सशुश्रीके २०१५
जन गण मनं... धप्पाक्क!
भारत माझा देश अन सर्व भारतीय माझे...
धप्पाक... धप्पाक्कं!!
सकाळी सकाळी शनिवारी व्हायचा 'धप्पाक' सीनं...
चक्कर येऊन पडायची पोरं हमखास दोनं-तीनं!
नाजुक पोरं आमची फारं... तडीक भुइसपाट गारं!
मग पीटी वाले मास्तरं, उचलून त्यांची दप्तरं!
जाती वर्गातं, करती उपचारं... हो जी जी जी!
झेंडा फडफडे छाती दुप्पटं..
पोटात कावळे ओरडती टिप्पटं
न कधी चौपटं...
हो जी जी जी!
त्यात गृहपाठ केला नसेल तर 'आईSSSशप्पतं!'
मग वर्गा बाहेर जन्म घ्यावा कोम्बड्यानी!
शिक्षा ती जुनी... हो जी जी जी!
आईच्यागावात त्या अमोनिया सल्फेटच्या
आणि पोट्याशियम परम्यांगन्येटच्या!
चायला खरं सांगतो गड्यांनो हो हो हो
रं खरं सांगतो गड्यांनो बोर्डात आलो असतो
जर नसते हे प्रकार,
जिंदगी झाली व्हती ब्येकार हो जी जी जी!
त्यात भूमिती बीजगणित लैच ब्येकार,
नाय झाला प्रमेयांचा साक्षात्कारं!
झडले अवघे बालपणं,
स्टेप्स वर मार्क मिळवून
गणितं पाठ करुनं घडला इतिहास हो जी जी जी!
अश्लील म्यगझिन आणे एक दाढ़ीवाला मैतरं!
होइ आजुबाजुला घोळका न बाता बिलकुल फिजूलं,
बाईंची चाहूल लगता क्षणात क्लोज होइ मैटर हो जी जी जी!
होती तुकडी 'फ' नी पहिल्याच तासातच हातात
डबा गपचुप बेंचखाली भरे आमची सभा...
दुसऱ्या तासला ढुस्क्या,
न तिसऱ्या तासला छड्या हो जी जी जी
डबा संपवून हो आमचा,
पोटात असे अजुनही जागा!
जेवणाच्या सुट्टीत मित्रांच्या डब्यावर डोळा!
पार पडे थोर सोहळा,
नाय तर दोन रुपयांच्या बोरकुट पेरू न नारळाच्या वड्या... हो जी जी जी
मधल्या सुट्टीत व्हायची शर्यतं,
वाहन असायचे सायकलं,
फुटायचे घुडघे,
फाटायचे रुमालं हो जी जी जी
गडबड न गोंधळ,
त्यात टणटण वाजायची घंटा...
आता खेळून मूड झकास,
नाय तंटा! हो जी जी जी!
सगळे शत्रु व्हायचे दोस्तं,
कारण चित्रकला असायचा तासं,
त्यात चित्रकला आपली कमालं,
अनेक कागदं,
हात जरी एकं,
काढी चित्र सात आठं!
वाहवाह कारायाची पोरं,
व्हायचो मालामालं हो जी जी जी!
शेवटी पुस्तकांचे हमाल,
ओझे गृहपाठाचे!
पुस्तक आमचे अधोगतीचे,
खेळ खेळती बाहेर सवंगडी,
मी मात्र आत...
मंद माझी मती... हो जी जी जी!
अधिक माहितीसाठी संपर्कं पालक बघा,
अहो मजा होइ वजा, बंद दरवाजा,
अशी मिळती सजा!
अरे हो हो जी जी जी!
काय राव आला का नाय खेळायला...
काय लेका कुठे होतास सांच्याला!?
उगाच प्रश्न सतराशे साठं,
पण माझे उत्तर कधी खासं!
'आईने घावन केले होते आजं'
आणि उद्या पण मस्त चोपणार,
आहे म्हणे संकष्टीचा उपासं हो जी जी जी!
करू रविवारी उरलेला गृहपाठं...
