांचा आवाज... सर्व आवाज कमी कमी होत मग आवाज यायचा स्वतःच्या श्वासाचा... आवाज ही हळू हळू ...

'वाह...क्या सीन है...'

Image
॥श्री॥ 'वाह...क्या सीन है...'  भाग - १ लहानपणी काही मालिका चित्रपट इतके पाहिले की जन्मभर विसरणे अशक्य आमच्या कडेVCR होता त्यामुळे रात्री किव्वा संध्याकाळी वगैरे चित्रपट / नाटक / मालिका लागल्यास टाइमर वर सेट करून बाबा रेकॉर्ड करायचे... मग आरामत वेळ झाला की तो सह परिवार पहायचा असा कार्यक्रम असायचा! शांती, स्वाभिमान, राउ, स्वामी सारख्या मलिका... दीवार, विधाता, चार्ली च्याप्लिन, रोजा, होम अलोन, टॉम एंड जेरी असली भेळ असलेली पर्सनल VDO पार्लर जणू होतं घरच्या घरी. आणि वेळ मिळाला की त्याच त्याच कैस्सेट्सची पारायणं करायचो, त्यामुळे अजुन ही टी.व्ही. वर त्या जुन्या गोष्टी लागल्या की जुने 'VDO लायब्ररी'चे दिवस आठवतात. तसं पाहिलं तर खाली नमूद केलेल्या सिनेमा पैकी कोणाला काय आवडेल हे फार व्यक्तिसापेक्ष असेल पण मला भावलेल्या सीनचे तुकडे जरा थोडक्यात मांडतोय... सीन होता 'दीवार' मधला... अमिताभ आणि शशी कपूर देवळाबाहेर निरुपा रॉयची वाट बघत उभे असतात, माय येते दोन्ही लेकरांकडे बघत हातात प्रसाद देते, अमिताभ नास्तिक, शशी त्याला समजावतो, आई प्रसाद समजून द...

'Hollywood पूर्वी सारखं राहीले नाही हो!'

Image
॥श्री॥   ​ १९९३-९४... बाबा मला घेउन डाईनॉसरच्या चित्रपटाला घेउन गेले... संध्याकाळचा शो असेल.. प्रभात टॉकिज, बाहेर पड़े पर्यन्त रात्र झालेली, आणि डोक्यात नुसता डाईनॉसर डाईनॉसर... त्यात ज़रा बौद्धिक खाज म्हणून स्कूटर वर उलटा बसलो, इमेजिन करायला... इथून असा आला तर कोण कसं गल्पटेल वगैरे! नुसता थैमान! आणि आता कितीही गोंधळ घाला त्या स्क्रीन वर... 'बरा होता मूवी अजुन चांगला करता आला असता' वगैरे बोलुन टिकिट फेकून देणे ह्या पलीकडे... 'Hollywood पूर्वी सारखं राहीले नाही हो!' असा पुणेरी तड़का जोडीस कोबरा स्टाइल - 'गप्प घरी पाहिला असता तर पैसे वाचले असते... कसे!?' #सशुश्रीके

मी राहतो...

॥श्री॥ नशा, झिंग, हवाहवासा वाटणारा, थकवणारा, आनंद देणारा, अहो व्यसनच की हे... आयुष्यात कधी 'लिहीन' असं वाटलं नव्हतं, 'वाचायला'ही आता जमतं... हे बाळ रोज रांगतं... डोक्यातली हालचाल उतरवतं ह्या ५इंची पडद्यावर... आकाशतुन थेट जमीनीवर. डोळ्यांच्या काचा, झोपेचे बारा, सकाळ चा पात्तळ थर... मग ओढ़ाताण दीवसभर, आठवड्यातून एकदा तरी ठरवतो असं, नाही लिहायचं आज तरी सोडायचं, जमे ना काय ते झाले आता सहा ते महीने... पण कमवलं की... भूतकाळ गमवतात, मी कमावला... रोज जातो खेचून आणतो... वर्तमानाच्या दोरीवर टांगतो... घेतो पांघरूण अदृश्य भविष्याचे, घालतो लोटांगण... व्यक्तींचे सरपण... ऊब शेकोटि.. खूब मस्ती... मित्रांची वस्ती अठवणींची गस्ती वाहवत जातो अरश्यात पाहतो राहतो मी राहतो मी राहतो... #सशुश्रीके । १७-०२-२०१५ रात्रीचे ११.११

