'सम्या'

'सम्या'
मला नाही आवडत मला स्वतःला सम्या वगैरे म्हणवून घ्यायला!
कॉलेज मध्ये बोलवायचे तेव्हा काही वाटायचं नाही.
(आणि दुसरा पर्याय पण नव्हता!)
म्हणून मी ह्या 'सम्या' ला 'सम्या'पेक्षा समीरच हाक मारतो.

नाव सेम, स्वभाव ही ऑल्मोस्ट सेम,
फक्त आडनाव न आई बापाचं नाव वेगळं आहे :P

पुरा नाम समीर सतीश चौबल... उप्स... चौबळ चौबळ!
समीर सतीश चौबळ.
राहणारा पुणे, भेटला दुबईत… फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली, ३ वर्षापूर्वी…
तेव्हापासून दोस्ते रे आपला!

नेहमी टापटीप, कडक इस्त्रीचा शर्ट नाहीतर मस्त स्पोर्टी टीशर्ट,
दिल चाहता है च्या अमीर सारखी त्रिकोणी मिनी दाढी!
(आत्ता नक्की काय म्हणतात त्याला काय माहीत!)
झुपकेदार भूरभुरे जरासे तपकिरी केस, जे लवकरच बाय बाय करतायत असे,
गोरा वर्ण आणि दर्जेदार आवाज! अजून काय काय लिहु…
साला बासरी पण उत्तम वाजवतो!
घराणंच आहे आर्टनी भारलेलं,
पुण्यातली सुरेल सभाचं आयोजन चौबळ कुटुंबियच करतं!
भीमसेनजींच्या मांडीवर बसून त्यांचा रियाज ऐकलाय ह्या पठयानं!
बहीण उत्तम फोटोग्राफी करते! वडील अजून ही फीट! सायकलिंग ला जाणे वगैरे!
त्यामुळे हा पण एथ्लीट प्रकारात मोडणारा!
त्याच्या बीजी प्रोफेशन मुळे जमत नसेल म्हणा त्याला,
नाहीतर नक्कीच एथ्लीट वगैरे झाला असता,
त्याची प्रोफेशनल जात आहे  Interior designer / Architect,
आणि जातीवर आलोच आहे तर सीकेपी आहे, पक्का नान-वेज तोडणारा!
आणि प्रचंड गोड खाणारा! अजब कोंबो!
ह्याला नुसती साखर हो हो नुसती सा.ख.र. खातानाही पाहिलंय मी!

असो, त्याला प्रचंड आकर्षण कार्स बद्दल! मी ही वेगळा नाही,
आणि दुबई हे गड्यांचं माहेरघरच जणू!
तो ही लहान पणा पासून कार-वेडा न मी ही!
बाजूनी कुठली आवडती किव्वा नवीन गाडी गेली…
की कत्रीना कैफ बघितल्यावर जशी लाळ गळते, त्या पराकोटीचे एक्ष्प्रेशेन्स!
त्यांचे कलर्स, एलोय व्हील्स, खास करून त्याला मर्सीडीजच्या गाड्या अतीच आवडायच्या…
त्याचा कल असायचा बिजिनेस क्लास स्टेन्डर्ड कार्स वर आणि माझा मसल कार्स,
मग एकमेकांच्या आवडीच्या गाड्या दिसल्या की 'लाळ!'

साहेब एकटे रहायचे दुबईत, 'ब्याचलर', त्यामुळे मी सोडून बाकी पण खूप मित्र होते त्याचे!
जगन्मित्र माझ्या सारखाच! एकटं कधी त्याला पाहिलेलं फार क्वचितच!
सकाळी जायचा ऑफिसला घरी गेल्यावर होणार्या बायकोशी स्काईप,
मग माझ्याकडे यायची स्वारी, कारण…
तेव्ह्हा अमृता पुण्यात होती ३महिने त्यामुळे मी ही मोकळा!
मस्त मोठ्ठा आवाज करून गाणी ऐकायचो तासोन्तास,
त्याला ही सर्व प्रकारच्या गाण्यांची आवड!
आणि त्याची आणि माझी बर्यापैकी गाण्यांची निवडही सेम! अजून काय पाहिजे!!
आम्ही जेवण मागवायचो, हातात ग्लास, कानात गाणी,
कधी कधी तर टीव्ही वर मूवी चालू म्युट वर,
पण गाणी मात्र वाजतायत, ईतके मशगूल!