लावली रविवारच्या 'रंगोली'नी वाटं!
उरलेला गृहपाठं... कैप्टन व्योमची साथं,
उरलेला गृहपाठं... शक्तिमान फीरतोय गैलेरीतं!
उरलेला गृहपाठं... चंद्रकांता ची कहाणी,
उरलेला गृहपाठं... बालचित्रवाणी,
कसला गृहपाठं... गृहपाठं भुईसपाटं
न कसला अभ्यासं हो जी जी जी!
अंगावर आला सोमवारं...
घरी विसरलो वही हेच सांगणारं!
बाईंच्या डोळ्यात आगं, त्यात शरटावर शाईचे डागं,
परत तोच प्रश्न... परत तीच उत्तरं?
संपे ना हां प्रपंच!
भूतकालं न वर्तमानाचा जणू नंगानाच हो जी जी जी
उरले दिवस चार,
मग तीनं...आता दोनं,
उद्या परिक्षा संगीनं!
काय माहीत देव कसली देतोय शीक्षा,
मार्कांची मागतो भीक्षा हो जी जी जी
उजाडला तो दिवस, उजडली माझी काया!
दिवस गेले वाया, माझीच मला येई दया... हो जी जी जी!
माझ्या परीक्षेचं सायकलला भी टेंशनं!
चैन पडत्ये सारखी घेत्ये जणू ऑब्जेक्शनं,
हात काळे... उगाच उशीर,
पहिली १०मिनिटे वाया,
सरांची नाही गया वया हो जी जी जी!
पण सर, तुटली चैनं...सांगतोय मी हे रडूनं,
उन्मत्त होऊन निर्दइ होऊनं, सांगती मला सरं...
आधी आणं परवानगी मुख्याधापकांची...
शिक्षा भोग करमांची! नाही बसु दिलं परीक्षेला...
आता काय बोलायचं ह्या 'एंग्री बर्ड'ला?
हो जी जी जी!
डोकं फिरलं, त्या डोक्यात रागाचा सडा!
गाठला थेट शनिवारवाङा... परफेक्ट उनाड उन्हाळा!
खिशात ना दमडी अन हातात काठी, पायात कडाडती वीजा...
गरगर फिरतय लेकाचं! डोकं फीरलय एकाचं!! हो जी जी जी
अजुन काय टाइम पासं!?
काळ्या दगडा मागे दोनं जीवं!
प्रेमाचं वजन घेऊनं, प्रेमी यूगुलच की मग काय...
त्याच धर्माच्या काळ्या दगडानी धरला एक नेमं,
अन लागला नेमका जोरातं,
शिव्या खाल्ल्या आठ हो जी जी जी!
संपला होता दिवस ऊनाडं,
संपली होती परिक्षा!
संघर्ष नव्याने आता!
जड जाणार प्रत्येक पाउल आता... हो जी जी जी
घरी आई बाबा न आजी,
आता माझी नक्की करणार भाजी!
पुन्हा बोलणी ताजी,
लढले ते जैसे तानाजी,
संभाजी न शिवाजी... हो जी जी जी!
मी ही लढलो ते युद्ध,
लवकरच झालो शरणागतं,
स्वीकारली माझी हारं...
जाहलो कलावंत,
हाती घेतला रंग,
मित्र सारे दंग,
छंद झाला स्ट्रोंगं,
हाती आले यशं,
जीवन झाले वशं... हो जी जी जी!
आता लिहितो लेख कधी कविता,
ऍफ़बी आहे व्यासपीठं,
छळतो सर्वाना कम्प्लीटं,
धाडतो लेख व्हाट्सऐप वर थेटं,
बघत नाही दिवस ना मध्य-रात्रं.... हो जी जी जी
भूतकाळात जगण्याची हावं,
म्हणतात पोरं नवीन कायतरी लिहा की रावं!
जमेल ना जमेल 'माफ करो पर ब्लॉक मत करो'
हाच एक शुद्ध भावं... हो जी जी जी!