हैप्पी जर्नी ( Movie Review )

Image
।। श्री  ।। हैप्पी जर्नी माझा हल्लीचा आवडता मराठी नट अतुल कुलकर्णी (निरंजन) आणि आवडती नटी प्रिया बापट (जानकी) हे दोघे आहेत मुख्य कलाकार, बाकी कास्ट ही मस्तच आहे! पल्लवी सुभाष (Alice नाव असलेल्या ख्रिस्ती मुलीचा रोल मस्तच साकारलाय) तर Alice आहे निरंजनची प्रेयसी आणि जानकी बहीण. जरा पचायला अवघड पण तितकाच छान हाताळलाय दिग्दर्शकानी (सचिन कुंडळकर) ही जरी प्रेमाची गोष्ट असली तरी भाऊ-बहिणीच्या नात्यातले प्रेम हा प्रमुख पाहुणा आहे! ह्या सिनेमात एक ओळखीचा चेहरा पण दिसला मला! तेजस मोदक, मी त्याला मोदक म्हणायचो… तसं त्याचं नाव तेजस मोडक, पुण्यात असताना कार्टून्स करायचा, कथा वगैरे लिहायचा, आता गाणी लिहितो हे पहिल्यांदाच कळालं! आणि त्याचा छोटा रोल ही आहे, बिल घ्यायला येतो दारावर आणि निरंजनशी २-३ वाक्य बोलतो असा सीन आहे. चित्रपटाच्या कथानकाला आत्ता उजेडात आणलं तर काही फरक नाही पडणार कारण बर्यापैकी दिवस उलटून गेलेत, लोकांच्या समीक्षा पण आत्ता पर्यंत बाहेर पडल्या असतील, सहजा सहजी माझ्या आईला सिनेमे (मराठी असो वा हिंदी) आवडत नाहीत, मग आईनेही रेकमेंड केलाय म्हणल्यावर मी पाहिलाच! आता ही कहाणी...

'सम्या'

Image
'सम्या' मला नाही आवडत मला स्वतःला सम्या वगैरे म्हणवून घ्यायला! कॉलेज मध्ये बोलवायचे तेव्हा काही वाटायचं नाही. (आणि दुसरा पर्याय पण नव्हता!) म्हणून मी ह्या 'सम्या' ला 'सम्या'पेक्षा समीरच हाक मारतो. नाव सेम, स्वभाव ही ऑल्मोस्ट सेम, फक्त आडनाव न आई बापाचं नाव वेगळं आहे :P पुरा नाम समीर सतीश चौबल... उप्स... चौबळ चौबळ! समीर सतीश चौबळ. राहणारा पुणे, भेटला दुबईत… फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली, ३ वर्षापूर्वी… तेव्हापासून दोस्ते रे आपला! नेहमी टापटीप, कडक इस्त्रीचा शर्ट नाहीतर मस्त स्पोर्टी टीशर्ट, दिल चाहता है च्या अमीर सारखी त्रिकोणी मिनी दाढी! (आत्ता नक्की काय म्हणतात त्याला काय माहीत!) झुपकेदार भूरभुरे जरासे तपकिरी केस, जे लवकरच बाय बाय करतायत असे, गोरा वर्ण आणि दर्जेदार आवाज! अजून काय काय लिहु… साला बासरी पण उत्तम वाजवतो! घराणंच आहे आर्टनी भारलेलं, पुण्यातली सुरेल सभाचं आयोजन चौबळ कुटुंबियच करतं! भीमसेनजींच्या मांडीवर बसून त्यांचा रियाज ऐकलाय ह्या पठयानं! बहीण उत्तम फोटोग्राफी करते! वडील अजून ही फीट! सायकलिंग ला जाणे वगैरे! त्यामुळे हा प...

