फूडी वीकेंड!
काल एका रेस्टरन्ट मध्ये गेलेलो, मला वाटलं राजस्थानी असेल! श्री गंगोर फ़ूड चैन वालं, निघालं इटालियन! नाव पण जरा विचित्र होतच म्हणा, OTTIMO RESTORANTE, तेव्हाच जराशी संशयाची पाल चूकचुकलेली!
आत शीरताच मैनेजर अगदी स्वागताला उत्सुक, नवीनच होतं रेस्टॉरंट, झोमटो वर साडे३ रेटिंग असलेलं.
पण काय मस्त होतं जेवण, सगळ्यांनी जे जे मागवलं ते ते त्यांना आवडलं!
सैलेड, ब्रोकोली सूप, पिझा, पास्ता...
मी मगवलेले बीबीक्यू सौस विथ कॉटेजचीज एंड राइस एंड फ्रेंच फ्राइज!
अक्षरशः लसणाची फोडणी आणि रेड चिली फ्लेक्स असलेली घट्ट डाळ होती पनीरच्या तुकड्यांसकट! मला इटालियन इतके आवडत नाही जितके इंडियन, त्यामुळे माझ्या साठी तर एक सुखद धक्का होता!
मग वेटर आला, आमच्याशी गप्पा मारल्या, ते ही मराठीत! मग आम्हाला कळालं सर्व शेफ्सही मराठी आहेत, एक शेफ तर आला ही आम्ही सर्वानी जेवणाची तारीफ वगैरेही केली.
माग काय... एक कॉंप्लिमेंट्री चोकोलेट प्लेट आली टेबलावर!
वाह छान... इंडियन इटालियन रेस्टोरेंट फिक्स!
त्यानंतर 'चाटोरि गल्ली' नावाच्या एका स्वीटकार्नरच्या कोर्नेरला गाडी पार्क केली... नीलम काका आत गेला, तब्बल २०मिनिटे आला नाही बाहेर, नंतर असे उमगले की तिथे 'जिलेबी' अगदी फ्रेश तळून मिळते! त्याबरोबर तिथल्या एका 'जिलेबी बाई'ने नीलम ला 'रबड़ी'ही विकली!!! काय 'माशाअल्लाह' टाइप प्रकार होता! दिल्लीचे प्रसिद्ध 'चाटोरि गल्ली' जिलेबी खाऊन मनाचे समाधानच होईना...त्यात पहिल्यांदाच बासुंदी बरोबर व्होरपलेली... क़ातील होता प्रकार!
चला ह्या वीकेंडचा अंत सुखद झाला :)
वेटिंग फॉर अनदर फूडी वीकेंड!
#सशुश्रीके | २३ऑगस्ट २०१५
Comments
Post a Comment