#सशुश्रीके । १० ऑगस्ट २०१५ सकाळचे ७.१२
भारत माझा देश अन सर्व भारतीय माझे...
धप्पाक... धप्पाक्कं!!
सकाळी सकाळी शनिवारी व्हायचा 'धप्पाक' सीनं...
चक्कर येऊन पडायची पोरं हमखास दोनं-तीनं!
नाजुक पोरं आमची फारं... तडीक भुइसपाट गारं!
मग पीटी वाले मास्तरं, उचलून त्यांची दप्तरं!
जाती वर्गातं, करती उपचारं... हो जी जी जी!
झेंडा फडफडे छाती दुप्पटं..
पोटात कावळे ओरडती टिप्पटं
न कधी चौपटं...
हो जी जी जी!
त्यात गृहपाठ केला नसेल तर 'आईSSSशप्पतं!'
मग वर्गा बाहेर जन्म घ्यावा कोम्बड्यानी!
शिक्षा ती जुनी... हो जी जी जी!
आईच्यागावात त्या अमोनिया सल्फेटच्या
आणि पोट्याशियम परम्यांगन्येटच्या!
चायला खरं सांगतो गड्यांनो हो हो हो
रं खरं सांगतो गड्यांनो बोर्डात आलो असतो
जर नसते हे प्रकार,
जिंदगी झाली व्हती ब्येकार हो जी जी जी!
त्यात भूमिती बीजगणित लैच ब्येकार,
नाय झाला प्रमेयांचा साक्षात्कारं!
झडले अवघे बालपणं,
स्टेप्स वर मार्क मिळवून
गणितं पाठ करुनं घडला इतिहास हो जी जी जी!
अश्लील म्यगझिन आणे एक दाढ़ीवाला मैतरं!
होइ आजुबाजुला घोळका न बाता बिलकुल फिजूलं,
बाईंची चाहूल लगता क्षणात क्लोज होइ मैटर हो जी जी जी!
होती तुकडी 'फ' नी पहिल्याच तासातच हातात
डबा गपचुप बेंचखाली भरे आमची सभा...
दुसऱ्या तासला ढुस्क्या,
न तिसऱ्या तासला छड्या हो जी जी जी
डबा संपवून हो आमचा,
पोटात असे अजुनही जागा!
जेवणाच्या सुट्टीत मित्रांच्या डब्यावर डोळा!
पार पडे थोर सोहळा,
नाय तर दोन रुपयांच्या बोरकुट पेरू न नारळाच्या वड्या... हो जी जी जी
मधल्या सुट्टीत व्हायची शर्यतं,
वाहन असायचे सायकलं,
फुटायचे घुडघे,
फाटायचे रुमालं हो जी जी जी
गडबड न गोंधळ,
त्यात टणटण वाजायची घंटा...
आता खेळून मूड झकास,
नाय तंटा! हो जी जी जी!
सगळे शत्रु व्हायचे दोस्तं,
कारण चित्रकला असायचा तासं,
त्यात चित्रकला आपली कमालं,
अनेक कागदं,
हात जरी एकं,
काढी चित्र सात आठं!
वाहवाह कारायाची पोरं,
व्हायचो मालामालं हो जी जी जी!
शेवटी पुस्तकांचे हमाल,
ओझे गृहपाठाचे!
पुस्तक आमचे अधोगतीचे,
खेळ खेळती बाहेर सवंगडी,
मी मात्र आत...
मंद माझी मती... हो जी जी जी!
अधिक माहितीसाठी संपर्कं पालक बघा,
अहो मजा होइ वजा, बंद दरवाजा,
अशी मिळती सजा!
अरे हो हो जी जी जी!
काय राव आला का नाय खेळायला...
काय लेका कुठे होतास सांच्याला!?
उगाच प्रश्न सतराशे साठं,
पण माझे उत्तर कधी खासं!
'आईने घावन केले होते आजं'
आणि उद्या पण मस्त चोपणार,
आहे म्हणे संकष्टीचा उपासं हो जी जी जी!
करू रविवारी उरलेला गृहपाठं...
लावली रविवारच्या 'रंगोली'नी वाटं!