आज भारत पाक मैच

॥श्री॥ आज भारत पाक मैच काय हाइप आहे चायला... 'आपण वर्ल्डकप मैचेस मध्ये एकदाही पाकाड़याँकडून हरलो नाही' आणि पाकिस्तानी 'एकूणच आपापसात झालेल्या मैचेस मध्ये पकिस्तान जास्त मैचेस जिंकलाय' ह्या कारणावर जोर देऊन आपआपली बाजू मांडतायत! नुसता आटापीटा चालुए.. व्हाट्सअप / ऍफ़बी / ट्वीटर नुसते #indvspak फुल ऑन शिवगाळ...शेवटी जो चांगले खेळेल तोच जिंकेल, लक फैक्टर पण हवेच... भूतकाळाचा आणि लाईव्ह गेमचा काहीच संबंध नसतो.. भारतीय संघाची सद्धयाची परिस्थिती काही ठीक नाहीये... पाकिस्तानची परिस्थिती पण काही वेगळी नाहीये! म्हणजे आज दोन्ही टीम्सचे वजन अगदी सेम आहे! मी आणि बाकी कोणी कितीही काहीही बोम्बल्लो तरी ...त्या अफ्रिदीच्या...फूल्या फूल्या फूल्या... #सशुश्रीके ऑफिस मधला एक पाकी म्हणाला क्या भइ तुम लोग जीत गये! मी आदबीने म्हणणार की… हार जीत तो होती रेहती हें पण तोंडातून आलं हा यार, तुम लोग नही सुधरोगे! #भयाणशांतता #अतीवआनंद #सशुश्रीके आज ओफ्फिसमधून निघताना म्हणालो जरा पाकी लोकांना बघुन जावें... हाय बाय टाइप्स पण नाही पाहता आलं...सगळ्यांची तोंडं खाली होती... कोणी वर बघायला तयार नाय!!! म...

उद्या वैलेंटाइन डे म्हणे!

॥श्री॥ उद्या वैलेंटाइन डे म्हणे!  मला काय, आम्हाला...दोघांना कौतुक नाही, असे डे वगैरे मध्ये! पण लेख लिहितोय अमृतावर असं सम्याला (मित्राला) सांगीतलं तेव्हा तो म्हणाला, वाह वेलेंटाइन निमित्त सप्रेम भेट की काय, तेव्हा त्याला म्हणालो! कावळा बसायला न फांदी तुटायला, म्हण जरी चुकीची असली तरी काय झालं, भापो झाला की आलं त्यात सगळं!  असो... आता मुद्द्यावर येतो! सौ. अमृता समीर केतकर. हे आत्ताचं नाव... सात फेरों के पहले का नाम बोले तो... कु. अमृता अविनाश गोगटे. गोरी पान, सडपात्तळ बांधा... (आत्ता नाही)  अगदी छान नाटकात सुंदर मुलीचा अभिनय करणाऱ्या पात्रा सारखी!   जवळून फार कमी पाहिली, एकूणच मुलींच्या पासून लांब... त्यामुळे लांबुनच प्रेम वर्षाव करायचो, त्यात आमोद ज्याला आम्ही 'गोट्या' सगळे म्हणायचो तो तीचा चुलत भाऊ माझा क्लास मेट, त्यामुळे जरा अजुनच लांब. हमारा बजाजच्या स्पिरिटवर यायची... १दीवस तीची स्पिरिट मग १दीवस सुरश्रीची (तीची क्लासमेट) असं काहीतरी गणित होतं, त्यांचा ४-५ जणींचा ग्रुप होता, अमृता मला आवडते... हे जवळपास सगळ्यांना माहीत होतं, अमोदला सोडून! नंतर...

One-Hit Wonders...

