रवी टी

।।श्री॥

रवी टी

पूर्ण नाव नाही आठवत, पण त्याचं नाव 'रवी टी' नावानी सेव केलेलं मोबाईल मध्ये, कारण रवी नावाचा अजून एक म्यान होता म्हणून ह्याचं नाव 'रवी टी'… आमचा ओफ्फिस बोय! नावाला बोय, नुसतं ओळख करून द्यायला, खरा तर तो… तो वडलांच्या वयाचा! त्याला सगळे रवी भाय हाक मारायचे. गोल्डन फ्रेम चष्मा, वळणदार घट्ट केस, खोचलेला भगवा टी-शर्ट,
डोकावणारा बेल्ट,काळी / निळी जीन्स. मस्त वळणदार पोट, काळे शूज. तोंडावर हास्य किव्वा राग, मधला प्रकार क्वचितच!

'द पार्टनरशीप आड्वरटाइजिंग' दुबईत होतो तेव्हाची गोष्ट! आम्ही सकाळी ९. ३०-१० पर्यंत यायचो, हा तो पर्यंत सर्व ऑफिस झाडून घ्यायचा, आम्ही सर्व आलो कि ठरलेल्यांना चहा / कॉफ्फी देऊन… बाकीची कामं बाकीची कामं म्हणजे काय? म्हणजे प्रिंटआउटना माउंटींग करणे, ब्रोशर्स, अन्नुअल रीपोर्ट्सचा वगैरेंचा मॉकअप बनवणे, म्हणजे हा अष्टपैलूच होता, काय येत नाही असे नाही!

होता मल्लू, त्यामुळे त्याचं ते दक्षिण भारतीय ठेक्यातलं हिंदी धम्माल असायचं! देशमुख (अजेन्सीचे मालक) ना वेळोवेळी विचारायचा, 'चाय, बनाइंगा?' (चहा बनवू का?) आणि देशमुख ही उत्तर द्यायचे 'हा, बनाएगा' (हो… बनव) असा सगळा प्रकार भाषेचा 'सेट' होता त्याच्या बाबतीतला.

तो रहायचाही ऑफिस मध्येच, कारण दुबईत भाड्यानी राहाण नाही परवडत, ऑफिस मधल्या एका छोट्या गोदाम सदृश्य खोलीत त्यानी त्याची झोपायची व्यवस्था केलेली. अगदी ट्रेन मध्ये असते तशी, त्याची कागदं कापायची साहित्य, टिशू रोल्स, स्टेशनरी वगैरे. उभं रहायला, चालायला जागा… बसायला नाही. सायकल असायची त्याच्याकडे, आणि ठरलेले २ जोडी कपडे. पण तरीही खूप समाधानी असायचा तो!

एकदा काय झालं, मी डबा खात होतो… घरून चमचा आणायला विसरलो, मग ऑफिस मधलाच वापरला, आणि चुकून, चुकून बरं का! माझ्या हातून तो डस्टबीन मध्ये फेकला गेला, (प्लास्टिक चा चमचा जसा फेकतात अगदी तसाच फेकला) ह्या साहेबांनी नेमका तो पाहिला, म्हणाला 'क्या समीर बाय (भाय) घर पे भी ऐसेही करता है क्या!?' मी आईसमोर चुकुल्यानंतर क्षमा मागित्ल्यासरखा चेहरा करून, लगेच माफी मागितली. तर हसला, 'ऐसा मत करो, बाय(भाय)' म्हणून निघून गेला!
तेव्हा पासून जेव्हा जेव्हा मी प्लास्टिक चा चमचा फेकतो तेव्हा त्याची हमखास आठवण येते.

कधी कधी त्याचा मूड जाम खराब असायचा, विनाकारण काम असायचं, चुकीचं काम, डबल काम + ऑफिसचं साफसफाई काम, मग त्याला कैरम खेळायला लावायचो, मग खुश व्हायचा, कोणी दमदार खेळणारा असेल तर त्याला खेळायला देणार, तो सोंगटी आणि स्ट्राईकर कडे असं बघायचा जसं काही त्यांचात कित्येक किलोमीटरचे अंतर आहे! आणि जिंकला वागोरे की साहेबांच्या चेहेऱ्यावरचा आनंद, तोड नाय! पण गेम संपल्यावर बोर्ड उचलून ठेवला नाही तर परत गरम व्हायचा, असं ते सर्कल चालूच रहायचं.

गावी जाउन आला कि आमच्यासाठी खूप 'चकणा' आयटम आणायचा. घरी सगळी खुशाली आहे वगैरे सांगायचा.

असो, असे रोजच छोटे मोठे किस्से घडायचे, तो दिवस जवळ आला, मी राजीनामा दिला, सगळे सोडायला आले माझ्या शेवटच्या दिवशी… तो पण आला, त्याला म्हणालो, "रवी भाय… आपको मिस करुंगा!… मेलते रहेंगे… "
दुर्दैवानी नंतर कधी भेटणं जमलं नाही! अजून ही वेळ गेली नाहीये म्हणा, जुन्या मित्रांकडून त्याचा नंबर घेऊन फोन वर हाल हवाल विचारीन म्हणतो!

रवी भाय,
तुम्म हमारे लीये चाय बनाया,
कभी तुम्म कॉफ्फी बनाया,
तुमको आता था गुस्सा,
उस्मै बी होता था प्यार!
आप जैसा ना मिला कभी कही,
यही खयाल बार बार,
मिले आपको हर सुख,
उपर वाले से दुआ हर बार.
मिस करता हम सब आपको,
याद राखेंगा, ना भूलेंगा,
मिलेंगा जल्दीच, रवी भाय!

#साशुश्रीके । ५.२. २०१५ । रात्रीचे ९.०६





Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!