उरलेला गृहपाठं... कैप्टन व्योमची साथं,
उरलेला गृहपाठं... शक्तिमान फीरतोय गैलेरीतं!
उरलेला गृहपाठं... चंद्रकांता ची कहाणी,
उरलेला गृहपाठं... बालचित्रवाणी,
कसला गृहपाठं... गृहपाठं भुईसपाटं
न कसला अभ्यासं हो जी जी जी!
अंगावर आला सोमवारं...
घरी विसरलो वही हेच सांगणारं!
बाईंच्या डोळ्यात आगं, त्यात शरटावर शाईचे डागं,
परत तोच प्रश्न... परत तीच उत्तरं?
संपे ना हां प्रपंच!
भूतकालं न वर्तमानाचा जणू नंगानाच हो जी जी जी
उरले दिवस चार,
मग तीनं...आता दोनं,
उद्या परिक्षा संगीनं!
काय माहीत देव कसली देतोय शीक्षा,
मार्कांची मागतो भीक्षा हो जी जी जी
उजाडला तो दिवस, उजडली माझी काया!
दिवस गेले वाया, माझीच मला येई दया... हो जी जी जी!
माझ्या परीक्षेचं सायकलला भी टेंशनं!
चैन पडत्ये सारखी घेत्ये जणू ऑब्जेक्शनं,
हात काळे... उगाच उशीर,
पहिली १०मिनिटे वाया,
सरांची नाही गया वया हो जी जी जी!
पण सर, तुटली चैनं...सांगतोय मी हे रडूनं,
उन्मत्त होऊन निर्दइ होऊनं, सांगती मला सरं...
आधी आणं परवानगी मुख्याधापकांची...
शिक्षा भोग करमांची! नाही बसु दिलं परीक्षेला...
आता काय बोलायचं ह्या 'एंग्री बर्ड'ला?
हो जी जी जी!
डोकं फिरलं, त्या डोक्यात रागाचा सडा!
गाठला थेट शनिवारवाङा... परफेक्ट उनाड उन्हाळा!
खिशात ना दमडी अन हातात काठी, पायात कडाडती वीजा...
गरगर फिरतय लेकाचं! डोकं फीरलय एकाचं!! हो जी जी जी
अजुन काय टाइम पासं!?
काळ्या दगडा मागे दोनं जीवं!
प्रेमाचं वजन घेऊनं, प्रेमी यूगुलच की मग काय...
त्याच धर्माच्या काळ्या दगडानी धरला एक नेमं,
अन लागला नेमका जोरातं,
शिव्या खाल्ल्या आठ हो जी जी जी!
संपला होता दिवस ऊनाडं,
संपली होती परिक्षा!
संघर्ष नव्याने आता!
जड जाणार प्रत्येक पाउल आता... हो जी जी जी
घरी आई बाबा न आजी,
आता माझी नक्की करणार भाजी!
पुन्हा बोलणी ताजी,
लढले ते जैसे तानाजी,
संभाजी न शिवाजी... हो जी जी जी!
मी ही लढलो ते युद्ध,
लवकरच झालो शरणागतं,
स्वीकारली माझी हारं...
जाहलो कलावंत,
हाती घेतला रंग,
मित्र सारे दंग,
छंद झाला स्ट्रोंगं,
हाती आले यशं,
जीवन झाले वशं... हो जी जी जी!
आता लिहितो लेख कधी कविता,
ऍफ़बी आहे व्यासपीठं,
छळतो सर्वाना कम्प्लीटं,
धाडतो लेख व्हाट्सऐप वर थेटं,
बघत नाही दिवस ना मध्य-रात्रं.... हो जी जी जी
भूतकाळात जगण्याची हावं,
म्हणतात पोरं नवीन कायतरी लिहा की रावं!
जमेल ना जमेल 'माफ करो पर ब्लॉक मत करो'
हाच एक शुद्ध भावं... हो जी जी जी!
#सशुश्रीके । १० ऑगस्ट २०१५ सकाळचे ७.१२
Comments
Post a Comment