॥श्री॥ आज सकाळी शफल वरती दिल तो पागल है चा एल्बम लागला... मनात विचार आला... वाह काय गाणी होती ही, कोल्लेज चे दीवस आठवले... प्यार कर... ओह्हो हो प्यार कर जब तू हस्ती है... चाक दूम दूम दिल तो पागल है... दील दीवाना है लता, उदीत आणि उत्तम सिंग... हां कोण!? हो मला वाटलेलं की जातीन-ललित असेल नेहमी प्रमाणे, कारण तेव्ह्या जतिन-ललित जोरात होते! काय मस्त गाणी... दिल तो पागल गाणी हीट, चित्रपट हीट... पण पुढे काय!? त्यानंतर उत्तम सिंगनी दुश्मन, प्यार दीवाना होता है आणि ग़दर वगैरे सिनेमे केले... पण 'दिल तो पागल है' सारखं यश नाही मिळालं... अशी आहेत अजुन बरीच मंडळी... मैंने प्यार किया वाली भाग्यश्री, परदेसची महिमा चौधरी, माझी आवडती गायत्री जोशी जीने फ़क्त स्वदेस केला, आशिकी वाला राहुल रॉय, राम तेरी गंगा मैली वाला राजीव कपूर, सौदागर वाला विवेक मुश्रान... अजुन कोणी असेल तर सांगा मला... माझ्या आठवणीत तरी इतकी आहेत. सगळे आले आणि गेले... One-Hit Wonders ... पण जो काही पहिलाच लकी स्ट्राइक होता त्यांचा... लोकांना झगडावे लागते हीट मिलावण्या साठी... ह्यांनी पहिल्याच दणक्यात बाजी म...

मौला

Image
॥श्री॥ मौला २००७-०८ची वेळ, आम्ही ओफ्फिस मध्ये लंच टाइमला कैरम खेळायचो, साइड बाय साइड गाणी वाजवत बसायचो मी, नाही आवडलं की जाऊन बदलायचो... जामच रंगात असेल गेम तर असतील ती गाणी वाजत राहायची, असो तर... असाच एक दिवस होता... सगळे मस्त कैरम खेळण्यात / बघण्यात मग्न, त्यात गाणं लागलं कुठलं तरी... 'मौला मेरे मौला मेरे...' होतं बहुतेक, हल्ली ऑलमोस्ट सर्वच गाणी बऱ्यापैकी हीट होतात असा विषय निघाला... ह्यावर आमचा मानस नंदा म्हणाला.. स्ट्राइकर हातात घेऊन... बोटानी सीजन बॉल फीरवल्या सारखा... शॉट वर एम घेत... "आज कल गानों मैं सौ ग्राम मौला या रब्बा डाल दो गाना हीट भाय लोग" हे वाक्य म्हणून...क्वीन मगोमाग सोंगटी घेत 'वाह क्या शॉट खेला है मैने... म्हणत 'खुदखुशी'पण केली! तो सौ ग्राम वाला मौलाचा डायलोग अजुन ही लागू पड़तोय! मानस भैया तुस्सी छा गए थे... तुस्सी आज भी ग्रेट हो... ग्रेट राहोग्गे! #सशुश्रीके | ८.२.२०१५

पाण्डु आणि बंडू दोन होती मूलं...

#NowPlaying पाण्डु आणि बंडू दोन होती मूलं... एक होतं शहाणं, एक होतं खुळं... पाण्डु होता हुशार, बंडू होता मठ्ठ... पाण्डु खाई पढे, बंडू करी हट्ट... मी आहे पाण्डु आणि बंडू कोण...तूच तूच तुच्च 'कळत नकळटी' नावाच्या मराठी चित्रपटातलं "नाकावरच्या रागाला औषध काय!?" ह्या गाण्यातलं एक कडवं ओतलय वरती... काय छान लिहिलय ना? इतकं अगदी पाठ होइ पर्यंत... ह्याचं श्रेय माझ्या पोरीला... अशोक सराफ नी एक नम्बर गायलय! कधी वेळ मिळाला तर लक्ष्य देऊन एकाच! #सशुश्रीके Watch "Nakavarchya Ragala | Marathi Movie Kalat Nakalat | Ashok Saraf | Marathi..." on YouTube - Nakavarchya Ragala | Marathi Movie Kalat Nakalat | Ashok Saraf | Marathi...: http://youtu.be/rK-umpfJrJo