अशीच गाणी ऐकताना एकदा त्यानी विचारलं तू The Sound of Music पाहिलयस का?
मी म्हणालो नाही रे! तो उडालाच… म्हणाला तू The Sound of Music नाही पाहिलायस!?
आत्ता आत्ता पाहू… लगेच download मारला, तेव्हा पासून पारायणं चालू आहेत!
तेव्हा आम्ही! आता आमची अन्वया!

एक किस्सा आठवला, असाच एके दिवशी ऑफिस झाल्यावर घरी आलेला,
त्याचा घसा खराब होता त्यादिवशी, फोन आला त्याला. मित्रांनी विचारलं, येतोस का जेवायला,
तर समीर पटकन बोलला  'तुम्म लोग continue करो, मेरा आज जरा घसा खराब हें… '
तो हा डायलोग संपवे पर्यंत मी हसून लोळायला लागलेलो,
आणि त्याला त्याची 'खराब दर्जेदार' हिंदीची जाणीव झाल्यानी शरम से पानी पानी टाइप चेहरा झालेला!

३ महिन्याच्या कालावधी नंतर अमृता(बायको) अन्वया(आमचे कन्यारत्न) बरोबर आली दुबईत,
दुबईतून जाताना 'समीर' नावाचा कोणी मित्र नाही…
आणि परत दुबईत आल्यावर अगदी लहानपणा पासून ओळख असल्यासारखा समीर पाहून अमृताला काय बोलावं कळेना!
मग अन्वया आणि त्याची छानच गट्टी जमली! बासरी आणि अन्वया आणि सामील काका,
समील काका आणि बाबा पण सामील! जाम धम्माल!

तो एका २बीएचके मध्यॆ रहायचा, एकटा नाही खूप लोक,
त्याच्याबरोबर एक बंगाली आणि अजून एक कोण तरी होता असे तिघे एका रूम मध्ये,
जाम पकाय्चा तीथे, त्यामुळे माझ्या घरी पडीक असायचा,
त्याचे मित्र ही भेटायचे 'फिली कॅफे'ला, तिथे जाफरानी चहा तासोनतास प्यायला मजा यायची!
दुबईत अगदी करीयरची सुरुवात असताना आला असल्यामुळे गलेलठ्ठ पगार नसला तरी,
छान एन्जोय करायचा सेविंग्सचं भान लक्षात ठेऊन,
आजीला ही आणलं त्यांनी दुबई फिरवायला! होणारी बायको आणि बहीणही आलेले, 
बायकोचा बर्थडे साजरा केलेला आठवतोय आम्ही! फुलऑन सर्पराईज. मेजो म्हणतात तीला ('मे'घना 'जो'शी)

पण आलेले परत जातातच दुबइतून, काही खूप लवकर, त्यातला हा समीर!
२वर्षातच गेला दुबईतून… बैक टू पुणे, आता स्वतःची कंपनी आहे, जोरात चालली आहेत कामं!
जाम क्रीएटीव कवटीचा असल्यानी पुढे काय टेंशन नाही त्याच्या प्रो लाइफ़ बद्दल!
साला जाता जाता एक शाप देऊन गेला माझ्या मित्राला, त्याच्या बैग्स ठेऊन गेलेला मित्राच्या घरी,
आणि बैगेत ढेकुण! हाहाहाहा २दा पेस्ट कंट्रोल करके कंट्रोल में आया मामला!

असो असो!… बाकी नो कम्प्लेंट्स, जाम मिस करतो त्याला,
सोलिड धमाल केली दीड-दोन वर्ष त्यासोबत!

दोन जगमित्र भेटले की एकाला एक करत डझन भर अजून मित्र होतात!
खूप मित्र, खूप धमाल, खूप मजा असं माझं गणित!
अर्थात सगळ्यांनाच नाही जमत असं जगायला!
पण ज्यांना हे जमतं त्यांना बहुदा 'समीर' म्हणतात!

#साशुश्रीके १६-०२-२०१५ संध्याकाळचे ५.२०


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

आजी

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!