दृष्यम

अप्रतिम थरारक चित्रपट!
उत्तम कथानक, छान मांडणी, कमी गाणी, मुळीच नको ते सीन्स नसलेला...
डोक्याला विचारांची फोडणी देणारा दर्जेदार -दृष्यम-

सुरुवातीला १५-२०मिनिटे काय बोर होतय वगैरे वाटत होतं...
पण मग हळू हळू कथानकानी पकड घेतली, वेग वाढू लागला...
व्यक्तीरेखा वाढत गेल्या, गुंता वाढत गेला, तब्बू, रजत आणि अजय ची भट्टी मस्तच जमली आहे!
आणि दिग्दर्शक कामत आणि बाकीच्या मराठी कलाकार मंडळींनी
आपआपल्या भूमिकेत उत्तम काम केल्यानी
'यू विल बी ऑन एज ऑफ दी सीट' ह्या इंग्रजी वाक्याची प्रचिती शेवटपर्यंत होते...
'ब्लैक कॉमेडी' ही छान जमली आहे.

दृष्यम ला कमी मार्केटिंग / एडवरटाइजिंग करून ही त्यानी रसिकप्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यात यश मिळवले! दिग्दर्शनाची कमाल! दूसरे काय?

वन टाइम वॉच नक्कीच आणि तो ही सिनेमाघर वालाच... गुड जॉब टीम दृष्यम 👍
थ्री एंड हाफ स्टार्स फ्रॉम मी

‪#‎सशुश्रीके‬


Comments

Popular posts from this blog

फडणीस सर...

बालपणीचं फोल्डर लगेच मिळतं!

दही पूरी...