निवेदिता उर्फ़ गायत्री गानू... पार्ट २

Image
निवेदिता उर्फ़ गायत्री गानू... पार्ट २ जनरली एक पार्ट मध्ये लिहिता नाही आलं की २रा पार्ट वगैरे लिहायला लागतो आणि १ल्या पार्ट मध्ये शेवटी 'क्रमश' असे लिहायचा नियम... तसलं काही मी लिहिलं नाही... याचा अर्थ लेख पूर्ण आगे बढ़ो.. मग हां पार्ट २ का बुआ!? सांगतो... मी लोकांबद्दल लिहायला सुरुवात केली तेव्हापासून प्रत्येक लेखाला 'मस्त' 'छान' वगैरे रिप्लाय + तळटीप 'माझ्यावर कधी लिहिणार आहेस!?' शेवटी वैतागुन मी लिहिलं तिच्या बद्दल... पण ही हावरट, पहिल्या लेखावरून तीचं १०ग्रामचं पोट नाही भरलं... आता म्हणते पार्ट २ लिही! मग काय... आज ही तेच... मझ्यावरचा २रा पार्ट कुठाय! मागच्याच आठवड्यात ती आणि काका काकू येऊन गेले १०दीवस... घर मस्त भरलेलं... आई, अन्वया, अमृता, गायत्री आनंद काका, ऐश्वर्या काकू, शुभदा काकू... आणि मी! दुबई दर्शन, गप्पा, किस्से आणि त्यात अन्वया रोज काय ना काय तरी नवीन शब्द तीला उमगायचे... आणि ह्या सर्वाला गायत्रीची  फोडणी, असला हास्यक्लब झालेला! एकतर ती इंग्रजी मीडियमची त्यामुळे शुद्ध मराठीत बोललं की डोक्यावरून जायचं, आणि तीचं मराठी आम्हाला हसवुन ...

पंकज रामनाथकर.

Image
॥श्री॥ पंकज रामनाथकर. २००७ साली दूबईत 'द क्लास्सिक पार्टनरशिप एडवरटाइजिंग' मध्ये जेव्हा रुजू झालो तेव्हा पासूनची ओळख, तसा त्या एजेंसी मध्ये ग्रुप वगैरे प्रकार नव्हता तेव्हा त्यामुळे मी काय सर्वच त्याच्या बरोबर काम करायचे... मी केलेले काम आवडले की 'आगे बढ़ो' नाही तर... नाहीच जमतय मला असं वाटत असेल तर तो स्वतःच नवीन लेआउट सुरु करायचा आणि मला संगायचा की असं काहीतरी कर! म्हणजे उगाच आपलं 'मजा नहीं आया यार' असं बोलून सोडून द्यायचं, अश्यातले नव्हते साहेब! असो... त्याच्या बद्दल बोलायचं झालं तर... माझा आदर्श! त्याच्या पासून जित्कं शिकायला मिळालं तीत्कं कोणाकडून नाही, सकाळी वेळेत येणं, दीलेल्या वेळेत काम जित्कं होईल तीत्कं चांगलं पूर्ण करून देणे, कामातले बारकावे, ज्यूनिअर्सना सांभाळून घेणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे वगैरे सर्व 'लीडरशिप क्वालिटीस' ह्या माणसात. आणि ओफ्फिसच्या बाहेर... फूल ओंन टाइम पास :) मला अजुन ही आठवतं... माझ्याकडे गाडी नव्हती... मी देवराज आणि अखिल अश्या ३घांना तो घ्यायला ययचा सकाळी... आणि जाताना 'त्याच्या वेळेत' निघालो ...

'आनंद' ह्यातच!

Image
'आनंद' दुबइत तासाला वगैरे साफसफाई करणारे 'प्रोफेशनल' घरकाम करणारे मिळतात, पैसे पण तसेच, म्हणजे १तासात जितकं होईल तीतकच, पण असेही काही आहेत जे महिन्याला पैसे घेऊन काम करतात, नशीब चांगलं असेल तर विश्वासु वगैरे, बरे काम करणारे मिळतात! पण आम्ही 'नशीब' या शब्दापेक्षा पुढचा प्रकार मिळवलेला. हा मूळचा हैदराबादचा, घरी ३मुलं आणि छोटी शेती, तोड़कंमोडकं हिंदी, कमी बोलणारा, जाम आद्न्याधारी, विश्वासू, आणि बरेच काही, जे काही हल्ली माणुस म्हणून 'मिसिंग'असतं असं सर्व. बऱ्यापैकी ऊँची, साधा टिपिकल शर्ट पैंट, चपला आणि दुबैत अत्यावश्यक असलेले साहित्य, सायकल वरचे हेल्मेट आणि फ्लूरोसेंट कलरचे येलो हाफ ज्याकेट, त्याच्या कडे क्लीनरचा वीजा होता, सकाळी तो एका जिम मध्ये साफसफाई सुरु करायचा ते दीवस संपे पर्यंत! हे सर्व मला हळू हळू कळत गेले, असो... मी आणि अमृता दोघे जॉब करायचो तेव्हाची गोष्ट, अभिजीत वर्तक कुटुंबियांकडे यायचा एक गडी, तेव्हाच त्याला आमच्या इथे पण काम कर असे सांगितले, तो संगीतलेल्या वेळी येई १तासात सर्व कामे करी! दुपारी यायचा आणि शुक्रवारी सुट्टी त्या...

