धनंजय माने...
धनंजय माने...
होय त्याचं नाव मी 'धनंजय माने'नावानी सेव केलय मोबाइल मध्ये, खरं नाव धनंजय गोखले.
मुळचा नाशिकचा,
गुटगुटीत बांधा,
मध्यम ऊंची,
वरची सपाट धावपट्टी (टक्कल),
घामाचा कारखाना असलेला...
आमचा गोखल्या!
वरून कितीही नारळ, फणस, कलिंगड़ दिसत असला तरी 'काट के देखो साब... अंदर से मीठा है... पैसा वसूल है साब... एक बार ट्राय कर के तो देखो!' असा प्रकार!
ह्याची माझी ओळख झाली जयंत विध्वंस यांच्या कडून, त्यांच्या बद्दल नंतर सांगतो, बेसिकली जयांता म्हणाले... की एक दोस्त आहे आपला, दुबैतच असतो, हा घे नंबर, जमलं तर भेटा! 'जमलं तर!' वगैरे... अशी वाक्य म्हणजे अपमान माझा! आपल्याला भेटायला आवडतं, एक मेंदू... ह्रदय... आणि त्यात मित्राचा मित्र म्हणालं की संपला विषय! थेट-भेट-ग्रेट-भेट कामाच्या व्यापानी कधी उशिरा कधी अती उशिरा पण... सोडत नाय कोणाला. मिलेंगा मतलब मीलेंगाइच!!!
पूर्वी ऍफ़बी आता व्हाट्सऐप्प... भेटलो माझ्या घरा खालीच! म्हणालो वेळ असेल तर ये वरच.. त्या दिवसापसुन आज पर्यंत सेम डायलॉग! "जवळच आहे तुझ्या घराच्या... काय आणु का... वडापाव वगैरे!?" की मग भूक नसतानाही केवळ त्याचा आदर म्हणून १-२वडा पाव हाणतोच! मग वर आल्यावर गप्पा-टप्पा जोरात, नाशिकच्या डॉन पासून गली के कुत्ते पर्यंत! सर्व माहीत भाऊ... कीश्यांवर किस्से!
मध्ये ३महिन्यांपूर्वी त्याची फ्यामिली आलेली... २ पोरी आहेत न एक बायको, मुग्धा छोटीचं नाव आणि मधुरा मोठीचं, वाडलांप्रमाणेच बिंदास... सतत ह्याह्याह्या... माझ्या पोरीेशी मस्त गट्टी जमली आहे गोखले फॅमिलीची, नाशिकला परत जाताना मिस्सेज गोखले एक शेण्टि मारून गेली.. म्हणाली "ऑन अ सीरीयस नोट, अन्वयाला पाहुन धनंजय तिच्या मुलींच्या लाहानपणीचे दिवस आठवतात... " हे ऐकून मला भविष्यात गेल्या सारखे वाटले, पण लगेच अन्वयाला किस्सी दिली आणि गोखले फॅमिलीला बाय बाय करायला सांगितलं. आता स्काइप वरून/सोशल मीडिया वरून कांटैक्ट मध्ये आहेत... धमाल फॅमिली!
हल्ली आम्ही आठवड्यातनं ३-४दा तरी भेटतोच, वीकेंडला बाहेर जेवण... रात्रीचं तर फिक्स, त्यात तोही शाकाहारी आणि इंडियन फ़ूड... स्पेशली मराठी भोजनाचा फ्यान, त्यामुळे आमचं मस्त जमतं!
जेवाणा वरुन आठवलं, त्याला भूक सहन होत नाही, आणि जमेची बाजू म्हणजे भूक लागली आहे हे त्याला कळतं आणि तो मग सय्यमानी वागतो! हो हो.. हे असं सांगतोय कारण तोच सांगतो की तो जाम भडकू खोपडीचा होता, आणि अजुन ही आहे पण आता म्हणे खुप शांत वागतो... "ले राडे केले भौ आपण, पण आता नाही आता डोक्यावर थंड बर्फाची लादी घेऊन फिरतो"
त्याच अदृश्य बर्फाच्या लादीचे पाणी बहुतेक घाम स्वरूपात आम्हाला दिसते... प्रचंड घाम येतो ह्या गरम खून मानवाला! रंगीलातला आमिर खान जेव्हा वेटर च्या "ऐसी इज ऑन सर" ह्या डायलॉग वर जेव्हा "तो... इधर घुम्मा ना" म्हणतो ना, अगदी सेम प्रकार घडतो जेव्हा जेव्हा हा ह्या दुबाईच्या असह्य ह्यूमीडीटीतुन आमच्या घरी येतो!
मध्ये त्याचा फोन आला, "सम्या, बोट कापलं रे माझं, बेक्कार ब्लीडिंग होतय, चायला बटाटा घ्यायला गेलो, डब्यात हात टाकला त्यात सूरी ठेवलेली कोणी तरी... बोट कापलं!" त्यानंतर एकदा कॉल आलेला... "अरे एक्सीडेंट झाला... मागून एक अरब आपटलाय" असे त्याचे कॉल्स येत असतात छोटे मोठे अपघाताचे! आणि आपघाताचे विषय तर बेक्कार असतात त्याचे, ते त्याच्या तोंडूनच 'प्रभावी' वाटतील! इच्छुकांनी ऑन-डीमांड फोन नंबर मागवावा, देण्यात येईल :)
बाकी काय, मजा येते... वयात खुप अंतर असले तरी तसलं काही जाणवत नाही, चला येईल तो जरावेळानी, तो येण्या आधी हा लेख पाठवतो त्याला न त्याच्या फॅमिलीला!
#सशुश्रीके | २९ ऑगस्ट २०१५ ५:०८

Comments
Post a Comment