एक वो दिन भी थे, एक ये दिन भी है

अब आप सुनेंगे रेखा भारद्वाज का गाया हुआ उन्नीसौसत्यान्वे में बनी फ़िल्म चाची चारसौबीस का गाना... गीतकार है गुलज़ार साहब और संगीतबद्ध किया है विशाल भारद्वाजजीने.... एक वो दिन भी थे, एक ये दिन भी है एक वो रात थी, एक ये रात है रात ये भी गुज़र जाएगी कोई आता है पलकों पे चलता हुआ एक आँसू सुनहरी सा जलता हुआ ख़्वाब बुझ जायेंगे, राख रह जाएगी रात ये भी गुजर जाएगी वक़्त सालों की धूँध से निकल जाएगा तेरा चेहरा नज़र से पिघल जाएगा आँख बंद होगी तो, नींद आ जाएगी रात ये भी गुजर जाएगी काय सुंदर गाणं आहे हो हे! त्यात छान आवाज, शब्द... संगीत... अभिनय सर्वच जमुन अलेलंय! कायमचं घर करून बसलय हे मनात! धेन्यू त्या प्रत्येक जीवाला ज्यानी हे गाणं बनवायला मदत केल्ये! लिंक देत आहे... एकदा तरी जरूर ऐका/पहा http://youtu.be/WdRrO19p5_0 #सशुश्रीके

रवी टी

Image
।।श्री॥ रवी टी पूर्ण नाव नाही आठवत, पण त्याचं नाव 'रवी टी' नावानी सेव केलेलं मोबाईल मध्ये, कारण रवी नावाचा अजून एक म्यान होता म्हणून ह्याचं नाव 'रवी टी'… आमचा ओफ्फिस बोय! नावाला बोय, नुसतं ओळख करून द्यायला, खरा तर तो… तो वडलांच्या वयाचा! त्याला सगळे रवी भाय हाक मारायचे. गोल्डन फ्रेम चष्मा, वळणदार घट्ट केस, खोचलेला भगवा टी-शर्ट, डोकावणारा बेल्ट,काळी / निळी जीन्स. मस्त वळणदार पोट, काळे शूज. तोंडावर हास्य किव्वा राग, मधला प्रकार क्वचितच! 'द पार्टनरशीप आड्वरटाइजिंग' दुबईत होतो तेव्हाची गोष्ट! आम्ही सकाळी ९. ३०-१० पर्यंत यायचो, हा तो पर्यंत सर्व ऑफिस झाडून घ्यायचा, आम्ही सर्व आलो कि ठरलेल्यांना चहा / कॉफ्फी देऊन… बाकीची कामं बाकीची कामं म्हणजे काय? म्हणजे प्रिंटआउटना माउंटींग करणे, ब्रोशर्स, अन्नुअल रीपोर्ट्सचा वगैरेंचा मॉकअप बनवणे, म्हणजे हा अष्टपैलूच होता, काय येत नाही असे नाही! होता मल्लू, त्यामुळे त्याचं ते दक्षिण भारतीय ठेक्यातलं हिंदी धम्माल असायचं! देशमुख (अजेन्सीचे मालक) ना वेळोवेळी विचारायचा, 'चाय, बनाइंगा?' (चहा बनवू का?) आणि देशमुख ही उत्तर द्याय...